साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant's Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)

साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant's Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)

हेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती.

जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar) अनुभवातून आपल्याला कळतं. सद्‍गुरुंची आवश्यकता काय, हा जो अनेकांना प्रश्न पडतो, त्याचं उत्तर आपल्याला सपटणेकरांच्या या कथेतून मिळतं. माणसाचं मन जर मोकळं असेल आणि अहंकार बाजूला ठेवायची तयारी असेल तर आयुष्यात सद्‍गुरुंकडून येणार्‍या संधी तो स्वीकारू शकतो हे सपटणेकरांची गोष्ट आपल्याला सांगते. माणूस झोपलेला असेल तर त्याला उठवता येतं. झोपल्याचं सोंग घेतलेल्याला मात्र कधीच उठवता येत नाही, हे बापूंच्या प्रवचनामधून आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आपण आद्यपिपांचा अभंग ऐकतोच,

झोपलो होतो ढोंग करूनी
बहिराही झालो होतो बोळे घालूनी
कवाडे बंद होती चारी बाजूला
तरी कसा बापू माझा येतचि राहीला

म्हणजेच सद्‍गुरुतत्व(Sadguru) पुन्हा, पुन्हा आयुष्यात येतच राहतं, संधी देतच राहतं. ते पूर्णपणे क्षमाशील असतं. म्हणूनच श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रममध्येही आपण क्षमायंत्र बघतो.

साईनाथांकडून(Sai) सपटणेकरांना पुन्हा संधी मिळाली आणि त्यांच्या पत्नीच्या स्वप्नामध्ये जाऊन साईनाथांनी दृष्टांत दिला.

सपटणेकरांच्या कथेतून आपल्याला लक्षात येतं की थोडी मानाची अपेक्षा बाजूला ठेवावी लागते; सद्‍गुरुंकडून "चल हट्" शब्द ऐकण्याची सपटणेकरांसारखी तयारी असावी लागते. हे शब्द ऐकून सुद्धा, पत्नीच्या दृष्टांतानंतर सपटणेकर स्वत: साईनाथांकडे जातात. पुन्हा तेच "चल हट्" शब्द ऐकतात. पण त्याच क्षणी दृढ निश्चय करतात की साईनाथांचे चरण सोडायचे नाहीत. असाच ठामपणा भक्ताकडे असावा लागतो. एक विश्वास असावा लागतो की मला माझ्या कठीण परिस्थितीतून, संकटातून सद्‍गुरुच बाहेर काढू शकतात आणि काढतील. हा ठामपणा आपण गुरुवार, दि. २० मार्च २०१४ रोजी श्रीगरिगुरुग्राम येथे झालेल्या श्री संजयसिंह वायंगणकर - नालासोपारा उपासना केंद्र (https://www.youtube.com/watch?v=HvGOyiMWV0s) ह्या श्रद्धावानाच्या अनुभव कथनामध्ये बघितला. श्रीसाईसच्चरित वाचताना, अभ्यास करताना, हा ठामपणा, हा विश्वास आपल्याला साईनाथांच्या सर्वसामान्य भक्तांमध्ये बघायला मिळतो.

सद्‍गुरुला शरण गेल्यानंतर सपटणेकरांचं आयुष्य कसं ट्रान्सफॉर्म (परिवर्तित) झालं हे आपण सपटणेकरांच्या गोष्टीतून समजून घेऊ शकतो आणि म्हणून हेमाडपंत साईनाथांच्या धूळभेटीनंतर स्पष्ट शब्दांमध्ये सांगतात,

लाधलो साईंचा चरणस्पर्श l पावलो जो परामर्ष ll
तोचि या जीवाचा परमोत्कर्ष l नूतन आयुष्य तेथूनि ll

साईनाथांना शरण आल्यानंतर त्यांच्या प्रत्येक भक्ताचं असंच "नूतन" आयुष्य चालू झाल्याचं आपण बघतो. सद्‍गुरुंचा, बापूंचा आपल्या जीवनात प्रवेश झाल्यानंतर आपलंही आयुष्य असंच "नूतन" झालंय हे आपण सर्वजण अनुभवत आहोत. हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे, नि:संशय !