हरि ॐ. आनंदाचा महासागर – कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबीर २०१३ यावर्षी कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबिरास गेलेल्या मस्कत उपासना केंद्राच्या वंदनावीरा नाईक यांचा शिबिराबद्दलचा हा अनुभव ऐकताना श्रद्धावानाला खरेच प्रश्न पडतो की आम्ही सेवा करायला गेलो की आम्ही सेवा करवून घ्यायला गेलो. देवाचा प्रसाद कसा स्विकारावा,आहे त्यात कसे समाधानी राहावे , देवाची भेट किती आपुलकीने , प्रेमाने स्विकारावी ,आपले दु:ख विसरून … अनुभव ऐकताना डोळे खरेच पाणावतात जिवंत प्रॅक्टीकल – श्रीसाईसच्चरितातील दासगणूंची गोष्ट १८व्या अध्यायातील “त्येन त्यक्तेन भुंञीता” ह्या महावाक्याची जिवंत प्रचिती… “खरा बापू ह्यांना कळला न भेटता , न पहाता ” हे बोल काळजाला घरे पाडतात.Problem असूनही Problem कुठेच नाही हा भाव असणे हे किती मोठे प्रखर सत्य शिकायला , खरी भक्ती , खरी सेवा शिकायला तरी एकदा तरी कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबीराची वारी करायलाच हवी … आताच आलेल्या उपनिषदावरही अत्यंत सुंदर अभंग रचणारे भक्ताचे अंत:करण बापूंच्या प्रेमाने खरेच किती ओतप्रोत भरले असेल नाही … बापूराया आद्यपिपांचा अभंग न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा , माझ्या भक्तनायका ,थेंब एक हा पुरा अवघे नहाण्या, ओले चिंब मन हे झाले , अंग अंग शहारले , कातड्यातुनी आतुडे शिरले प्रेम सावळे ….आम्ही नुसतेच तू शिकवलेले भक्तीशील मधले वहीत उतरवले, पण आमच्याच कोल्हापूरच्या बांधवांनी तर न शिकताही हृदयी कवटाळले, ते कसे हे अनुभवायला तरी मला ह्या तुझ्या प्रेमसागराचे दर्शन घडव ना रे एकवार ….. खर्या अर्थाने अंबज्ञ होता येऊ दे रे घननीळा ….
अंबज्ञ, अंबज्ञ,अंबज्ञ …..
Permalink