Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / सूर्यकिरणांना हिरण्य असेही म्हटले जाते (The Sunrays are known as Hiranya) – Aniruddha Bapu

सूर्यकिरणांना हिरण्य असेही म्हटले जाते (The Sunrays are known as Hiranya) – Aniruddha Bapu

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सूर्यकिरणांना हिरण्य असेही म्हटले जाते’ याबाबत सांगितले.

The Sunrays are known as Hiranya

The Sunrays are known as Hiranya – Aniruddha Bapu

तुम्हाला धंदा करताना एक रुपयाची गोष्ट तुम्ही शंभर रुपयाला विकू शकत असाल, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा जीव जातो आहे. एक रुपयाची गोष्ट तुम्ही २ रुपयाला जरी विकली तरी ते चुकीचं आहे. हा एक भेद आम्हाला नीट करता आला पाहिजे. तुम्ही मिलावट करून करणार असाल तरी ते चुकीचं आहे. भेसळ करून विकणार असाल, चुकीचं आहे. तुम्ही चोरी करणार असाल, चुकीचं आहे. लबाडी करणार असाल तर चुकीचे आहे.

परंतु तुम्ही बिझनेस करा, तुम्ही नोकरी करा, अधिक नोकरी करा, अधिक श्रम करा, पण फसवणूक करुन काही करणार असाल राजांनो, खरंच सांगतो, मोह टाळा. त्याने कितीही प्रगती वाढली तरी ती अलक्ष्मीच आहे, अवदसाच आहे. ती बरोबर अशांती घेऊनच येते, दुर्गुण घेऊनच येते, व्यसनं घेऊनच येते आणि शेवटी दुःख आणि विनाश घेऊनच येते. ह्याला कधीही अपवाद झालेला नाही,

लक्षात ठेवा, या पृथ्वीतलावर किंवा कुठल्याही पृथ्वीतलावर राज्य ह्या विश्वामध्ये सैतानाचं नाही आहे, हे राज्य त्या आदिमातेचं आहे. सिंहासनावर ती अधिष्ठित आहे लक्षात ठेवा. राज्य तिचंच आहे, राज्य धर्माचंच आहे, पटतंय? १०८%? चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं….

हे गुह्यसूक्तम् आम्ही शांतपणे ऐकत राहिलो, तर आमचं आर्थिक जे आजारपण आलेलं आहे, तेसुद्धा दूर होईल, हे लक्षात ठेवा. पण भाव, एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु ऐसा। आणि दुसरं मोठं वाक्य काय आईचं? ‘माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते.’ पटतंय? नक्की? १०८%?

सो, चंद्राच्या, ह्या चांद्रमार्गाने म्हणजे श्रमाने, परिश्रम करीत आपण सगळे यशस्वी होणार आहोत. जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे। मात्र त्यासाठी, सूर्याच्या उन्हामध्ये श्रम करण्याची तयारी पाहिजे. समजलं? नक्की? सुवर्ण-किरणांचं दुसरं नाव हिरण्य आहे हे लक्षात ठेवा, असे सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*