Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / रणचण्डिका प्रपत्ती (Ranachandika Prapatti) – Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 July 2011

रणचण्डिका प्रपत्ती (Ranachandika Prapatti) – Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 July 2011

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘रणचण्डिका प्रपत्ती’(Ranachandika Prapatti) बद्दल माहिती दिली.
रणचण्डिका प्रपत्ती ही फक्त सोळा वर्षांवरील पुरुषांनी करावयाची आहे. सर्व पुरूष मंडळींनी आपले काम धाम सांभाळून श्रावण (Shravan) महिन्याच्या प्रत्येक सोमवारी ही रणचण्डिका प्रपत्ती करावी. कमीत कमी एक सोमवार तरी करावी, दोन सोमवार केली तर आनंद आहे, सगळेच्या सगळे सोमवार केली तर अधिकच आनंद आहे. पण प्रत्येक पुरूषाने निदान एक सोमवार तरी नक्कीच श्रावणातील ही प्रपत्ती करावी.
याबरोबरच श्रावण महीन्यात होणार्‍या घोरकष्टोद्धरण स्तोत्राच्या एक महीन्याच्या पठणात सामील व्हावे. ज्यांना पठणस्थळी जाणे जमेल त्यांनी तिकडे जाऊन पठणात अवश्य सहभागी व्हावे, तर ज्यांना जमणार नाही त्यांनी आपापल्या गावी, गल्लोगल्ली पठण करावे, पण अवश्य करावे, असे आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*