‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर - सप्टेंबर २०१९

Shree Aniruddha Upasana Foundation
सप्टेंबर २०१९

संपादकीय,

हरि ॐ श्रद्धावान वीरा

श्रावणाचा पवित्र महिना येणार्‍या उत्सवांची चाहूल देतो आणि आध्यात्मिक वातावरणही बळकट करतो. या श्रावण महिन्यात श्रध्दावानांना दरवर्षी सामुहिक घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण करण्याची, महादुर्गेश्वर प्रपत्ती करण्याची आणि अश्वत्थ मारुती पूजनात सहभागी होण्याची संधी मिळते.

या सगळ्याबरोबरच यावर्षापासून श्रावणात ’शिव सह-परिवार पूजन’ करण्याची अतिशय सुंदर संधी श्रध्दावानांना मिळाली.

श्रध्दावानांना अनेकविध मार्गांनी आपल्या परमेश्वराप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करता येते त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ.

- समिरसिंह दत्तोपाध्ये
 

विषय

  • संपादकीय
  • अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

ह्या न्यूजलेटरबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर पाठवू शकता :

newsletter@aniruddhafriend-samirsinh.com सद्हेतुक दान करा : देणगी देण्याकरिता येथे क्लिक करा    

अल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण

वर्ष ४ | अंक ९ | सप्टेंबर २०१९ | १

 
   

अल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण


 

घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण

Shree Aniruddha Upasana Foundation

सदगुरु श्री अनिरुध्दांनी श्रावण महिन्यात सामुहिकरित्या १०८ वेळा घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण करण्यावर भर दिला आहे, जे प्रत्येक श्रध्दावानासाठी अत्यंत फलदायी आहे. त्यानुसार साईनिवास अ‍ॅनेक्स, वांद्रे (पश्चिम) येथे सामुदायिक स्तोत्र पठण आयोजित करण्यात आले होते. श्रध्दावान खूप मोठ्या संख्येने संपूर्ण महिनाभर स्तोत्र पठणात मनापासून सहभागी झाले.

श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती

सदगुरु श्रीअनिरुध्दांनी २०१० साली त्यांच्या रामराज्यविषयीच्या प्रवचनात प्रपत्ती करण्याविषयी सांगितले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की ’प्रपत्ती’ शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे शरणागती जी आपत्तीला, संकटाला किंवा दुर्दैवाला टाळते. शरणागती म्हणजे स्वत:ला आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र त्रिविक्रम ह्यांच्या स्वाधीन करणे.

प्रपत्ती प्रत्येक स्त्री व पुरुषाला प्रापंचिक आणि आध्यात्मिक पातळीवर शूर सैनिक बनविते असेही बापूंनी सांगितले होते.

 
 

श्रावण महिन्यात दर सोमवारी श्रध्दावान पुरुष एकत्र येऊन श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती करतात.

अश्वत्थ मारूती पूजन

Shree Aniruddha Upasana Foundation

श्रावण महिन्यात श्रध्दावानांना अश्वत्थ मारूती पूजनात सुध्दा सहभागी होण्याची संधी प्राप्त होते.

सदगुरु श्री अनिरुध्दांनी अश्वत्थ मारूती पूजनाचे महत्त्व अनेक वेळा सांगितले आहे की भक्तीमार्गावरील प्रवासात फक्त श्री हनुमंताच्या मार्गदर्शनानुसारच प्रत्येक माणसाचे प्रत्येक पाऊल पुढे टाकले जाते.

तो स्वत: प्रत्येक श्रध्दावानाचे बोट धरून त्याला किंवा तिला भक्तीमार्गावरून चालवितो आणि म्हणूनच श्रध्दावानाने भगवान हनुमंताची पूजा करणे आवश्यक आहे.

अश्वत्थ म्हणजे दुसरे काही नसून पिंपळ वृक्ष आहे, ज्याला भारतीय शास्त्रांनुसार अतिशय महत्त्व आहे.

अश्वत्थ वृक्ष - ’उर्ध्व दिशेने (वरच्या दिशेने) मुळे आणि अध दिशेने (खालील दिशेने) फांद्या’ हे विश्वाच्या जीवनाचे प्रतीक आहे, जे परमात्म्याचे विश्वाशी असणारे नाते दर्शविते.

 

अल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण

वर्ष ४ | अंक ९ | सप्टेंबर २०१९ | २

 

अल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण


 

श्री शिवसहपरिवार पूजन

सदगुरु श्री अनिरुध्दांनी गुरुवार दिनांक २० जून २०१९ रोजी (त्यांच्या पितृवचनातून) सर्व श्रध्दावानांना श्रावण महिन्याचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. त्यांनी श्रध्दावानांना भगवान शिव परिवाराची (कुटुंबाची) ओळख करून दिली आणि श्री शिवसहपरिवाराच्या पूजनाचे महत्त्वही समजावून सांगितले. त्या वेळी, बापूंनी सांगितले की श्रावण महिना हा श्रवण भक्तीचा ( भगवंताचे दैवी सामर्थ्य व त्याचा महिमा ऐकण्याचा) आणि भगवान शिवाची भक्ती करण्याचा महिना आहे.

आम्ही जेव्हा भगवान शिवाच्या कुटुंबाची कल्पना करतो, तेव्हा आम्ही भगवान शिव, माता पार्वती आणि त्यांच्या दोन पुत्रांचे गणेश व कार्तिकेय ह्यांचे चित्र रेखाटतो.

परंतु त्यावेळी आम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीच्या दोन कन्यांची बालाविशोकसुंदरी आणि ज्योतिर्मयी ह्यांची माहिती देखील नसते. सदगुरु श्रीअनिरुध्दांनी सुध्दा ३० जून २०१९ रोजीच्या (दैनिक प्रत्यक्षच्या त्यांच्या अग्रलेखात) कथामंजिरी - ११ मध्ये श्री शिव परिवाराचा उल्लेख केला आहे.

इको फ्रेंडली गणेश मूर्ती

Shree Aniruddha Upasana Foundation

श्री अनिरुध्द उपासना फाऊंडेशनने असंख्य श्रध्दावानांच्या मदतीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सदगुरु श्री अनिरुध्दांच्या मार्गदर्शनाखाली २००५ मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती सेवा सुरु झाली. ह्या अनोख्या पध्द्तीचे पेटंट घेण्याची संधी देखील फाऊंडेशनला मिळाली होती.

तथापि जास्तीत जास्त लोकांना त्याचा वापर करता येण्याची परवानगी देता यावी आणि त्याद्वारे पर्यावरण पुनर्रचनेला हातभार लावता यावा म्हणून फाऊंडेशनने त्या संधीलाही नकार दिला. इको फ्रेंडली गणेश मूर्तींची ह्या वर्षीची आकडेवारी (माहिती) खालील प्रमाणे आहे :-

 
मुबंईमध्ये बनविलेल्या मूर्तींची संख्या १६५०
मुबंईमध्ये सहभागी झालेल्या केंद्राची संख्या ३९
मुंबई येथील मूर्ती रंगविण्याची स्टेशन्स
इतर केंद्रे महाराष्ट्र - १५, कर्नाटक - १ आणि गोवा- १
एकूण बनविण्यात आलेल्या मूर्ती ३०००
Shree Aniruddha Upasana Foundation
 

अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

Shree Aniruddha Upasana Foundation

या महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील ४ लाखांहून अधिक नागरिकांना अकल्पित अशा महापूराचा तडाखा बसला. ह्या ५ जिल्ह्यांमधील ६९ तालुक्यांमध्ये वसलेल्या ७६९ गावांना ह्याची सर्वाधिक झळ बसली होती. भारतीय सेना (लष्कर), नौदल आणि एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) ह्यांनी स्थानिक प्रशासनासोबत एकत्रितपणे ह्या जिल्ह्यांतील बचावकार्य हाती घेतले होते. ह्या संस्थांबरोबर अनिरुध्दाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटने बचाव आणि मदत कार्याच्या सेवेत अत्यंत मोलाची भूमिका बजावली.

आपत्ती व्यवस्थापन कार्यकर्त्यांनी (डीएमव्हींनी) काही पूरग्रस्त भागांत अडकलेल्या बर्‍याच लोकांची तराफा (राफ्ट्‌स) वापरून सुटका केली. डीएमव्हींनी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गर्दी नियंत्रणाचे महत्त्वाचे कामही केले. खूप कुटुंबियांना त्यांच्या जीवनाश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी सुध्दा त्यांनी सहकार्य केले. सांगली कारागृहात महापुराचे पाणी शिरले असताना डीएमव्हींनी पोलीस कर्मचार्‍यांची सुध्दा सुरक्षितपणे सुटका केली.

बचाव आणि मदत कार्य करताना डीएमव्हींना हॅम रेडीओची (अमॅच्युर रेडीओ) अतिशय मोलाची मदत मिळाली. ज्या वेळेस मोबाईलद्वारे संपर्क यंत्रणा बंद झाली होती आणि वीज पुरवठा देखिल खंडित झाला होता तेव्हा बचाव कार्य करताना, परवानाधारक (लायसेन्सड) डीएमव्हींनी हॅम रेडीओ वापरून एकमेकांशी समन्वय साधला.

अनिरुध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटने पुरातील गरजू लोकांना स्वच्छ पाणी, अन्न, कपडे आणि अन्नधान्याचा पुरवठा केला.

कराड आणि सभोवतालच्या भागातील डीएमव्ही सुध्दा बचाव कार्यात सहभागी झाले होते. नॅशनल हायवे ४ वर दोन दिवसांपासून ५०० ट्रक्स अडकल्याची बातमी मिळाल्यावर अनिरुध्दाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएमव्हींनी अवघ्या एका तासात त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

श्रध्दावानांनी खूप मोठ्या संख्येने ’जुने ते सोने’ योजने अंतर्गत मदत देण्यासाठी पुढाकार घेतला.

सदगुरु श्री अनिरुध्दांनी त्यांच्या १३ कलमी कार्यक्रमामध्ये ’जुने ते सोने’ ह्या योजनेविषयी माहिती देऊन या योजनेची सुरुवातही केली होती.

श्रध्दावानांनी ह्या पुरामुळे जीवन विस्कळीत झालेल्या लोकांच्या मदतीसाठी कपडे आणि घरातील अन्य वस्तुंचे वाटप केले.

आतापर्यंत पूरग्रस्त लोकांना मुंबई येथील उपासना केंद्रातून सुमारे १७,००० हून अधिक टी शर्ट्‌स, पॅंट्‌स, ब्लॅंकेट्‌स, लहान मुलांचे कपडे पुरविले गेले.

तसेच अन्नधान्य, कडधान्य, गव्हाचे पीठ, चहा पावडर, टूथपेस्ट इत्यादींबरोबरच इतर जीवनावश्यक गोष्टींचा देखिल समावेश असलेली ७००० पॅकेट्‌स पुरविली गेली. महाराष्ट्रातील इतर उपासना केंद्रातून ३००० हून अधिक कपडे पुरविण्यात आले.


अल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण

वर्ष ४ | अंक ९ | सप्टेंबर २०१९ | ३

   

अल्फा टू ओमेगा न्युजलेटर – मासिक संस्करण


 

अनिरुध्दाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे उपक्रम

अनुक्रमांक कार्यक्रम तारीख स्थान सहभाग आणि तपशील
१. एएडीएम बेसिक कोर्स आणि प्रशिक्षण ५ ऑगस्ट २०१९ ते ११ ऑगस्ट २०१९ एएडीएम कार्यालय, लिंक अपार्टमेंट, मुंबई ८ श्रद्धावान सहभागी झाले
१९ ऑगस्ट २०१९ ते २५ ऑगस्ट २०१९ शिवाजीनगर व चंदननगर उपासना केंद्र, पुणे अनुक्रमे ३१ आणि २३ श्रद्धावान
२. एएडीएम सेवा ५ ऑगस्ट २०१९, १२ ऑगस्ट २०१९, १९ ऑगस्ट २०१९, २६ ऑगस्ट २०१९ Nageshwar Mandir,नागेश्वर मंदिर शिरपूर ४४१ डी.एम.व्हीज् शिरपूर व जवळपासच्या जिल्ह्यांमधून सहभागी
१९ ऑगस्ट २०१९ श्रीक्षेत्र निर्झानेश्वर ५७ डी.एम.व्हीज् सहभागी
३. एएडीएम परेड १५ ऑगस्ट २०१९ १) गुरुक्षेत्रम् - मुंबई २) अतुलितबलधाम - रत्नागिरी ३) नंदुरबार ४) गडहिंग्लज स्वातंत्र्य दिनी परेडमध्ये एकूण २७२ डी.एम.व्हीज् सहभागी
 
Web presence Facebook Pages YouTube channels Twitter