श्रीअश्‍वत्थमारुती पूजन ( Shree Ashwattha Maruti Pujan )

 
श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, Hanuman, Hanumant, Aswattha, Bajrangbali, Bheem, Chhota Bheem,  Maruti, Pavansut, Hanuman Chalisa,  God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
 
संत तुकारामांनी एका अभंगात म्हटल्या प्रमाणे "भक्तीचिया वाटा मज दाखवाव्या सुभटा". बापू (अनिरुद्धसिंह) नेहमी सांगतात की प्रत्येक भक्ताची भक्तीमार्गाची सुरुवात हनुमंतापासूनच होते. बापूंनी (अनिरुद्धसिंह) म्हणूनच सर्व श्रध्दावान मित्रांकरिता चालू केलेला भक्तीचा जल्लोष म्हणजेच श्रीअश्‍वत्थमारुती पूजन. बापूंनी  (अनिरुद्धसिंह) पहिला चालू केलेला उत्सव म्हणजे श्रीरामनवमी उत्सव, जो १९९६ साली सुरु झाला व त्यानंतर १९९७ साली श्रीअश्‍वत्थमरुती पूजन उत्सव बापूंनी (अनिरुद्धसिंह) सुरु केला.
 
श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, Hanuman, Hanumant, Aswattha, Bajrangbali, Bheem, Chhota Bheem,  Maruti, Pavansut, Hanuman Chalisa,  God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aanjaneya, Aanjaneya publications, Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
बापूंच्या देवघरातील हनुमंताची मूर्ती
 
उपासनेची माहिती: * ह्या उत्सवामध्ये बापूंनी (अनिरुद्धसिंह) स्वत:च्या हाताने पाषाणातून घडविलेली हनुमंताची मूर्ती स्थापन केली जाते. ही मूर्ती बापूंनी (अनिरुद्धसिंह) स्वत: छिन्नी-हातोडी हातात घेऊन घडवलेली आहे. बापू (अनिरुद्धसिंह) स्वत: उत्कॄष्ट मूर्तीकार आहेत. "मूर्ती घडवणे हा त्यांचा स्वभाव आहे" ह्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे या हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन सर्व श्रध्दावानांना घेता येते. पंचमुखहनुमानस्तोत्रामध्ये हनुमंताचे जसे वर्णन केलेले आहे त्या लक्षणांनी युक्त अशी ही हनुमंताची मूर्ती आहे. * ह्या मूर्तीच्या पुढे एका परातीमध्ये हनुमंताची छोटी मूर्ती ठेवली जाते. * मूर्तीच्यामागे अश्‍वत्थ वृक्षाचे प्रतिक म्हणून पिंपळाचे रोप ठेवले जाते. * मूर्तीच्या भोवती उसाच्या कांड्यांनी सजावट केली जाते. * हनुमंताच्या मूर्ती समोर धुनीमातेची स्थापना केली जाते. ही धुनी म्हणजेच भगवान हनुमंताची अंजनीमाता. ह्या दिवशी तिचेही पूजन केले जाते. ह्या धुनीमातेच्या बाजूला बसून प्रपाठक मंडळी श्रीहनुमानचलिसाचे अखंड पठण करतात. * श्रीहनुमंताचे षोडषोपचारे पूजन झाल्यानतंर पाच अविवाहीत पुरूष हनुमंताच्या मूर्तीला शेंदुरचर्चन करतात आणि मग सर्व श्रद्धावान भक्त ह्या मूर्तीला शेंदुर लावून दर्शन घेऊ शकतात. * सकाळचे पूजन झाल्यावर संपूर्ण दिवस श्रीपंचमुखहनुमत कवच, श्री संकटमोचन हनुमानस्तोत्र आणि "ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:" हा जप ५४ वेळा, असे सतत आवर्तन चालू राहते. * रात्रौ ९ वाजता पूर्णाहूती होते. * प्रत्येक श्रध्दावान भक्ताला ह्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीवर अभिषेक करता येतो.
बापू (अनिरुद्धसिंह) हनुमंताचा उल्लेख "माझा रक्षकगुरु" असाच करतात व म्हणूनच,
 
 
 
श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, Hanuman, Hanumant, Aswattha, Bajrangbali, Bheem, Chhota Bheem,  Maruti, Pavansut, Hanuman Chalisa,  God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aanjaneya, Aanjaneya publications, Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
 
१) श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌मधील श्रीमद्‌पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्र (क्षमायंत्र) ह्याच्या केंद्रस्थानी पंचमुखीहनुमंतच आहे.
 
२) श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे वर्षातून एकदा श्रीहनुमानचालिसा पठणाचा सप्ताह केला जातो. ह्या सात दिवसात दररोज कमीतकमी १०८  जपकांकडून कमीतकमी १०८ वेळा श्रीहनुमानचालिसाचे पठण केले जाते.
 
३) श्रीअश्‍वत्थमरुती पूजन हा उत्सव श्रावण महिन्यात श्रीगुरुकुल येथे साजरा केला जातो.
 
४) श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी व प्रत्येक उत्सवाला मेन स्टेजवर बापूंच्या (अनिरुद्धसिंह) मागे त्यांच्या "रक्षक गुरुंची" म्हणजेच हनुमंताची तसबीर स्थापन केलेली असते.
 
५) रत्‍नागिरीच्या तीर्थक्षेत्राचे नाव ’अतुलितबलधाम’ आहे आणि ह्याही ठिकाणी परमपूज्य बापूंच्या (अनिरुद्धसिंह) घरातील पंचमुखीहनुमंताची मूर्ती स्थापन केलेली आहे. म्हणूनच ह्या ठिकाणी दर वर्षी हनुमान पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.
 
६) बापू (अनिरुद्धसिंह) स्वत: नित्य सुंदरकांडाचे पठण करतात.
 
७) बापू (अनिरुद्धसिंह), नंदाई व सुचितदादा स्वत: वर्षातून कमीतकमी एकदा १०८ वेळा हनुमानचलिसा पठण करतात व त्यांच्या नित्य उपासनेमध्ये हनुमान चलिसा, भीमरूपी महारुद्रा स्तोत्र आणि पंचमुखीहनुमत्कवच ह्या स्तोत्रांचे पठण होते. आपल्या श्रद्धावान मित्रांनीही अशा प्रकारे पठण करावे अशी बापूंची (अनिरुद्धसिंह) इच्छा असते.
 
८) वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्या काळास बापूंनी (अनिरुद्धसिंह) ’श्रीगुरुचरणमास’ असे नाव दिले आहे व ह्या एक महिन्याच्या काळामध्ये सर्व श्रध्दावान मित्रांनी कमीतकमी एक दिवस तरी हनुमान चलिसाचे १०८ वेळा पठण करावे असे बापू (अनिरुद्धसिंह) सांगतात.
 
९) श्रीहरिगुरुग्राम येथील नित्य उपासना जेव्हा सुरु झाली व सुरुवातीस बापू (अनिरुद्धसिंह) आणि त्यानंतर सूचितदादा स्वत: उपासनेला बसावयाचे तेव्हा नित्य उपासनेमध्ये श्रीपंचमुखीहनुमत्कवच म्हटले जायचे व आता त्या ऎवाजी "ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:" हा जप घेतला जातो.
 
१०) काही वर्षांपूर्वी श्रीहरिगुरुग्राम येथील उपासनेच्या वेळी प्रपाठक मंडळी स्टेजवर बसून "भीमरूपी महारुद्रा" ह्या स्तोत्राचे पठण करत असत.
 
११) श्रीहरिगुरुग्राम येथे आराधनाज्योती उपासना काळामध्ये बापूंनी (अनिरुद्धसिंह) हनुमंताच्या अनेक उपासना श्रध्दावान मित्रांकडून करून घेतल्या होत्या.
 
१२) बापूंच्या (अनिरुद्धसिंह) हॅपीहोममधील दुसर्‍या मजल्यावरील ऑफिसमध्ये पंचमुखीहनुमंताचा व दास हनुमंताचा फोटॊ लावलेला आहे.
 
१३) श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी प्रवचन व सत्संगानंतर बापूंचे (अनिरुद्धसिंह) दर्शन घेण्याच्या कालावधीमध्ये गजर घेतले जातात व त्याची सुरुवात श्रीहनुमानचलिसेनेच होते.हा हनुमंत हे एकमेव असे दैवत आहे जो आम्हा सर्व श्रध्दावानांचा देवही आहे आणि श्रीरामाचा भक्तही आहे; हे समजानून सांगण्यासाठी परमपूज्य बापूंनी (अनिरुद्धसिंह) श्रीरामरक्षेच्या प्रवचनांमध्ये श्रीहनुमंताची भक्ती का व कशी करायची हे ही समजावून सांगितले.म्हणून बापू (अनिरुध्दसिंह) म्हणतात की हनुमंत व हनुमंताचा महाप्रताप विषद करणार्‍या सुंदरकांडाएवढं सुंदर ह्या जगात दुसरं काहीही नाही.
 
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकॄशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्‌ l सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ll
 
For English version of this please click here