अतिमायाळू आदिमाता सगळ्यांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. जो सच्चा श्रद्धावान आहे त्याचे पाप किंवा अन्य काहीही आदिमाता चण्डिका आणि तो श्रद्धावान यांच्या आड येऊ शकत नाही. माणसाने भक्ती करताना स्वत:तील न्यूनता, दोष आदि गोष्टींमुळे घृणा, भीती न बाळगता प्रेमाने भक्ती करत राहणे गरजेचे आहे,. माझी आदिमाता मला कधीच टाकणार नाही या विश्वासाने भक्ती करत राहणे महत्त्वाचे आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥