Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) – Aniruddha Bapu‬

मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) – Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच’ (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) याबाबत सांगितले.

आईच्या प्रेमळपणाचा उपयोग कोणाला होतो? तर जे बाळ सुधरायला बघते त्याला. जे बाळ आईशी खोटे बोलत, सतत काही लपवत रहातो, त्याला कधी तरी आईकडून आणि आईच्या अनुभवाचा फायदा मिळू शकेल का? नाही. आपण मोठ्या आईशी बोलतानाही अतिशय शांतपणे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मला हिच्याशी अत्यंत प्रामाणिक रहायचे आहे. अणि तसे रहायला मुळीच कष्ट पडत नाही. मोठ्या आईशी प्रामाणिकपणे रहाणे म्हणजे काय? तर दरवेळी चुकांचा पाढा वाचणे नव्हे. Please don’t do that.

रोज आपण काय चुकले याची यादी करायची आणि मोठ्या आईला सांगायचे का? – नाही, कान धरून उड्या मारायच्या का? – नाही, उठाबशा काढायच्या का? – नाही, मुस्कटात मारून घ्यायच्या का? – नाही. याची काहीही आवश्यक्यता नाही. मात्र तिच्यावर विश्वास वाढवत नेला पाहिजे की मोठी आई जे काही करते ते चांगलेच करते. आमच्यावर संकटे येतात तेव्हा आधार देणार कोण आहे? – हीच मोठी आई आहे.

मोठ्या आईचे आपल्यावर खूप प्रेम आहे हे प्रत्येक श्रद्धावानांना नीट माहीत पाहीजे. त्यासाठी श्रद्धावानाने फक्त शांतपणे आईकडे आज जे काही चुकीचे घडले असेल त्याबद्दल क्षमा मागायची. आणि स्वत:च्या मनामध्ये ‘चुका दुरुस्त कशा करता येतील’ याचा विचार करत रहायचे. मात्र कायम एक विश्वास ठेवा की ती मोठी आई आणि तिचा पुत्र या दोघांना माहीत नाही असे काहीच नाही. ज्याक्षणी एक क्षणभर जरी हा विचार आला की या माय लेकाला माहीत नाही किंवा कळू शकत नाही तेव्हा समझायचे की तिथून आपल्या अध:पतनाला सुरुवात झाली. ही एकच गोष्ट आयुष्यात कधीच होऊ देऊ नका, असे आपल्या बापूंनी सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*