श्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)

ll हरि ॐ ll
 
 ज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा - पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला बसणार्‍या श्रद्धावानांची उत्तरे देखील नित्यनूतन असतात. दर वेळेस नवीन काहीतरी सापडत असते. श्री साईसच्चरित म्हणजे खजिना आहे आणि तो साईनाथांनी लुटण्यासाठी उघडा ठेवलेला आहे. आता त्यातून आपण किती लुटतो हे आपण ठरवले पाहिजे. 
श्री साईनाथ म्हणतात, 
ऊतून चालिला आहे खजिना । एकही कोणी गाड्या आणीना । खणा म्हणतां कोणीही खणीना । प्रयत्न कोणा करवेना ॥१६२॥ ...अध्याय ३२
 
हा खजिना लुटण्यासाठी बापूंनी (अनिरुध्दसिंह) गाडी सुरु केली आहे पंचशील पारिक्षांच्या मार्गाने. आता प्रयत्न आम्हा सगळ्यांनाच करायचे आहेत, कारण साद्‌गुरूंना प्रत्येकाने "जोर काढावे" अशी इच्छा असते, आणि म्हणूनच साईनाथ पुढे म्हणतात  
मी म्हणें तो पैका खणावा । गाड्यांवारी लुटून न्यावा । खरा माईचा पूत असावा । तेणेंच भरावा भांडार ।।१६३॥ ...अध्याय ३२
बापूंनी त्यांच्या २ ऑगस्ट २०१२ च्या प्रवचनातून साईसच्चरित परिक्षेला का बसावे ते सांगितले होते. बापू (अनिरुद्धसिंह) म्हणाले होते, "साईसच्चरित पंचशील परिक्षा आम्ही का द्यायची? कारण जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा ह्या कथा आम्हांला अधिक चांगल्या प्रकारे समजतात. आज प्रत्येक भाषेत साईसच्चरित उपलब्ध आहे. ही परिक्षा आमची भक्ती अधिक चांगली होण्यासाठी असते. पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी मंदिरात कीर्तन व भजन करणे दैनंदिन दिनक्रमाचाच भाग असायचा. आज हे सर्व नाहीसे झाले आहे. पूर्वी दरवर्षी प्रत्येक तिथीप्रमाणे मग ती रामनवमी असो की आषाढी एकादशी असो त्या दिवसाच्या महात्म्यानुसार कीर्तने व्हायची. ज्यांनी हीच दरवर्षी होणारी कीर्तने नव्याने ऐकली त्यांचे आयुष्य बदलली. पंचशील परिक्षा म्हणजे श्री साईनाथांचे गुणसंकिर्तनच. तसेच साई - द गायडिंग स्पिरीट हा फोरम म्हणजे देखील गुणसंकिर्तनाची संधी आहे. वरील प्रवचनात बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे की, किर्तन व भजन हा दैनंदिन जीवनाचा भाग असायचा. हा फोरममधील गुणसंकिर्तन आपल्या नित्यक्रमातील एक भाग झाला तर आपली देखील आयुष्ये नक्की बदलतील.  ह्या फोरमसाठी मला आलेल्या प्रतिसादावरुन एक गोष्ट कळली ती म्हणेज, आपण साईसच्चरित आणखीन आनंद घेऊ शकू. 
साई आनंदवृत्तीची खाण । असलिया भक्त भाग्याचा जाण । परमानंदाची नाही वाण । सदैव परिपूर्ण सागरसा॥ 
 
श्री साईसच्चरित पंचशील परिक्षा, Aniruddha bapu, bapu, samirdada, aniruddha, happy home, Gurukshetram,श्री साईसच्चरित, पंचशील परिक्षा, सद्‍गुरु, साई, साईनाथ, सपटणेकर, हेमाडपंत, Sadguru, Sai, Hemadpant, Sainath, Forum, साईनाथ, हेमाडपंत, साई, साईबाबा, सद्गुरुकृपा, सद्गुरु, सपटणेकर, बाबा, श्रीसाईसच्चरित, रतनजी, श्रीसाईमहिमा, आद्यपिपा, Adyapipa, शिर्डी, sainath, saibaba, Sai, Sadgurukrupa, Sapatnekar, Baba, Shree Saichcharitra, Ratanji, Shree Saimahima, Shirdi, साईनाथ, Sainath, guiding, guide, spiritual, Hemadpant,
बापू श्रीसाई सच्चरितच्या पंचशील परिक्षांसाठी शिकवताना
आज मला जुन्या दिवसांची आठवण झाली जेव्हा बापूंनी (अनिरुद्धसिंह) पंचशील परिक्षा सुरु केल्या. तेव्हा बापू (अनिरुद्धसिंह) स्वतः शिकवित असत आणि परिक्षेच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना भेटही देत असत. तेव्हाची बापूंची (अनिरुद्धसिंह)  साईसचरितावरील श्रद्धा आणि त्यांच्या लेकरांनी परिक्षेला बसावे यासाठीची कळकळ अगदी तशीच नित्यनूतन आहे... हे तुम्हाला देखील जाणवेल. त्यासाठी २ ऑगस्टला २०१२ ला झालेल्या प्रवचनाची छोटीशी क्लिप पोस्टच्यावर दिली आहे. तसेच पंचशील परिक्षा ऑगस्ट २०१२ च्या प्रश्नपत्रिका देखील देत आहेत.ज्या तुम्ही खाली दिलेल्या लिंक्स्‌वर वाचू शकता.
 
 
 
पंचशील परिक्षेच्या बाबतीत बाबांचे बोल ध्यानात ठेवल्या पाहिजेत
करितां माझिया कथांचे श्रवण । तयांचे कीर्तन आणि चिंतन । होईल मद्भक्तीचें जनन । अविद्यानिरसन रोकडें ॥८२॥
  जेथें भक्ती श्रद्धान्वित । तयाचा मी नित्यांकित ।ये अर्थीं न व्हावे शंकित ।इतरत्र अप्राप्त मी सदा ॥८३॥
सद्भावें कथा परिसतां । निष्ठा उपजेल श्रोतयां चित्ता । सहज स्वानुभव स्वानंदता । सुखावस्था लाधेल ॥८४॥ ...अध्याय २
 
ll हरि ॐ ll