'तिसरे महायुद्ध' पुस्तक आणि आजचे वास्तव

हरि ॐ,

आजच्या भीषण जागतिक परिस्थितीला अनेक देश चीनला जबाबदार धरत आहेत.

News Links - https://sadguruaniruddhabapu.com/third-world-war-marathi/

मग अशा वेळेस मार्च २००६ सालापासून डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांनी दैनिक प्रत्यक्ष मध्ये चालू केलेल्या ’तिसरे महायुद्ध’ च्या लेखमालेची आठवण होते, जी लेखमाला नंतर डिसेंबर २००६च्या दत्तजयंती ह्या दिवशी ’तिसरे महायुध्द’ या नावाने पुस्तक रूपात प्रकाशीत झाली.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये डॉ. अनिरुद्ध म्हणतात, "पुढील काळात आजचे समीकरण उद्या असेलच असे नाही, तर अगदी सकाळी सातचे समीकरण सात वाजून पाच मिनीटांनी मूळ हेतू साध्य होताच पूर्णपणे भिरकावून दिलेले आढळणार आहे."

नाटोचा सदस्य असलेला टर्की (Turkey) हा देश रशियाचे लढाऊ विमान पाडूनही काही काळ रशियाचा मित्र होता व आज त्यांचे संबंध पुन्हा दूरावलेलेच आहेत; व त्याचबरोबर हा देश आता अमेरिकेपासून दूर गेलेला आहे. ह्या एकाच उदाहरणावरून वरील वाक्याची यथार्थता स्पष्ट होते. ह्या तिसर्‍या महायुद्धाविषयी लिहीताना डॉ. अनिरुद्ध म्हणतात, "दोन राष्ट्रांमधील लढाई त्या त्या राष्ट्रांमधील प्रत्येक घराच्या अंगणापर्यंत जाऊन पोहोचते व त्यामुळे फक्त दोन राष्ट्रांची सैन्ये लढत नाहीत तर दोन्ही राष्ट्रांमधील प्रत्येक नागरीक या लढाईत सहभागी असतोच. त्याचप्रमाणे विषारी वायू, जैविक बॉंब (रोगजंतूंचा प्रसार), व प्रचंड कृत्रिम पाऊस पाडून दलदल व सर्वत्र चिखल निर्माण करण्याची क्षमता (अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये जे केले) इत्यादीमुळे संपूर्ण राष्ट्राच्या रोजच्या व्यवहरात थोडीही सुरक्षितता उरत नाही."

ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये डॉ. अनिरुद्ध म्हणतात, "भारतातीलच काय परंतु जगातील प्रत्येक देशातील नव्वद टक्क्यांहून जास्त जनता युध्द, युद्धामागील राजकीय कारणे व त्यांची परिपूर्ती ह्यांविषयी फक्त जुजबी माहितीवरच युद्ध विषयक विचार करू शकते परंतु युद्धाचे परिणाम मात्र शंभर टक्के ह्या सामान्य जनतेलाच भोगायचेही असतात आणि पेलायचेही असतात."

तसेच आपल्या एका पुढील लेखामध्ये डॉ. अनिरुद्ध हे स्पष्ट करताना म्हणतात, "युद्ध प्रदीर्घ काळापर्यंत लांबते, तेव्हा राष्ट्रीय नेतृत्वाची व जनतेची खरी कसोटी लागते. सर्वसाधारणपणे कुठल्याही राष्ट्रातील सर्वसामान्य जनता, एका विशिष्ट मर्यादेबाहेर युध्दजन्य स्थितीच्या हालअपेष्टा सहन करू शकत नाही. ज्या राष्ट्रातील जनतेत असे काबाडकष्ट व हालअपेष्टा पचविण्याची ताकद प्रचंड प्रमाणात असते तेच राष्ट्र खरे बलवान होय."

या पुस्तकातील एक विशेष प्रकरण ’आधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्रभाव - ५’ हे, जैविक युध्द ह्याच विषयाला वाहिलेले आहे. ह्याविषयी डॉ. अनिरुद्ध म्हणतात, "...त्यामुळे एकदा का हा जैविक हल्ला झाला की एकीकडून दुसरीकडे रोग पसरतच राहतो व अ‍ॅटमबॉंबपेक्षाही अधिक विघातक परिणाम घडवून आणू शकतो. त्यामुळे अक्षरशः कोट्यावधी जनता रोगग्रस्त होऊ शकते व त्यामुळे राष्ट्राचा सामाजीक व आर्थिक कणाच मोडून पडू शकतो."

प्रस्तावनेमध्ये डॉ. अनिरुद्ध म्हणतात, "दरवर्षी कॅलेंडर (दिनदर्शिका) निघते, कारण त्यामागे एक निश्चित स्वरूपाचे गणिती सूत्र आणि रचना असते परंतु ह्या येणार्‍या ’तिसर्‍या महायुद्धाचे’ कॅलेंडर मात्र दररोज नवीन असेल." २००६ च्या एका लेखात डॉ. अनिरुद्ध असेही म्हणतात, "आता ज्याचे ’पडघम’ ऐकू येऊ लागले आहेत त्या महायुद्धामध्ये जगातील कमीत कमी ९० राष्ट्रे प्रत्यक्ष लढाया खेळतील आणि उरलेली सर्व राष्ट्रेसुद्धा कमीअधिक प्रमाणात या युद्धाशी निगडीत होतीलच."

२००६ साली जेव्हा हे पुस्तक लिहीले गेल तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता, असे खरचं काही घडेल का? ह्याविषयी डॉ. अनिरुद्धांनी म्हटले होते की, "हा अभ्यास आहे इतिहासाचा आणि सद्यः स्थितीचा आणि हे संशोधन आहे, जागतिक रंगमंचावरिल विविध पात्रांच्या मनोगतांचे. पुढे येणार्‍या वीस वर्षात अक्षरशः शेकडो ठिकाणी हजारो घटना घडणार आहेत ह्याची जाणीव प्रत्येक सुबुद्ध व अभ्यासू विचारवंताला होत आहे."

आज भीषण जागतिक सद्यः परिस्थितीमध्ये सर्व देश चीनकडे संशयाच्या नजरेने बघत आहेत व सध्या घडणार्‍या सर्व गोष्टींना तिसर्‍या महायुद्धाचा भाग मानून चीनला सर्वस्वी जबाबदार धरीत आहेत.

ह्या पुस्तकात डॉ. अनिरुद्ध स्पष्टपणे मांडतात की, "सर्व जगालाही (विशेषतः अमेरिकेला) त्रासदायक ठरू शकणारे एक भयप्रद "त्रिकूट’ जन्माला आलेले आहे. चीन, पाकिस्तान व नॉर्थ कोरिया. हे अभद्र त्रिकूट, त्याला चौथा भागीदार मिळताच संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटणार आहे. हा चौथा भागीदार इराण, जर्मनी किंवा सिरीया असू शकतो".

English     हिंदी