संस्थेचे हेड ऑफिस (हॅपी होम व लिंक अपार्टमेंट) व इतर कार्यालये मंगळवार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद राहतील

शनिवार, दि. ०७ मार्च २०२० रोजी संस्थेने सध्या जगभर वेगात पसरत असलेल्या कोरोना वायरस, "कोविद - १९"च्या अनुषंगाने श्रद्धावानांना एक महत्त्वाची सूचना पाठविली होती ज्यामध्ये सावधानतेचा आणि जागरूकतेचा उपाय म्हणून दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे होणारी व शनिवारी ठिकठिकाणी उपासना केंद्रांवर होणारी सामूहिक उपासना पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कळविला होता.

तसेच दि. १२ मार्च २०२० रोजी संस्थेने सर्व तीर्थक्षेत्र दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कळविला होता.

याचअनुषंगाने वेगाने बदलणारी परिस्थिती ध्यानात घेऊन आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून (ज्यायोगे कोणालाही प्रवास करावा लागू नये ह्यासाठी) संस्थेचे हेड ऑफिस (हॅपी होम व लिंक अपार्टमेंट), जुईनगर (नवी मुंबई), पुणे, कोल्हापूर व वडोदरा येथील कार्यालये मंगळवार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद राहतील याची कृपया सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. सर्व श्रद्धावानांनी ह्याबाबतीत संस्थेशी सहकार्य करावे ही नम्र विनंती.

||हरि ॐ || श्रीराम || अंबज्ञ || || नाथसंविध्‌ ||