Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / आई ला आपले बाळ प्रियच असते (The mother loves her child) – Aniruddha Bapu‬

आई ला आपले बाळ प्रियच असते (The mother loves her child) – Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘आईला आपले बाळ प्रिय असतेच’ याबाबत सांगितले.

मानवाने स्वत:ची बुद्धी बाजूला ठेवायची नसते तर ती वापरायची असते, पण कशी, तर हृदयाला धरून. जशी आई आपल्या बाळावर प्रेम करते त्याप्रमाणे. बुद्धी असतेच तिला, तिला कळत असते की आपलं बाळ इतरांपेकक्षा दिसायला, बुद्धीने कमी आहे. तिच्या बुद्धीला कळत असतेच पण म्हणून तिच्या अत:करणाला पटणारे नसते. तिच्यासाठी तिचे बाळच सगळ्यात जास्त आवडते असते. तेथे दुसरे काही आड येत नाही. दुसर्‍याच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त मार्कस्‌ मिळाले त्याबद्दल चांगल्या बाईला कौतुक वाटेल परंतु तरीदेखील स्वत:च्या मुलावरच प्रेम जास्त असते.

स्वत:चे मूल कितीही वाईट, डॅंबिस, लबाड असलं तरी त्या मुलावर आईचे प्रेम असतेच, असायलाच पाहिजे. हे लक्षात ठेवा ही प्रत्येक आई ची गोष्ट आपल्या मोठ्या आई (आदिमाता)च्या बाबतीतही खरी आहे. तिलासुद्धा आपली बाळे कशीही असली तरी प्रियच असतात, असे आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*