Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / Significance Of Navratri Jagaran – Aniruddha Bapu‬

Significance Of Navratri Jagaran – Aniruddha Bapu‬

नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व – (Significance Of Navaratri Jagaran)

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व’ (Significance Of Navaratri Jagaran) या मुद्द्याबाबत सांगितले. नवरात्रीच्या रूपात जी संधी आपल्याला मोठी आईने उपलब्ध करून दिली आहे ती संधी आपण दवडू नये असेही बापू म्हणाले.

आम्हाला श्रीसूक्तम्‌(Shreesuktam) म्हणता येत असेल तर म्हणू, साधी ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ आरती जरी म्हणता येत असेल ती तरी आपण न चुकता नवरात्रीत म्हणत जाऊ. समजा घरी जर देवीचा फोटो नसेल, मूर्तीही नसेल, तरी काही हरकत नाही. इतर कोणत्याही देवाचा फोटो असेल त्या फोटोसमोर उभे राहून निदान रात्री तरी एकदा तरी आरती म्हणायला काय हरकत आहे? अगदी आरतीचे ताटही घेतले नाही तरी काही हरकत नाही. फक्त प्रेमाने आरती तरी म्हणता आलीच पाहिजे.

मोठ्या आईचे स्वागत करायला शिका. असेच केले पाहिजे तसेच केले पाहिजे, अमुकच करायचे तमुकच करायचे अशा कुठल्याही रूढींना जवळ करू नका. सजावट करावयाची जरूर करा. पण आपल्याला माहीत पाहिजे या ९ दिवसात आपण मोठ्या आईचा भाव रचतो.

जो श्रध्दावान नवरात्रीत मातृवात्सल्यविंदानम् व मातृवात्सल्य-उपनिषद्‍ या ग्रंथांचे पारायण व रात्र जागरण करतो, त्याच्या मस्तकावर मोठी आई हात ठेवतेच व आर्शिवाद देतेच. मोठी आई तिचा दिलेला शब्द नेहमी पाळतेच. आयुष्यात अशा संधी खूप कमी असतात. जर आपल्याला अशा प्रकारच्या संधी मिळत असतील तर ह्या संधींचं सोनं करायलाच हवं, याबाबत बापुंनी जे सांगितले, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*