महा रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp)

हरि ॐ,

नाथसंविध्‌. डॉ. अनिरुद्धांच्या म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सद्‌गुरू अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार सन १९९९ पासून रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प) आयोजित केले जाते व त्यास श्रद्धावानांनकडून व त्याचप्रमाणे संस्थेच्या हितचिंतकांकडून उचित प्रतिसाद मिळतो व त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना ह्या रक्तदान शिबीरांचा फायदा होतो. ह्या रक्तदान शिबीरात राज्यातील अनेक रक्तपेढ्या सहभागी होतात.

दरवर्षी या उपक्रमाला अनुसरून मुंबईतील सर्व अनिरुद्ध उपासना केंद्र एकत्र येऊन एप्रिल महिन्यात भव्य रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) आयोजित करतात.

उन्हाळ्यात साधारण एप्रिल-मे महिन्यात, हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेंसाठी रक्ताची फारच निकड असते व रक्तदात्यांचा ही तुटवडा जाणवतो. हे लक्षात घेऊन श्रद्धावान ह्या रक्तदान शिबीरात हिरहिरीने सहभागी होतात.

या वर्षी आपल्या संस्थे तर्फे महा रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp)  दिनांक २२ एप्रिल रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल, वांद्रे (New English High School, Bandra) येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

मला खात्री आहे बापूंचे श्रद्धावान मित्र ह्या वर्षी सुद्धा तितक्याच उत्साहात रक्तदानात सहभागी होतील.

रक्तदान शिबीरात सहभागी होणार्‍या श्रद्धावानास मोठी आई व बापूंचे आशीर्वाद लाभोत हिच सद्‍गुरु अनिरुद्धांच्या चरणी प्रार्थना.

या निमित्ताने आजपर्यंत झालेल्या महा रक्तदान शिबीराचा आलेख आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत. सन १९९९ ते २०१७ पर्यंत श्रद्धावानांनी महा रक्तदान शिबीरात केलेले रक्तदान  “५८२१२” आहे तर सर्व रक्तदान शिबीरात एकूण "१,२९,७४१" रक्तदान झाले आहे.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥