श्रीअनिरुद्ध उपासना
सद्गुरु श्री अनिरुद्धांनी आपल्या प्रवचनांमधून अनेक वेळा सांघिक उपासनेचे महत्व सांगितले आहे. सांघिक उपासनेचा फायदा प्रत्येक श्रद्धावानास मिळावा या हेतूने श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांवर आठवड्यातून एक दिवस श्रीअनिरुद्ध उपासना केली जाते. श्रद्धावान स्वतःच्या व समाजाच्या सामर्थ्यवृद्धीसाठी आणि सद्गुरुंप्रती असलेला कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी या उपासनेत सहभागी होत असतात. तसेच अनेक ठिकाणी घरगुती उपासना केंद्रांवरही उपासना केली जाते. या उपासनेचा सर्वांना अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता यावा व इतर दिवशी देखील