परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी दिलेले मापदंड(9 Commandments given by Aniruddha Bapu)

३० ऑगस्ट २००९ रोजीच्या दैनिक प्रत्यक्षमध्ये आलेल्या अग्रलेखात परमपूज्य सद्गुरु बापूंनी त्यांना ‘काय आवडते व काय आवडत नाही’ हे स्पष्टपणे दिले होते. हे मांडताना ह्या अग्रलेखामध्ये बापूंनी ९ मापदंड दिले होते जे संस्थेशी निगडीत प्रत्येक कार्यकर्त्यासाठी राबविले जातात. संस्थेच्या कामात सेवा करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हे मापदंड कायमच लागू असतील. ह्या मापदंडांच्या आधारे प्रत्येक श्रद्धावानाला कुठल्याही अधिकारपदावर असलेल्या व्यक्तीचे वर्तन पारखण्याचादेखील पूर्ण अधिकार आहे.

 

या वर्षीच्या अनिरुध्दपौर्णिमेच्या माझ्या भाषणात म्हटल्याप्रमाणे ह्या मापदंडांची यादी देत आहे:

 परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी दिलेले मापदंड:

१. आन्हिक दररोज दोन वेळा करणे.

२. आन्हिक, रामरक्षा, सद्गुरुगायत्री, सद्गुरुचलीसा, हनुमानचलीसा व दत्तबावनी तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे. चार महिन्यांतून कमीत कमी एक रामनामवही लिहून पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे.

३. बरोबरच्या व हाताखालील सहकार्‍यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे. सहकार्‍यांची किंवा हाताखालील व्यक्तींची चूक झाल्यास त्यांना जरूर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये.

४. उपासनांच्या वेळेस त्या स्थळी असणार्‍या प्रत्येकाने ‘आपण उपासनांच्या वर आहोत किंवा आपल्यास उपासनेची आवश्यकता नाही’ असे वर्तन करू नये.

५. बोलण्यापेक्षा, बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

६. ह्या विश्‍वामध्ये कुणीही मानव ‘आपण एकमेव अव्दितीय आहोत व आपली जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करू शकत नाही’, असे म्हणू शकत नाहीव असे कुणीही मानू नये.

७. श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत.

८. चूक झाल्यास चूक सुधारण्याची तयारी पाहिजे.

९. परपीडा कधीच करता कामा नये. 

ह्याच अग्रलेखात वरील मुद्दांवर व त्यापुढे अधिक लिहिताना बापू म्हणाले होते की “पावित्र्य हेच प्रमाण’ ह्याच मूलभूत सिद्धांतानुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ गोष्टी ज्याच्याकडे नाहीत, तो माझ्या जवळचाच काय, परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही, हा माझा ठाम निश्चय आहे. तुमच्या हातात मी आज ‘मला काय आवडते व काय आवडत नाही’ ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरूनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत’.

हिंदी

Published at Mumbai, Maharashtra – India

Related Post

1 Comment


 1. Dear Baapu,

  My Baapu… My Sai… After reading this article, all I have to say is…

  Jigra fakira ho.. jigra fakira ho
  Saareyaan de dil di samajh da

  …Hove Rab sab taa saanjha
  Saareyaan de dil di samajhda

  Very True :)…

  Ambadnya,
  – Nitu

Leave a Reply