श्रीअनिरुद्ध उपासना

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी आपल्या प्रवचनांमधून अनेक वेळा सांघिक उपासनेचे महत्व सांगितले आहे. सांघिक उपासनेचा फायदा प्रत्येक श्रद्धावानास मिळावा या हेतूने श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांवर आठवड्यातून एक दिवस श्रीअनिरुद्ध उपासना केली जाते. श्रद्धावान स्वतःच्या व समाजाच्या सामर्थ्यवृद्धीसाठी आणि सद्गुरुंप्रती असलेला कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी या उपासनेत सहभागी होत असतात. तसेच अनेक ठिकाणी घरगुती उपासना केंद्रांवरही उपासना केली जाते.

या उपासनेचा सर्वांना अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता यावा व इतर दिवशी देखील घरी उपासना सहजतेने करता यावी म्हणूनअनिरुद्ध भजन म्युझिकया अॅपवर मराठी व हिंदी भाषेतील ’श्रीअनिरुद्ध उपासना’ अपलोड करण्यात आली आहे. याचा लाभ घेऊन श्रद्धावानांना "भक्तिभाव चैतन्याचा" आनंद नक्कीच लुटता येईल. इतर भाषांमध्ये ही उपासना लवकरच उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयास आहे.

। हरि ॐ ।श्रीराम । अंबज्ञ । । नाथसंविध् ।


सद्गुरु श्री अनिरुद्धजी ने अपने प्रवचनों के माध्यम से कई बार सांघिक उपासना का महत्त्व बताया है। सांघिक उपासना का लाभ हर श्रद्धावान उठा सकें, इस हेतु से श्री अनिरुद्ध उपासना केंद्रों पर हफ्ते में एक दिन श्रीअनिरुद्ध उपासना की जाती है। श्रद्धावान स्वयं की तथा समाज की सामर्थ्यवृद्धि ते लिए और सद्गुरु के प्रति होनेवाला कृतज्ञताभाव व्यक्त करने के लिए उपासना में सहभागी होते हैं। साथ ही, कई जगहों पर घरों में आयोजित किये जानेवाले उपासना केंद्रों पर भी उपासना की जाती है।

इस उपासना का लाभ सब लोग अधिक अच्छी तरह से उठा सकें और अन्य दिनों में भी घर में उपासना आसानी से कर सकें इसलिएअनिरुद्ध भजन म्युझिकइस अॅप पर मराठी एवं हिंदी भाषा में ’श्रीअनिरुद्ध उपासना’ अपलोड की गई है। इसका लाभ उठाकर श्रद्धावान "भक्तिभाव चैतन्य" का आनंद यकीनन ही प्राप्त कर सकते हैं। अन्य भाषाओं में भी यह उपासना जल्द ही उपलब्ध करा देने के प्रयास जारी हैं।

। हरि ॐ ।श्रीराम । अंबज्ञ । । नाथसंविध् ।

समीरसिंह दत्तोपाध्ये दिनांक - २५-०३-२०१९