विजयादशमी म्हणजेच दसर्याच्या दिवशी सद्गुरु अनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रध्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. ते कसे करावे व का करावे ह्याची माहिती स्वत: बापूंनी गेल्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली देत आहे.
पूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती च्या खाली दिलेल्या प्रतिमा प्रेमाने काढाव्यात व त्यांचे मन:पूर्वक पूजन करावे. ही दोन्ही चित्रं बाजू-बाजूला काढायची असतात.
आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते. ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा ह्यांचे एकत्रिकरण म्हणजे ह्या दोन प्रतिकांची पूजा. मानवाच्या हातून घडलेल्या निर्मितीची पूजा.
संपूर्ण सृष्टीतले ज्ञान आम्ही नाही पेलू शकत, ते अफाट आहे. ज्ञान म्हणजे फक्त डिग्री नव्हे. त्यामुळे आपल्या जीवनासाठी आवश्यक तेवढे ज्ञान आपल्याला ग्रहण करता यावे ह्यासाठी हे पूजन आहे.
ही चिन्हं दगडी पाटीवरच का काढावीत? कारण पहिले लिहिले गेलेले / कोरले गेलेले वाङमय दगडावर कोरले गेले होते व जी गायत्रीमातेची पहिली प्रतिमा श्रीपरशुरामाने काढली ती त्याने पाषाणावर काढली होती. म्हणून दगडी पाटीवरच ह्या प्रतिमा काढाणे श्रेष्ठ व श्रेयस्कर.
श्रीसरस्वतीची प्रतिमा प्रथम प्रशुरामाने काढली व धारिणीने रेखाटली. श्रीसरस्वतीला आपण शिक्षणाची देवता मानतो. सरस्वतीच्या प्रतिमेत शिवत्रिकोण व शक्तीत्रिकोण (उलटा त्रिकोण) आहेत. शिवाय सरस्वती चिन्हात १ चे ७ आकडे असतात. हे ७ वेळा १ म्हणजे सप्तस्वर आहेत, मराठीतील “सा, रे, ग, म, प, ध, नी, सा” व इंग्लिशमधील “डो, रे, मी, पा, सो, ला, मी”. अनसूया मातेचा जन्म ही सप्तस्वरातूनच झाला. सप्तस्वर म्हणजे अनसूयेच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक वेळेला उमटलेला ध्वनी आहे. १ चे ७ आकडे म्हणजे आदिमाते़च्या आमच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे पूजन आहे. ह्या सप्तस्वरांनी बनलेले संगीतचे महत्त्व इतके आहे की ते मानवाला शांती देते. संगीत वनस्पतींना देखील उल्हासित करते. गोशाळेत चांगले संगीत लावले तर त्याचे गाईंच्या गर्भावरसुध्दा चांगलेच परिणाम होतात.
जो सत्ययुगातला पहिला मानव होता, ज्याची एकही चूक नव्हती, पाप नव्हते, कलंक नव्हता, दोष नव्हता, त्याच्याशी म्हणजे आपल्या त्या स्वरूपाशी, सगळे जन्म पार करून, आपण जोडले जाणे म्हणजे हे पूजन. जेव्हा आपण या चिन्हांचं पूजन आपण करतो तेव्हा सत्ययुगातल्या त्या निष्कलंक पुरुषाबरोबर आपण पूजन करतो.
श्रीमहासरस्वतीचे चिन्ह प्रथम धारिणीने काढली व परशुरामाने रेखाटले आहे. महाविष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम, हा विवाहित होता व त्याच्या पत्नीचे नाव धारिणी होते, जी आल्हादिनी आहे. ही भूदेवी वरुणाची कन्या आहे. आपण नवरात्रीत जो कलश बसवतो त्याची पूजा करताना वरुणाचा उल्लेख येतो. पाऊस पडला की धारिणी फळते फुलते.
रेणुकेच्या विरहात परशुराम असताना अत्रि-अनसूया त्याला भेटायला येतात. तेव्हा धारिणी तिथेच असते. त्यावेळी तिच्या मनात सप्तस्वर झंकारत राहतात व ती धुळीत त्याप्रमाणे बोटं फिरवत राहते. तिच्या ह्या हालचाली परशुराम पाहतो आणि धुळीत धारिणीने बोटं फिरवल्याने जी प्रतिमा तयार झालेली असते ती प्रतिमा परशुराम चित्रांकित करतो.
वर्षातुन एकदा करायचे हे पूजन आपण सर्व श्रध्दावान अगदी प्रेमाने करुया.
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll
Permalink
Ambadnya dada
Permalink
Dada Ambadnya. JAI JAGDAMB JAI DURGE.
Permalink
Hari om, i m from nagpur ayodhya nagar kendra. we here, was not receiving / getting any news regarding the puja, need to be done on any occasion as per P. P. Bapu’s directives
can i get news or in formations of same before the occasion , so that we can also be the part… and take advantage of love of MOTHI AAI & P.P. BAPU