Home / Marathi / श्रीश्वासम्‌ उत्सवाच्या सुखद स्मृति सदैव स्मरणात (Shreeshwasam Utsav Memories)

श्रीश्वासम्‌ उत्सवाच्या सुखद स्मृति सदैव स्मरणात (Shreeshwasam Utsav Memories)

Aniruddha Bapu - Shreeshwasam Utsav Memories forever

Aniruddha Bapu – Shreeshwasam Utsav Memories forever

४ मे २०१५ ते १० मे २०१५ या कालावधीत आपण श्रीश्वासम्‌ उत्सव आनंदात साजरा केला. या उत्सवादरम्यान अनुभवलेल्या सर्वच अध्यात्मिक कार्यक्रमांची मजा काही औरच होती. या उत्सवातील प्रत्येक गोष्ट मग ती परिक्रमा, पूजन, प्रसाद अर्पण, मुषक (mouse) काढणे, झालीच्या खालून जाऊन दर्शन घेणे, गुह्यसुक्तम्‌ (Guhyasooktam), उषा पुष्करणी वा जलकुंभ असो त्याची स्मृति सदैव आपल्या श्रद्धावानांच्या स्मरणात रहाणारच आहे.

या उत्सवानंतर अनेक श्रद्धावानांकडून श्रीश्वासम्‌ उत्सवाचे व्हिडिओ DVDच्या स्वरूपात मिळतील का याबाबत वारंवार विचारणा होत होती. परंतु आपल्या लाडक्या बापूंच्या अकारण कारुण्यामुळे हे सर्व व्हिडिओज्‌ माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पूर्णपणे नि:शुल्क असे उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे. त्यामुळे हवे तेव्हा आणि जिथे असू तिकडे श्रीश्वासम्‌ उत्सवाला नव्याने अनुभवता यावे यासाठी या उत्सवाच्या प्रत्येक दिवसाचे सर्व कार्यक्रम कव्हर करणारे व्हिडिओ बनविण्यात आले व ते सर्वांना Youtube Channelवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत, ज्यायोगे सर्वांना जितका वेळ पाहिजे तितक्या वेळ श्रीश्वासम्‌ उत्सव पुन्हा पुन्हा अनुभवता येईल.

त्यातील  स्थापनेचा व्हिडिओ, पहिल्या दिवसाचा व्हिडिओ, दुसर्‍या दिवशीचा व्हिडिओ, ह्या आधीच अपलोड करून देण्यात आलेला आहे. आता श्रीश्वासम्‌ उत्सवामधील ३र्‍या दिवसातील महत्वाच्या क्षणाचा समावेश असलेला व्हिडियो देत आहे. शिवाय पुढील ४थ्या  दिवसापासून ७व्या दिवसापर्यंतच्या प्रत्येक दिवसाचा एक व्हिडियो याप्रमाणे पुढील व्हिडिओ काही ठराविक दिवसांच्या अंतरावर दिले जातील.

 श्रध्दावान मित्रांना हे सर्व व्हिडिओज्‌ पुढिल लिंक वर पहावयास मिळू शकतील –
https://www.youtube.com/playlist?list=PLBD0APAye6s2G9u8h7sDX13bWnja8TSlT

याबाबत माझ्या श्रद्धावान मित्रांना अजुन काही बाबी सुचवाव्या वाटत असल्यास नक्कीच सुचवा ज्यायोगे आम्हास त्याप्रमाणे शक्य असेल तेथे सुधारणा करण्यास सोपे होईल.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*