दहा वर्षांनी मागे वळून पाहताना (In retrospect, 10 years back)

रि ॐ मित्रांनो!
३ ऑक्टोबर २००२ रोजी बापूंनी प्रथम १३ कलमी कार्यक्रम जगासमोर आणला. आज बापूंच्या त्या ऐतिहासिक भाषणाला १० वर्ष पूर्ण झाली. आपल्यातले जे ह्या ऐतिहासिक क्षणी उपस्थित होते, त्यांच्या मनात बापूंनी ह्या त्यांच्या भाषणाला आगळी-वेगळी, अगदी विलक्षण अशा पद्धतीने केलेल्या सुरुवातीची अजूनही एक खास आठवण असेलच. ह्या भारत देशभर भ्रमण करताना प्रत्येक गरीब माणसाच्या दीन व हतबल चेहऱ्यावरच्या भावाने बापूंना दु:ख झालं आणि तो भाव त्यांना "तसवीर बनाता हूँ, तसवीर नहीं बनती" ह्या गीतात प्रतीत झाला. पण हे दु:ख मात्र क्षणभराचच होतं....कारण त्यांना आपल्या देशाबद्दल वाटणाऱ्या उज्ज्वल भवितव्याचा विश्वास आणि प्रेम व्यक्त करणारं "तदबीरसे बिगडी हुई तक़दीर बनाले, अपनेपे भरोसा है तो ये दाव लगाले" हे गीतही होतंच! ह्या इतक्या महत्त्वाच्या विषयाला इतक्या मार्मिक आणि थेट काळजाला भिडणाऱ्या शब्दांनी सुरुवात व्हावी! बापूंचं सगळंच आगळं-वेगळं! बापूंच्या ह्या भाषणाची मानवी इतिहास नोंद घेईल ह्यात मला तिळमात्र शंका नाही.
त्या अविस्मरणीय दिवशी बापूंनी उच्चारलेले शब्द आठवले की आजही रोमांच उठते. त्यातील काही:
१)"....नजीकच्या भविष्यकालात घडणाऱ्या जागतिक घडामोडींबद्दल बोलायचे झाल्यास....भारताची ह्या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका असेल... खूपच महत्त्वाची."
२) "...आणि भारतच सर्व बाबतीत अग्रस्थानी असेल, लक्षात असू द्या... १०८%... निश्चितपणे."  
३) "लक्षात ठेवा, माझ्या मागून कुणी येवो अथवा न येवो मला जे साध्य करायचं आहे, ते मी करणारच आहे आणि हा माझा निश्चय आहे. माझे मित्र माझ्याबरोबर आले, माझ्या मागून आले तर मला आनंदच वाटेल. पण अगदी सगळं जग जरी माझ्या विरोधात उभं ठाकलं ना, तरीही माझा मार्ग व माझी तत्व मी अढळपणे, निश्चलपणे जोपासणारच आहे, हे निश्चित... १००%... १०८%."
४) मला पुढारीही व्हायचं नाही आणि सत्ताही गाजवायची नाही. तुम्ही मला सद्गुरू म्हणता, मला मान्य आहे. तुम्ही मला देव म्हणता, मला मान्य आहे. तुम्ही मला राक्षस म्हणता, तेही मान्य आहे. तुम्ही मला जे नाव द्याल, ते मला मान्य. परंतु माझी भूमिका मात्र तुमच्या मित्राचीच आहे. मी तुमचा मित्रच आहे. तुम्हाला कधीही दगा न देणारा मित्र... तुमचं केवळ हितच चिंतणारा मित्र.... सत्याच्या मार्गावरचा मित्र, तुमच्यावर सर्वतोपरी प्रेमच करणारा मित्र."  
५) "....तुम्हाला जे पाहिजे ते म्हणायला तुम्ही मोकळे आहात. मला काही फरक पडत नाही. मला माहित आहे की मी सत्याच्याच मार्गावर आहे, तेव्हा तुम्ही काहीही बोलू शकता. मला फरक पडत नाही."
६) "....ह्या ग्रंथाची (श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाची) शेवटची ५ पानं कोरी असतील....अगदी पूर्ण कोरी. ती पानं प्रकाशित होतील, ते मी इथून गेल्यावर, मी जे करण्यासाठी इथे आलो आहे ते केल्यानंतर. पण त्याला अजून पुष्कळ वेळ आहे. इतक्यातच आनंद करू नका. हे इतक्यात घडणार नाही.....१००% कोणतीही गोळी, कोणताही बॉम्ब ही छाती भेदू शकत नाही, लक्षात ठेवा....१००%."
७) "....शिवाय मला काहीही बांधून ठेवू शकत नाही....अगदी काहीही नाही. मला कोणीही रोखू अथवा आवरू शकत नाही. मला माझ्या आई-वडिलांनी अनिरुद्ध हे नाव दिलं आहे आणि मी अगदी तसाच आहे – कोणीही अडवू शकणार नाही, अवरोध करू शकणार नाही, असा. मला कोणीही आणि काहीही रोखू शकत नाही. अगदी १००%."
८) "....माझी १३ कलमं संपली. नाही, ती संपली नाहीत; आत्ता कुठे ती सुरू झाली आहेत. बापूंची १३ कलमं संपली असं कुणी समजत असेल तर ते सपशेल चूक आहे. बापू कधीच संपला नाही आणि कधी संपणारही नाही....१००%. आणि म्हणून बापूची १३ कलमंही कधीच संपणार नाहीत. ती चालूच रहातील....निरंतर, अखंड."
मित्रांनो, जर हे शब्द स्फूर्तीदायक नसतील तर मला सांगा जगात काय स्फूर्तीदायक आहे? बापूंचे हे शब्द येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरित करण्यास समर्थ आहेत.
....तेव्हा बापूंच्या १३ कलमी कार्यक्रमातली कलमं खालीलप्रमाणे:
१. चरखा योजना
२. बारमास शेती-चारा योजना
३. रद्दी योजना
४. जुनं ते सोनं
५. मायेची ऊब
६. विद्या-प्रकाश योजना
७. स्वच्छ्ता मोहीम
८. अहिल्या संघ
९. सत्यस्मृती (श्रीमद्पुरूषार्थ ग्रंथराज)
१०. भारतीय भाषा संगम
११. जनरल नॉलेज बॅंक
१२. पाच खंडांचा अभ्यास
१३. आपत्तीनिवारक दल
ह्या १३ कलमी कार्यक्रमाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांवर व सरसकट आजवर केलेल्या वाटचालीकडे मागे वळून पाहताना खूप समाधान वाटते; अनेक श्रद्धावान बापूभक्तांचा ह्या प्रयासामधला मनापासूनचा सहभाग पाहून खूप अभिमानही वाटतो. त्याचबरोबर अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे ही जाणीवही मला आहे. पण आपण त्या दिशेने छोटी परंतु ठाम पावले टाकत आहोत हा विश्वासही आहेच.... म्हणजे प्रगती साधण्याच्या बाबतीत बापूंनी आपल्याला जसं शिकवलं आहे, अगदी तसंच. 
मित्रांनो, आपल्या १३ कलमी कार्यक्रमामध्ये अंतर्भूत उपक्रमांची वाटचाल तपशीलवार जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असालच. ह्या कार्यक्रमातील १२ कलमांच्या उपक्रमांमध्ये आपण खरोखरंच उल्लेखनीय प्रगती साधली आहे. तेरावे कलम, म्हणजेच वरील यादीमधला ९वा मुद्दा – सत्यस्मृती (श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज), हे अर्थातच संपूर्णपणे बापूंचे आणि फक्त बापूंचेच अधिकारक्षेत्र आहे, त्यांचाच प्रांत आहे. माझ्याजवळची काही महत्त्वाची आकडेवारी इथे तुमच्याबरोबर शेअर करतो आहे, जेणेकरून आपल्यातल्याच श्रद्धावान बापूभक्तांनी केलेल्या सेवाकार्याची तुम्हाला कल्पना येईल. ह्यामधील अनेक श्रद्धावान ह्या सेवाकार्यात आपली नोकरी/व्यवसाय, घरची जबाबदारी हे सर्व सांभाळून सहभागी झाले आहेत:
सत्यस्मृती (श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज):
मी आधीच म्हटल्याप्रमाणे हे संपूर्णपणे बापूंचेच अधिकारक्षेत्र असून ह्या अंतर्गत सत्यप्रवेश, प्रेमप्रवास व आनंदसाधना हे तीन खंड प्रकाशित झालेले आहेत.
भारतीय भाषा संगम:
ह्या उपक्रमाअंतर्गत अनिरुद्ध समर्पण पथकाने भाषेचे क्लासेस आयोजित केले व श्रद्धावान बापूभक्त ह्यांद्वारे नवीन भाषा शिकले. बापूंनी स्वत: साडे तीन वर्ष श्रीसाईसच्चरितावर आधारित मराठी भाषेचे क्लासेस घेतले व ह्याचा ३५० श्रद्धावान भक्तांनी लाभ घेतला.
जनरल नॉलेज बॅंक:
काही निवडक विषयांचे सर्वसाधारण नागरिकाला जितके ज्ञान आवश्यक असते, ते प्रथम कृपासिंधु मासिकातून प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर आता ह्याच प्रकल्पाखाली "प्रत्यक्ष" ह्या दैनिकामध्ये वैद्यकीय क्षेत्र, कायद्याचे क्षेत्र, कर (टॅक्स) संबंधी विषय अशा अनेकविध विषयांवर उपयुक्त माहिती देण्यात येत आहे.
पाच खंडांचा अभ्यास:
बापूंनी लिहिलेली "तिसरे महायुद्ध" ही अग्रलेखांची मालिका ह्या उपक्रमाअंतर्गत त्यांनी स्वत: केलेल्या अभ्यासातूनच साकार झाली. ह्याच मालिकेचे कालांतराने त्याच नावाने पुस्तकरूपाने प्रकाशन केले गेले. "प्रत्यक्ष" मधल्या आपल्याला वाचायला मिळत असलेल्या रोजच्या आंतरराष्ट्रीय बातम्या ह्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे.
आता माझ्याजवळ उपलब्ध असलेली काही उपक्रमांची आकडेवारी:
चरखा योजना:
१)      एकूण वितरित केलेले अंबर चरखे: ५५७०
२)      एकूण वापरले गेलेले पेळू: ७५,५२७
३)      एकूण तयार लड्या: ५०,३२६
४)      एकूण विणलेले कापड: २,४८,०१४ मिटर
५)      एकूण शिवून वितरित केलेले गणवेष: १,१६,५७८
रद्दी योजना:
आज आपण "इको-फ्रेंडली" गणपती व ह्या संकल्पनेला गेल्या काही वर्षांमध्ये कशी लोकप्रियता लाभली, ते ऐकतो. ही संकल्पना सर्वप्रथम मांडून ती प्रत्यक्षात उतरवणाऱ्या अग्रेसर मंडळींमध्ये आपल्या संस्थेची गणना होते हे जाणून आपल्या सर्वांनाच आनंद झाला असेल. ही संकल्पना आपल्याकडे जमा होणाऱ्या रद्दी कागदांचा योग्य विनियोग कसा व्हावा ह्या चर्चेचा परिणाम होता.
एकूण साकार गणेशमूर्ती: ३२,२२५
ह्या मूर्ती भारताव्यतिरिक्त मॉरिशियस, सिंगापूर, हॉंगकॉंग, नायजिरिया, ओमान, यु.ए.ई, यु.के., यु.एस.ए. ह्या देशांमध्ये पोहोचल्या आहेत.  
जुनं ते सोनं: 
मायेची ऊब:
बापूंच्या ह्या उपक्रमाचे वैशिष्ट्य व सौंदर्य असे की ह्यात घरातील गृहिणी व वृद्ध आजीही आपले घरगुती व्यवहार सांभाळून गोधड्या शिवून व स्वेटर्स विणून सहभागी होऊ शकतात.
अ) एकूण तयार केलेल्या गोधड्या: ४६,५८९
ब) एकूण बितरित केलेल्या गोधड्या: ३५,५८९
*वात्सल्याची ऊब: श्रद्धावानांनी विण्लेले स्वेटर्स: १,४५९
वितरित केलेले स्वेटर्स (डोनेशन म्हणून स्वीकारलेले): ११,५४२
* हा प्रकल्प "मायेची ऊब" ह्या योजनेअंतर्गत राबविला जात असून ह्यामध्ये वयस्क स्त्रिया बापूंच्या निवास स्थानी आठवड्याचे पाच दिवस एकत्र येऊन परमेश्वराचे नामस्मरण करत स्वेटर्स विणतात.
विद्या-प्रकाश योजना:
१)      लाभ झालेले विद्यार्थी – एकूण संख्या: १,२०,४०५
२)      एकूण वितरित मेणबत्त्या: १४,४९,५६९
३)      एकूण वितरित मॅच बॉक्सेस: ६,६३,६९९
अहिल्या संघ:
१)      स्त्रियांची एकूण नोंदणी संख्या: ३११४
२)      बलविद्येच्या प्राथमिक कोर्समध्ये प्रशिक्षित स्त्रिया: ११७१
३)      स्त्रियांसाठी आयोजित सूर्यनमस्कार शिबीरे: ३७
४)      सूर्यनमस्कार शिबिराचे एकूण लाभार्थी: २०३२
अनिरुद्धज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेज्मेंट:
१)      एकूण प्रशिक्षित डी.एम.व्हीज. : ६०,४०९
२)      आयोजित कोर्सेस एकूण संख्या: १,४३२
३)      कोर्सेस आयोजित केलेले जिल्हे: २४
४)      प्रशिक्षक एकूण संख्या: ४११
५)      एकूण ट्रान्स्मिटर्स: ११५
६)      महाराष्ट्राव्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांमध्ये कोर्सेस आयोजित केले गेले: गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश (०४)
७)      फायर फाईटर्स: ४८५
८)      एकूण आयोजित फायर फाईटर कोर्सेस: ०९
वृक्षारोपण मोहीम:
विभाग
वृक्ष
मुंबई
९६,०००
रत्नागिरी
८०,०००
सातारा
१,२५,०००
औरंगाबाद
१,५०,०००
जळगाव
५५,०००
इतर केंद्र एकत्रीत
२,००,०००
अंदाजे 
एकूण
७,०६,०००
दहा वर्षांनी मागे वळून पाहताना, आज ह्या निमित्ताने ह्या महान उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक श्रद्धावान बापूभक्ताप्रति मी माझी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याला अजून खूप मोठी वाटचाल करायची आहे, हे खरे आहे पण आपण एकत्र येऊन काम केल्यास, आपल्यामधील भौगोलिक अंतर आपल्याला कितीही दूर ठेवत असले तरी बापूंवरचे आपले प्रेम व अढळ विश्वास हा आपल्याला जोडणारा जो धागा आहे, जो बंध आहे, तो ह्या अंतरावर मात करेल व बापूंनी आपल्यासाठी आणि सरसकट सर्व जनांसाठी इच्छिलेले सर्व काही साध्य करण्यास निश्चितच मोलाचे सहाय्य करेल असा मला विश्वास वाटतो.