Home / Marathi / “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – विश्वातील अद्वितीय संघटन” पुस्तकाचे प्रकाशन

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – विश्वातील अद्वितीय संघटन” पुस्तकाचे प्रकाशन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – विश्वातील अद्वितीय संघटन” या रमेशभाई मेहता लिखित व लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि. प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल दि. २९ एप्रिल २०१७ रोजी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. हे पुस्तक एकाच वेळी ४ भाषांमध्ये; मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

ह्या पुस्तकाचे प्रकाशन मा. राज्यपाल (उत्तरप्रदेश) राम नाईकजी, ज्येष्ठ संसद सदस्य तसेच एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाषचंद्रजी व प्रांतप्रचारक (कोकण प्रांत) डॉ. सतीश मोढ ह्यांच्या हस्ते करण्यात आले. मा.केंद्रीय व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी ह्यांनीही ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून, आजच्या घडीला संघाचे विचार देशाकरिता किती महत्त्वाचे आहेत या विषयी आपले विचार मांडले.

श्री राम नाईकजी

श्री सुभाष चंद्रजी

श्री नितिन गडकरीजी

डॉ. सतीश मोढजी

 हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी (एम.डी. मेडिसीन – नायर, मुंबई) ह्यांच्या उपस्थितीत पार पडला. हे पुस्तक म्हणजे दैनिक “प्रत्यक्ष”चे कार्यकारी संपादक डॉ.अनिरुद्ध जोशी ह्यांच्या कार्यपद्धती व आदर्श प्रणालींनुसार जडण घडण असलेल्या, बिगर राजकीय दैनिक प्रत्यक्षमध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील रमेशभाई मेहता यांच्या लेखांचे संकलन आहे.

डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी

 

हिंदी

 

My Twitter Handle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*