सप्तमातृका पूजन (Saptamatruka Pujan) - Marathi

English Hindi Kannada Tamil

गुरुवार, दि. २४ ऒक्टोबर २०१३ रोजी परमपूज्य बापूंनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रवचन केले. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या बाळाचं जीवन निरोगी असावं आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं. ह्या दृष्टीकोनातून पूर्वापार परंपरेनुसार घरात बाळ जन्माला आल्यानंतर षष्ठी पूजन केलं जातं. मात्र काळाच्या ओघात चुकीच्या रूढी जोपासल्या गेल्या कारणाने ह्या पूजनाचे महत्त्व फक्त कर्मकांडापुरते मर्यादित राहिले. ह्या पूजनाचा उद्देश, त्याचे महत्व आणि मूळ पूजनपद्धती ह्याबद्दल परमपूज्य बापूंनी प्रवचनातून मार्गदर्शन केले.

परमपूज्य बापू म्हणाले, "ब्रह्मर्षींमध्ये पहिल्यांदा आई झालेल्या लोपामुद्रा (अगस्त्य ऋषींची पत्नी) आणि अरुंधती (वसिष्ठ ऋषींची पत्नी) हया एकाच वेळेस प्रसूत झाल्या. अगस्त्य-लोपामुद्रा व वसिष्ठ-अरुंधती, ह्या चौघांनी आपापल्या बाळांचे जे पहिलं पूजन केले त्याला ’सप्तषष्ठी पूजन’ म्हणून संबोधण्यात आले.

मातृवात्सल्यविंदानम् मध्ये आपण वाचतो की शुंभ-निशुंभ ह्या राक्षसांशी लढण्याची वेळ आल्यावर महासरस्वतीच्या मदतीसाठी सगळे देव आपापल्या शक्ती पाठवतात. त्या सात शक्ती म्हणजेच सप्तमातृका व त्यांची सेनापती आहे काली. त्या सात मातृकांची नावे खालीलप्रमाणे आहेत. १) माहेश्वरी - जी पंचमुखी आहे आणि वृषभावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात त्रिशूळ आहे. २) वैष्णवी - जी गरुडावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, गदा आणि पद्म आहे. ३) ब्रह्माणी - जी चार मुख असलेली आहे आणि हंसावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात कमंडलू व अक्षमाला आहे. ४) ऐन्द्री - जी इंद्राची शक्ती आहे आणि ऐरावतावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र आहे. ५) कौमारी - जी सहा मुख असलेली आहे आणि मोरावर आरूढ झालेली आहे. ६) नारसिंही - जिचे मुख सिंहीणीचे आहे. तिच्या हातात गदा व खडग् आहे. ७) वाराही - जिचे मुख वराहाचे आहे व जी पांढऱ्या रंगाच्या रेड्यावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, खडग्, तलवार व ढाल आहे."

सप्तमातृका3

ह्या सप्तमातृकांचे पूजन म्हणजेच ’सप्तषष्ठी पूजन’. स्वत: बापूंच्या जन्मानंतर त्यांच्या घरामध्ये हे पूजन मूळ पद्धतीनुसार करण्यात आले. पूजनामध्ये वापरण्यात येणारी ह्या सप्तमातृकांची छबी बापूंनी २४ ऒक्टोबर २०१३ च्या प्रवचनाच्या वेळी सर्व श्रद्धावानांना दाखवली. त्या पूजनाची महती सांगताना बापू पुढे म्हणाले, "शुंभ व निशुंभ ह्यांचा वध झाल्यानंतर शुंभाचा पुत्र दुर्गम मात्र त्यातून वाचला. त्याला कावळ्याचं रूप दिलं गेलं म्हणून तो वाचला असे नाही, तर त्याला पाहून ह्या सात सेनापतींचे मातृभाव जागृत झाले व म्हणून त्यांनी मातृत्वाच्या भावनेने शत्रूच्या बालकालाही जीवदान दिले. ह्या त्यांच्या कृत्याने प्रसन्न झालेल्या महासरस्वतीने त्यांना आशीर्वाद दिला की, ’जो मानव त्याच्या घरी बाळ जन्माला आल्यानंतर त्यांचे (म्हणजे त्या सात मातृकांचे) पूजन करेल, त्या बाळांच्या तुम्ही रक्षणकर्त्या बनाल.’ म्हणून घराघरात बाळ जन्माला आल्यानंतर ह्या सप्तमातृकांचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली."

त्यानंतर बापूंनी हे पूजन कसे करायचे ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

पूजनाची मांडणी :

१) एक पाट घ्यायचा. त्याच्या खाली ‘स्वस्तिक’ किंवा ‘श्री’ रांगोळीने काढावे कारण ही मंगलचिन्ह आहेत. पूजनाची मांडणी पाटावरच करायची, चौरंगावर किंवा टेबलवर करू नये कारण मोठ्या आईसमोर आपण सगळे तिची बाळंच असतो. बाळ पहिलं पाऊल पाटाच्या उंचीचच टाकणार आणि म्हणून पूजनाच्या मांडणीमध्ये पाटच वापरावा. २) पाटावर शाल / सोवळं / चादर अंथरावे. पाटाभोवती रांगोळी काढली तरी चालेल. ३) एका ताम्हनात काठोकाठ सपाट गहू भरावेत. ४) त्यात मध्यभागी एक व त्याच्या भोवती सहा सुपाऱ्या ठेवाव्यात. ५) पाटावर ताम्हनाच्या दोन्ही बाजूला दोन नारळ ठेवावेत. नारळास हळद कुंकू लावावे. ६) दोन्ही नारळांच्या आतल्या बाजूला, ताम्हनाच्या समोर लाल अक्षतांच्या राशी कराव्यात. ह्या राशी म्हणजे देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विनीकुमारांच्या पत्‍नी आहेत. ह्या सख्ख्या जुळ्या बहिणी आहेत व त्यांना जरा आणि जिवंतिका अशी नावे आहेत. हया दोघीही अश्विनीकुमारांप्रमाणे एकमेकांशिवाय राहत नाहीत आणि ह्या दोघीही बाळं लहान असताना त्यांच्याशी खेळत असतात, त्यांचं लालन-पालन करत असतात अशी धारणा आहे. तीन महिन्यांची होईपर्यंत बाळं जेव्हा जेव्हा हसत असतात, तेव्हा ते हास्य म्हणजे बाळांचा ह्या दोघींना दिलेला प्रतिसाद असतो.    अ) जरा म्हणजे म्हातारपण देणारी. बाळ खूप-खूप म्हातारं होईपर्यंत जगू देत असा ती आशीर्वाद देते.    ब) जिवंतिका म्हणजे बाळाच्या जीवनाच्या अंतापर्यंत त्याचं आरोग्य सांभाळीन असा आशीर्वाद देणारी. ७) पाटावर चार दिशांना चार विडे ठेवावेत. त्यावर सुपाऱ्या ठेवाव्यात. पूजनात विडे ठेवणं म्हणजे देवाला ‘आवाहन’ करणं. विडा-सुपारीने केलेलं आवाहन हे कुठल्याही मंत्राशिवाय केलेलं आवाहन असतं हे साक्षात आदिमातेच्या कात्यायनी स्वरूपाने सांगितलेलं आहे. विडे ठेवले की देवाला आमंत्रण पोहोचतच कारण हा कात्यायनीचा संकल्प आहे. ८) ताम्हनाच्या मागच्या बाजूला ताम्हनाला टेकून सप्तमातृकांचा फोटो ठेवावा.

सप्तमातृका-पूजन-मांडणी3

पूजनविधी :

 १) हे पूजन सूर्योदय ते सूर्यास्त ह्या वेळेतच करावं. कुठल्याही दिवशी हे पूजन केलं तरी चालेल. अमावास्येच्या दिवशी केलं तरी चालेल. २) बाळ जन्माला आल्यानंतरचं पहिलं पूजन हे बाळाच्या वडिलांनीच करावं. पूजन करताना वडिलांनी बाळाला निदान थोडावेळ तरी मांडीवर घेऊन बसायचं. हे पूजन बाळ जन्मल्यानंतर तीन दिवसांनंतर कधीही केलं तरी चालेल. ३) पूजनाला सुरुवात करताना सर्वप्रथम ’वक्रतुण्ड महाकाय...’ हा श्लोक म्हणावा. ४) त्यानंतर गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणावा व त्यानंतर सद्‌गुरूंचे नाम घेणे आवश्यक आहे. ५) विड्यांवरील सुपार्‍यांवर हळद, कुंकु, अक्षता व गंध वहावे. कुंकु शक्यतो ओले करून लावावे. त्यानंतर ताम्हनातील सुपार्‍यांवर हळद, कुंकु, अक्षता व गंध वहावे. ६) त्यानंतर मातृवात्सल्यविन्दानम् मधील ‘नवमंत्रमाला स्तोत्रमचे’ पठण करत पूजन करावे. हे स्तोत्र एकदा म्हटलं तरी चालेल किंवा कितीही वेळा म्हटलं तरी चालेल. ७) स्तोत्र पठण करताना गंधाक्षत सुगंधीत फुलं अर्पण करावीत. सुगंधीत फुलं नसतील तर साधी फुलं सुद्धा चालतील. फुलं सुपार्‍यांवर, सप्तमातृकांच्या तसबीरीला व जरा जिवंतिकाचे प्रतीक असणार्‍या अक्षतांच्या राशींवरही अर्पण करावीत. स्तोत्रपठण करताना फक्त पहिल्या आवर्तनाच्या वेळेसच फुले अर्पण करावीत. ८) त्यानंतर दीप व धूप करावा. ९) त्यानंतर नैवेद्याची सात ताटं तयार करावीत व पुरणा-वरणाचा नैवेद्य  अर्पण करावा. त्याचबरोबर गूळ-खोबर्‍याची वाटी हा नैवेद्यही अर्पण करावा. काही कारणाने नैवेद्याची सात ताटे अर्पण करता येत नसतील, तर फक्त गूळ-खोबर्‍याचा नैवेद्य अर्पण करावा. 

पुरणा-वरणाचा-नैवेद्य पुरणा-वरणाचा-नैवेद्य

१०) नैवेद्य अर्पण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी शक्य झाल्यास कमळाची फुलं अर्पण करावीत कारण ‘कमळ’ हे ह्या देवतांचं आवडतं पुष्प आहे."

बापू पुढे म्हणाले, "बाळ जन्माला आल्यानंतरचं पहिलं पूजन हे बाळाच्या वडिलांनीच करावं. पूजन चालू असताना बाळाच्या आईने थोडा वेळ तरी पूजेसाठी बसावं व पूजोपचार करावेत. मात्र मूळ पूजन हे बाळाच्या वडिलांनीच करायचं आहे. काही कारणाने जर बाळाचे वडिल पूजनाच्या वेळेस उपलब्ध नसतील तर पितामह (बाळाच्या वडिलांचे वडिल) किंवा मातामह (बाळाच्या आईचे वडिल) हे पूजन करू शकतात. समजा ते सुद्धा उपलब्ध नसतील तर नात्यातील कुठल्याही जवळच्या पुरुष व्यक्तीने हे पूजन करावे. बाळ मोठं झाल्यानंतर मात्र हे पूजन आई आपल्या मोठ्या बाळासाठी कधीही करू शकते. ह्यासाठी वयाचं कसलंच बंधन नाही. तुम्ही तुमच्या बाळांचं कितीही वेळा हे पूजन करू शकता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी करा, बाळ आजारपणातून बरं झालं की करा, किंवा इतर कुठल्याही दिवशी करा. अशावेळी हे पूजन माता-पिता एकेकटे किंवा एकाच वेळी दोघेही करू शकतात. त्याचप्रमाणे एकदा पूजन केलं की परत केलंच पाहिजे असंही नाही. समजा घरात एकापेक्षा जास्त बाळं असतील, तर प्रत्येकासाठी वेगवेगळं पूजन केलेलं कधीही श्रेयस्कर. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे वेळ मिळत नसेल, तर सगळ्या बाळांसाठी मिळून एक पूजन केलं तरी चालेल. 

Saptamatruka Poojanधनलक्ष्मी पूजनाच्या दिवशी, म्हणजे शुक्रवार, दि. १ नोव्हेंबर २०१३ रोजी सप्तमातृकांची तसबीर सर्व श्रद्धावानांसाठी श्रीहरिगुरुग्राम येथे उपलब्ध होईल.

त्याचप्रमाणे सप्तमातृकांचे पूजन करण्यासाठी लागणार्‍या ’नवमंत्रमाला स्तोत्रम’ची संस्कृतमधील पदच्छेद केलेली प्रत, तसेच मराठी व हिंदीतूनही स्तोत्राच्या प्रती ह्या पोस्टमध्ये जोडत आहे. परमपूज्य बापूंनी सांगितल्याप्रमाणे पूजनाच्या वेळी हे स्तोत्र संस्कृत, मराठी किंवा हिंदी ह्या तीनही भाषांपैकी कुठल्याही भाषेतून म्हटलं तरी चालेल.

॥ हरि ॐ ॥

अथ नवमन्त्रमालास्तोत्रम्।

(पदच्छेद)

या माया मधुकैटभ-प्रमथनी या महिषोन्मूलिनी

या धूम्रेक्षण-चण्डमुण्ड-मथनी या रक्तबीजाशनी।

शक्ति: शुम्भनिशुम्भ-दैत्य-दलिनी या सिद्धिलक्ष्मी: परा

सा चण्डि नव-कोटि-मूर्ति-सहिता मां पातु विश्वेश्वरी॥

 

स्तुता सुरै: पूर्वम्-अभीष्ट-संश्रयात् तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता।

करोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद:॥

 

या सांप्रतं चोद्धत-दैत्य-तापितै: अस्माभिरीशा च सुरैर्-नमस्यते।

करोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद:॥

 

या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति न: सर्वापदो भक्ति-विनम्र-मूर्तिभि:।

करोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद:॥

 

सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरि।

एवमेव त्वया कार्यं अस्मद्-वैरि-विनाशनम् ॥

 

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥

 

सृष्टि-स्थिति-विनाशानां शक्तिभूते सनातनि।

गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते॥

 

शरणागत-दीनार्त-परित्राण-परायणे।

सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते॥

 

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति-समन्विते।

भयेभ्यस्-त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते॥

______________________________________________________________________ 

 ॥ हरि ॐ ॥

॥ अथ नवमन्त्रमालास्तोत्रम् ॥

(मराठी)

 

जी माता मधु-कैटभ-घातिनी        मर्दी जी महिषासुरां

जी धूम्रेक्षण-चण्ड-मुण्ड-नाशिनी   वधे रक्तबीजासुरां।

निर्दाळी शुम्भ-निशुम्भ-दैत्यां        जी सिद्धिलक्ष्मी परा

ती चण्डिका नव-कोटी-मूर्ति-सहिता   प्रतिपाळो आम्हां लेकरां ॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

 

अभीष्ट-पूर्तिसाठी देवादिकांनी    स्तविली भजिली जिला ती आदिमाता।

शुभहेतुरीश्‍वरी ती माय आमुची   करो शुभभद्र, हरो सर्व आपदा॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

 

उन्मत्त दैत्यांमुळे गांजलेल्या    आमुचे क्षेम करो पराम्बा सुरवन्दिता।

शुभहेतुरीश्‍वरी ती माय आमुची   करो शुभभद्र, हरो सर्व आपदा॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

 

जी स्मरण करताचि हरे दु:खक्लेश । भक्तिशील आम्ही तिला शरण असता।

शुभहेतुरीश्‍वरी ती माय आमुची   करो शुभभद्र, हरो सर्व आपदा॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

 

सर्वबाधांचे प्रशमन           करी त्रैलोक्याची अखिलस्वमिनी।

आमुच्या वैर्‍यांचे निर्दालन   करावे हेचि त्वा भक्त-उद्धारिणी॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

 

सर्वमंगलांच्या मांगल्ये   शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यम्बके गौरी   नारायणी नमो अम्बिके॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

 

सृष्टीची उत्पत्ति स्थिति लय   करी जी आद्यशक्ति सनातनी।

वन्दितो गुणाश्रये गुणमये     वात्सल्यनिलये नारायणी॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

 

शरणागत पामर लेकरां       तत्पर जी प्रतिपालनी।

प्रणाम तुज सर्वपीडाहारिणी   क्षमास्वरूपे नारायणी॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

 

सर्वस्वरूपे सर्वेश्‍वरी   सर्वशक्ति-समन्विते।

भयापासून रक्षी आम्हां   देवी दुर्गे आदिमाते॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करो बाळाचे संरक्षण मातृकासम्राज्ञी॥

  ______________________________________________________________________

॥ हरि ॐ ॥

॥ अथ नवमन्त्रमालास्तोत्रम्॥

(हिन्दी)

 

जो माता मधुकैटभ-घातिनी        महिषासुरमर्दिनी

जो धूम्रेक्षण-चण्डमुण्ड-नाशिनी      रक्तबीज-निर्मूलिनी।

जो है शुम्भनिशुम्भ-दैत्यछेदिनी     जो सिद्धिलक्ष्मी परा

वह चण्डिका नवकोटीमूर्तिसहिता   चरणों में हमें दें आसरा ॥

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

अभीष्ट-पूर्तिहेतु सुरगणों ने   की जिसकी स्तुति भक्ति वह आदिमाता।

शुभहेतुरीश्‍वरी वह माँ हमारी    करें शुभभद्र, हरें सर्व आपदा॥

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

उन्मत्त दैत्यों से ग्रस्त हैं हम     करो क्षेम हमारा पराम्बा सुरवन्दिता।

शुभहेतुरीश्‍वरी वह माँ हमारी    करें शुभभद्र, हरें सर्व आपदा॥

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

स्मरण करते ही दुखक्लेश है हरती।    भक्तिशील हम जब शरण में हों उसके।

शुभहेतुरीश्‍वरी वह माँ हमारी    करें शुभभद्र, हरें सर्व आपदा॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

सर्वबाधाओं का प्रशमन   करे त्रैलोक्य की अखिलस्वमिनी।

हमारे बैरियों का निर्दालन   करो यही माँ तुम भक्तोद्धारिणी॥

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

 

सर्वमंगलों का मांगल्य   शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यम्बके गौरी   नारायणी नमो अम्बिके॥

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

सृष्टि की उत्पत्ति स्थिति लय   करे जो आद्यशक्ति सनातनी।

वन्दन तुम्हें गुणाश्रये गुणमये   वात्सल्यनिलये नारायणी॥

 

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

शरणागत दीनदुखी संतानों के   परिपालन में तत्पर जननी।

प्रणाम तुम्हें सर्वपीडाहारिणी   क्षमास्वरूपे नारायणी॥

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

सर्वस्वरूपे सर्वेश्‍वरी   सर्वशक्तिसमन्विते।

भय से हमारी सुरक्षा करना    देवी दुर्गे आदिमाते॥

अनिरुद्धमाता नवमन्त्रमालिनी। करें बच्चे की सुरक्षा मातृकासम्राज्ञी॥

 ______________________________________________________________________

मला खात्री आहे की प्रत्येक श्रद्धावान आपापल्या घरी हे पूजन नक्कीच करेल.

 

हरि ॐ

श्रीराम 
  
 मी अम्बज्ञ आहे