श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा ( Shree Aniruddha Gurukshetram Seva )

श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा ( Shree Aniruddha Gurukshetram Seva )

श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा

Shree Aniruddha, Gurukshetram, Seva, temple, Rudram Seva, Aarti, Chandikakul, Mahishasurmardini, Trivikram, Happy home, Khar, Mahadurgeshwar, deity, Pujan, Rudra, Dattayag, Chandika, Havan, goddess, abhishek, bell, ghanta, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aanjaneya, Aanjaneya publications, Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
रुद्रसेवा
ज सोमवार, तोही श्रावणातला. दर सोमवारी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे रुद्रसेवा असते. प्रत्येक श्रद्धावान या रुद्रसेवेमध्ये सहभागी होऊ शकतो. हा विधी चालू असताना इतर स्तोत्रांच्या व्यतिरिक्त ११ वेळा श्रीरुद्रपठण केले जाते व त्यावेळी प्रत्येक श्रद्धावान श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक करू शकतो आणि पूजनात सहभागी होऊ शकतो. ही मूर्ती बापूंच्या (अनिरुध्दसिंह) देवघरातील असून, दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे सर्व श्रद्धावानांच्या दर्शनाकरिता आणली जाते. श्रीहरिगुरुग्राम येथे नित्य उपासना झाल्यानंतर ह्याच मूर्तीचे पूजन होते व सदगुरु बापू (अनिरुद्धसिंह) सुद्धा त्यांचे प्रवचन सुरू होण्या आधी ह्या मूर्तीचे पूजन करून मग प्रवचनाला सुरुवात करतात.
 
Shree Aniruddha, Gurukshetram, Seva, temple, Rudram Seva, Aarti, Chandikakul, Mahishasurmardini, Trivikram, Happy home, Khar, Mahadurgeshwar, deity, Pujan, Rudra, Dattayag, Chandika, Havan, goddess, abhishek, bell, ghanta, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aanjaneya, Aanjaneya publications, Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
रुद्रसेवा
दर सोमवारी होणार्‍या ह्या रुद्रसेवेमध्ये ११ भक्तांना सहभागी होता येते. फक्त श्रावण महिन्यातील सोमवारी १६ श्रद्धावानांसाठी अभिषेक व पूजनाची सोय करण्यात आली आहे.
 
ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सायंकाळी ५.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.
 
त्याचबरोबर श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे श्रद्धावान खालील सेवांमध्ये सहभागी होऊ शकतात.
१) पुष्प सेवा:
सेवेचे स्वरूप: ह्या सेवेमध्ये भाग घेणार्‍या श्रद्धावानातर्फे, सेवेच्या दिवशी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मधील सर्व देवतांना हार व पुष्प अर्पण केली जातात. त्याचबरोबर, त्या श्रद्धावानाला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मधील "श्रीत्रिविक्रमाला" स्वत:च्या हस्ते हार अर्पण करता येतो.
 
सेवेच्या दिवशी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌तर्फे त्या श्रद्धावानास श्रीफळ प्रसाद स्वरूपात देण्यात येते. सेवेच्या दुसर्‍या दिवशी श्रद्धावान, त्याच्या तर्फे आदल्या दिवशी अर्पण केलेली सर्व पुष्पं व हार प्रसादस्वरूपात घरी नेऊ शकतो. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सकाळी ११.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.
 
२) आरती सेवा (सायंकाळची):
सेवेचे स्वरूप: ह्या सेवेमध्ये भाग घेणार्‍या श्रद्धावानास श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे सायंकाळी गाभार्‍यातील सर्व देवतांची, तसेच श्रीत्रिविक्रमाची आरती करावयास मिळते. आरती खालील क्रमाने घेतली जाते.
 
अ) साईनाथांची "आरती साईबाबा.." ही आरती
ब) सदगुरु बापूंची (अनिरुद्धसिंह) "आरती अनिरुद्धा.." ही आरती
क) सदगुरु बापूंची (अनिरुद्धसिंह) "ॐ जय अनिरुद्ध प्रभो.." ही आरती
 
ही आरती म्हणतेवेळी श्रद्धावानांना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌तर्फे हातात आरतीचे तबक दिले जाते व त्यांना स्वहस्ते देवतांना ओवाळता येते. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सायंकाळी ७.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.
 
३) श्रीदत्तकैवल्य याग सेवा:
Shree Aniruddha, Gurukshetram, Seva, temple, Rudram Seva, Aarti, Chandikakul, Mahishasurmardini, Trivikram, Happy home, Khar, Mahadurgeshwar, deity, Pujan, Rudra, Dattayag, Chandika, Havan, goddess, abhishek, bell, ghanta, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aanjaneya, Aanjaneya publications, Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
श्रीदत्तकैवल्य याग
सेवेचे स्वरूप: ह्या सेवेमध्ये भाग घेणार्‍या श्रद्धावानास श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे दर शनिवारी संपन्न होणार्‍या "श्रीदत्तकैवल्य याग" ह्या विधीमध्ये व्यक्तिगतरित्या सहभागी होता येते. ह्या विधीमध्ये इतर स्तोत्रांव्यतिरिक्त श्रीदत्तमालामंत्राची २६ वेळा अशी दोन आवर्तनं होतात.
 
ह्या सेवेसाठी एकावेळी एकूण १० श्रद्धावान सहभागी होऊ शकतात. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सायंकाळी ५.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.
 
४) दीपमाळ सेवा:
सेवेचे स्वरूप: ह्या सेवेमध्ये भाग घेणारे श्रद्धावान सूर्यास्तानंतर श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये प्रथम पणत्या प्रज्ज्वलित करतात व त्यानंतर त्याच पणत्या श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मधील दीपमाळेवर लावतात. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सायंकाळी ६.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.
 
५) श्रीचण्डिका हवन:
Shree Aniruddha, Gurukshetram, Seva, temple, Rudram Seva, Aarti, Chandikakul, Mahishasurmardini, Trivikram, Happy home, Khar, Mahadurgeshwar, deity, Pujan, Rudra, Dattayag, Chandika, Havan, goddess, abhishek, bell, ghanta, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aanjaneya, Aanjaneya publications, Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
श्रीचण्डिका हवन
ह्या विधीमध्ये श्रद्धावान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌च्या प्राकारात बसून चण्डिकामातेसमोर हवन करू शकतात. हवन करतेवेळी श्रीआदिमाता शुभंकर स्तवन आणि श्रीआदिमाता अशुभनाशिनी स्तवनाची अखंड आवर्तनं चालू असतात. प्रत्येक आवर्तनानंतर सदगुरु बापूंच्या (अनिरुद्धसिंह) आवाजातील स्वाहाकार मंत्र लावला जातो. एकूण ३ घटिका, म्हणजे ७२ मिनिटांसाठी हे हवन चालू असते. ह्या सेवेसाठी एकावेळी एकूण ४ श्रद्धावान सहभागी होऊ शकतात. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सकाळी ८.०० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.
वरील सर्व सेवांसाठी श्रद्धावान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये सकाळी ८.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत आगाऊ नोंदणी करू शकतात.
हरि ॐ