Home / Marathi / श्रीअनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ योगा’ तर्फे योगाचे प्रशिक्षण वर्ग (Yoga Classes)

श्रीअनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ योगा’ तर्फे योगाचे प्रशिक्षण वर्ग (Yoga Classes)

भारताला फार प्राचिन काळापासून योगाची परंपरा आहे. या विद्येची योग्य प्रकारे माहिती होऊन सर्व श्रद्धावानांना आरोग्यवान होण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ‘श्रीहेमाड्पंत प्राच्यविद्या प्रशाला’-Shree Hemadpant Prachyavidya Prashala’ अंतर्गत ‘श्रीअनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ योगा(Shree Aniruddha’s Institute of Yoga)’ तर्फे योगाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.

Aniruddha Bapu - Yoga Classes-small

योगाचे हे प्रशिक्षण वर्ग १५ मे २०१५ पासून सुरू होत असून मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस श्रीहरीगुरूग्राम (न्यु इंग्लिश स्कूल, वांद्रे- पूर्व)(New English School, Bandra-East) येथे घेण्यात येणार आहेत. या कोर्ससाठी वयोमर्यादा ३५ वर्षे ते ५० वर्षे इतकी आहे. प्रत्येक कोर्सचा कालावधी सहा महिन्याचा असून त्यासाठी देणगी मूल्य २०००/- असेल. स्त्रियांसाठी आणि पुरूषांसाठी वेगवेगळे वर्ग असून स्त्रियांच्या प्रशिक्षण वर्गाची वेळ सायंकाळी ७ ते ८ व पुरूषांच्या प्रशिक्षण वर्गाची वेळ रात्रौ ८.१५ ते ९.१५ पर्यंत अशी असेल.

या कोर्ससाठी उपलब्ध असणार्‍या जागा मर्यादित असल्यामुळे संस्थेच्या नियमानुसार प्रवेशाची प्रक्रीया केली जाईल. ज्या श्रद्धावनांना या संधीचा लाभ घेऊन प्रशिक्षण वर्गात प्रवेश घ्यायची इच्छा असेल त्यांनी गुरुवारी श्रीहरीगुरूग्राम येथील गेट नं३ जवळील काऊंटरवरून फॉर्म घेऊन तो गुरुवार दिनांक २३ एप्रिल पर्यंत श्रीहरीगुरुग्राम येथे किंवा रविवार व गुरूवार सोडून इतर दिवशी लिंक अपार्ट्मेंटस्‌, ५ वा मजला, खार येथील संस्थेच्य कार्यालयात आणून द्यावेत.

ll हरि ॐ ll    ll  श्रीराम ll   ll अंबज्ञ ll

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*