त्रिविक्रमावरील विश्वास तुमचे जीवन बदलू शकतो (Faith in Trivikram Can Transform Your Life)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘त्रिविक्रमावरील विश्वास तुमचे जीवन बदलू शकतो’ याबाबत सांगितले. प्रत्येकजण काय म्हणतो? मला माझं जीवन बदलायचं आहे. असं म्हणता की नाही, कधीतरी म्हणालात की नाही की मला माझ जीवन बदलायचं आहे, बरोबर. म्हणजे करायचं काय? तुम्ही मोठं टाईम टेबल बनवता, काय काय कुठले उतारे शोधून काढता ते पाठ करता, कवायती करता, सगळं मान्य आहे. पण जीवन कोण बदलू शकतं? जी जीवन निर्माण करते,