नवरात्र उत्सवाबाबत सूचना

हरि ॐ,

सध्याच्या आश्विन नवरात्रोत्सवातील, परमपूज्य सद्‍गुरुंनी दिलेल्या विशेष पूजन पद्धतीमध्ये पहिल्या दिवशी सकाळी करावयाच्या प्रतिष्ठापना पूजनातील क्र.१९च्या उपचारानुसार झेंडूच्या फुलांची माळ परातीभोवती (अंबज्ञ इष्टिकेच्या मांडणीभोवती) अर्पण करावयाची आहे. दुसर्‍या दिवसापासून सायंकाळच्या नित्य पूजनामध्ये नवीन माळ अर्पण करतेवेळी, आदल्या दिवशीची माळ / माळा पूजन मांडणीत तशाच ठेवाव्यात किंवा न ठेवाव्यात हे श्रद्धावान स्वत:च्या आवडीनुसार व सोईनुसार ठरवू शकतात.

प्रतिष्ठापना पूजन व नित्य पूजनाच्या उपचारांनुसार, मोठ्या आईला दररोज अनुक्रमे सकाळी व सायंकाळी दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे दुसर्‍या दिवसापासून दररोज सायंकाळी करावयाच्या नित्य पूजनामध्ये पुरणा-वरणाचा व इतर भोजनपदार्थांचा नैवेद्य आपल्या इच्छेनुसार अर्पण करू शकतात. परंतु हे करत असता पूजनविधी क्र.२० मध्ये दिल्याप्रमाणे नैवेद्य अर्पण करावा.

तसेच पुनर्मिलाप पूजनामध्ये क्र.३२ च्या उपचारानुसार सकाळी दूध-साखर व फक्त "पुरण" एवढाच नैवेद्य अर्पण करावा.

पूजनविधीमध्ये अर्पण करण्यासाठी चुनरी मिळत नसल्यास, किंवा आपल्या आवडीनुसारही, चोळीचा खण अथवा ब्लाउजपीसही अर्पण करता येईल.


हरि ॐ,

विद्यमान आश्विन नवरात्रोत्सव में, परमपूज्य सद्‍गुरु ने दी हुई विशेष पूजन पद्धति के तहत, पहले दिन सुबह किये जानेवाले प्रतिष्ठापना पूजन के क्र. १९ के उपचार के अनुसार गेंदे (झंडु) के फूलों की माला परात के चारों ओर (अंबज्ञ इष्टिका की रचना के चारों ओर) से अर्पण करनी है। दूसरे दिन से, शाम के नित्य पूजन में नयी माला अर्पण करते समय, पिछले दिन की माला / मालाएँ पूजनरचना में रखें या न रखें, यह हर श्रद्धावान अपनी पसंद तथा सहूलियत के अनुसार तय कर सकता है।

प्रतिष्ठापना पूजन तथा नित्य पूजन के उपचारों के अनुसार, आदिमाता को हररोज़ क्रमानुसार सुबह और शाम दूध-शक्कर का नैवेद्य अर्पण करना आवश्यक है।

साथ ही, दूसरे दिन से हररोज़ शाम को किये जानेवाले नित्य पूजन के दौरान पुरण-वरण का और अन्य भोजनपदार्थों का नैवेद्य अपनी इच्छानुसार अर्पण कर सकते हैं। लेकिन यह करते समय, पूजनविधि के उपचार क्र. २० में बतायेनुसार नैवेद्य अर्पण करें।

वैसे ही, पुनर्मिलाप पूजन के क्र. ३२ के उपचार के अनुसार, सुबह दूध-शक्कर तथा केवल "पुरण" इतना ही नैवेद्य अर्पण करें।

पूजनविधीमें अर्पण करने के लिए यदि चुनरी उपलब्ध न हो, अथवा यदि अपनी इच्छा हो तो भी चोलीखण अथवा ब्लाउजपीस अर्पण कर सकते है।

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥