श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 6) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 6) श्रद्धावानाला भगवंताच्या भक्तीतून विद्या प्राप्त होते. श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥