आदिमाता सर्व श्रद्धावानांवर समानपणे प्रेम करते (Aadimata loves every Shraddhavan equally) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात श्रीहरिगुरुग्राम येथे ‘ आदिमाता सर्व श्रद्धावानांवर समानपणे प्रेम करते ’ (Aadimata loves every Shraddhavan equally) याबाबत सांगितले.

श्रेष्ठ ब्रह्मवादिनी माता लोपामुद्रेने रचलेल्या आणि श्रेष्ठ सूक्तम्‌ म्हणून मान्यता पावलेल्या श्रीसूक्तम्‌ मधील पहिल्याच ओळीत आदिमातेचे वर्णन करताना म्हटले आहे की आदिमातेने सुवर्णाबरोबर(Gold) रौप्याचेही(Silver) दागिने धारण केले आहेत. सुवर्ण आणि रौप्याचे अलंकार आदिमातेने धारण केले आहेत म्हणजेच तिच्या मनात सुवर्ण आणि रौप्य यांत दुजाभाव नाही. आपल्यासारखी साधी माणसेही सोन्याचे अलंकार घालतो. मग एवढी विश्वाची सम्राज्ञी आणि सोन्याचे भांडार असणार्‍या आदिमातेने सोन्याबरोबर चांदीचे अलंकार का घालावे? कारण याद्वारे ती आपल्या बाळांना सांगते की तिला गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, सुंदर-सामान्य रूपाचा असे सर्व श्रद्धावान हे सर्व समानपणे प्रिय आहेत, असे आपल्या बापूंनी सांगितले ते आपण पुढील व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥