प्रदक्षिणा सूर प्रार्थना

Aniruddha Bapu discourse - प्रदक्षिणा सूर प्रार्थना
 
सद्‌गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी काल गुरूवार, दिनांक १० मार्च २०१६ रोजी ’श्रीशब्दध्यानयोग’ या उपासनेची महती विशद केली व ही उपासना झाल्यानंतर प्रत्येकाला स्वत:च्या सप्तचक्रांची प्रदक्षिणा करता येण्यासाठी म्हणून ’प्रदक्षिणा सूर’ प्रार्थना याविषयी सांगितले. श्रीशब्दध्यानयोगमध्ये मातृवाक्याच्या पठणानंतर ही ’प्रदक्षिणा सूर’ प्रार्थना यापुढे समाविष्ट केली जाईल. 
 
सद्‌गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने स्वत:च्या सप्तचक्रांची केलेली ही प्रदक्षिणा असेल आणि त्यासाठी प्रत्येकाने फक्त ही प्रदक्षिणा सूर ऎकल्याने स्वत:च्या सप्तचक्रांची प्रदक्षिणा होते आणि त्याचबरोबर पृथ्वीच्या म्हणजेच वसुंधरेच्या सप्तचक्रांची ही प्रदक्षिणा होते. तसेच या प्रदक्षिणेबरोबर त्रिविक्रमाची आणि महादूर्गेचीही प्रदक्षिणा होते. 
 
सर्व श्रध्दावानांसाठी ही ’प्रदक्षिणा सूर’ प्रार्थनेचा ऑडियो देत आहे. 
 
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥