"पिपासा-५" एवं "गूँज उठी पिपासा - भाग १" सत्संग समारोह

Aniruddha Bhaktibhav Chaitanya

दि. २५-१०-२०१८ को प्रकाशित हुआ "पिपासा-३" तथा दि. १४-०२-२०१९ को प्रकाशित हुआ "पिपासा-४", ये दोनों अभंगसंग्रह श्रद्धावानों के लिए सुख और आनन्द का बहुत बड़ा पर्व ही साबित हुए। आज भी इन दोनों प्रकाशन समारोहों की सुखदायी यादों ने श्रद्धावानों के मन में घर बना लिया है।

अब गुरुवार दि. २१-११-२०१९ को श्रीहरिगुरुग्राम में "पिपासा-५" इस अभंगसंग्रह का प्रकाशन समारोह आयोजित किया गया है। इस समारोह के दौरान "पिपासा-५" के चुनिन्दा अभंगों के साथ साथ, "गूँज उठी पिपासा - भाग १" की कुछ चुनिन्दा हिन्दी भक्तिरचनाएँ भी प्रत्यक्ष परमपूज्य सद्‍गुरु अनिरुद्धजी की उपस्थिति में पूरे वाद्यवृंद की साथसंगत में गायी जायेंगी।

"पिपासा-५" यह अल्बम सभी श्रद्धावानों के लिए "अनिरुद्ध भजन म्युझिक" ऍप के माध्यम से उसी दिन उपलब्ध करा दिया जायेगा। "गूँज उठी पिपासा - भाग १" यह हिन्दी भक्तिरचनाओं का अल्बम "अनिरुद्ध भजन म्युझिक" ऍप पर श्रद्धावानों के लिए पहले से ही उपलब्ध कराया गया है, इसपर सभी श्रद्धावान ग़ौर करें।

सद्‍गुरु अनिरुद्धजी के कृपाशिर्वाद से, गुरुवार दि. २१-११-२०१९ को होनेवाले इस सत्संग समारोह का प्रत्यक्ष रूप में अनुभव करके, फिर एक बार भक्तिभाव चैतन्य में नहाने का स्वर्णिम अवसर श्रद्धावानों के लिए उपलब्ध हुआ है।

-----------------------------------------

दि. २५-१०-२०१८ रोजी प्रकाशित झालेला "पिपासा-३" व दि. १४-०२-२०१९ रोजी प्रकाशित झालेला "पिपासा-४", हे दोन्ही अभंग संग्रह श्रद्धावानांकरिता अत्यंत सुखाची व आनंदाची परवणी असणारे असेच ठरले. आजही ह्या दोन्ही प्रकाशन सोहळ्यांच्या सुखद आठवणी श्रद्धावानांच्या मनात घर करून राहिल्या आहेत.

आता गुरुवार दि. २१-११-२०१९ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे "पिपासा-५" ह्या अभंगसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. ह्या सोहळ्याच्या वेळी "पिपासा-५" मधील निवडक अभंगांसह "गूँज उठी पिपासा - भाग १" मधील काही निवडक हिंदी भक्तिरचनाही प्रत्यक्ष परमपूज्य सद्‍गुरु अनिरुद्धांच्या उपस्थितीत संपूर्ण वाद्यवृंदाच्या साथीने गायले जातील.

"पिपासा-५" ह्या अभंगसंग्रहाचा अल्बम सर्व श्रद्धावानांसाठी "अनिरुद्ध भजन म्युझिक" ऍपच्या माध्यमातून त्याच दिवशी उपलब्ध करून देण्यात येईल. "गूँज उठी पिपासा - भाग १" हा हिंदी भक्तिरचनांचा अल्बम "अनिरुद्ध भजन म्युझिक" ऍप वर श्रद्धावानांसाठी आधीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

सद्‍गुरु अनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने, गुरुवार दि. २१-११-२०१९ रोजीचा हा सत्संग सोहळा प्रत्यक्ष अनुभवून, पुन्हा एकदा भक्तिभाव चैतन्यात न्हाऊन निघण्याची सुवर्णसंधी श्रद्धावानांना उपलब्ध झाली आहे.

॥ हरि ॐ ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ ॥ ॥ नाथसंविध् ॥