थेंब एक हा पुरा अवघे नाहण्या (Nahu tuzhiya preme-themb ek ha pura, avaghe nahanya)

समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्यातून ढग तयार होतात आणि त्याच ढगांमधून पडतो पाऊस, प्रत्येकाला सुखावणारा. अगदी निसर्गापासून मानवापर्यंत प्रत्येकाला. शांतता देणारा, समाधानी करणारा, सुखी करणारा.

असा हा पाऊस.......जेव्हा येतो तेव्हा त्याच्या वर्षावात चिंब भिजवून टाकतो. ह्या पावसाच्या नुसत्या येण्याच्या चाहूलीनेच जर आपल्याला आनंद होतो तर....... जेव्हा प्रेमसागर पाऊस होऊन बरसतो तेव्हाचं काय? कारण या प्रेमसागरात पाणी प्रेमाचं, त्यापासून बनणारे ढगही प्रेमाचेच मग त्यातुन पाऊस पडणार तो प्रेमाचाच. खरं तर सद्‌गुरुंच्या प्रेमाचा आणि कृपेचा असा हा पाऊस निरंतर पडतच असतो पण बर्‍याचदा मीच त्याला मुकतो. म्हणुनच खास आयोजन केलेलं आहे श्रद्धावानांसाठी २६ मे २०१३ ह्या दिवशीच्या महासत्संगाचं. ज्याला ज्याला म्हणून प्रेमसागर सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रेमात चिंब न्हाऊन निघायचं आहे अशा प्रत्येकासाठी. कारण असा भव्य महासत्संग सोहळा असणार आहे, 'न भूतो न भविष्यती' असा. मग तिथे उपस्थित असणं हे आणि हेच फक्त माझ्यासाठी महत्वाचं आहे कारण हा प्रेमसागर प्रत्येकाला न्हाऊ घालायला समर्थ आहे.

कारण त्याच्या प्रेमाचा फक्त एक थेंब च माझ्यासाठी पुरेसा आहे.

गरज आहे ती फक्त माझी तिथे उपस्थित असण्याची.