श्री हनुमान पौर्णिमा उत्सव, अतुलितबलधाम -  रत्नागिरी (“पंचकुंभाभिषेक”)

हरि ॐ,

सर्व श्रद्धावानांसाठी एक विशेष सूचना

दरवर्षी चैत्रशुध्द पौर्णिमेला, श्री अतुलितबलधाम, रत्नागिरी येथे श्री हनुमान पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे ह्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात सकाळी ११.३० ते रात्रौ ८.३० पर्यंत श्रीपंचमुखहनुमंताच्या मूर्तीवर “पंचकुंभाभिषेक” केला जातो.  ह्या वर्षी हनुमान पौर्णिमा दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी साजरी होणार आहे.

श्रद्धावानांना ह्या उत्सवास उपस्थीत राहण्याची इच्छा असते परंतू मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील सर्वच श्रद्धावान ह्या उत्सवास उपस्थित राहू शकत नाहीत, पण त्यांची “पंचकुंभाभिषेक” करण्याची इच्छा असते.  ह्या हेतुने ह्या अभिषेकाची आगाऊ नोंदणी गुरुवारी व रामनवमीच्या दिवशी श्रीहरिगुरुग्राम येथे गेट नंबर ४ समोरील CCCC च्या काऊंटरवर व इतर दिवशी (रविवार सोडून) CCCC च्या कार्यालयात (३०४, लिंक अपार्टमेंट) येथे केली जाईल. पंचकुंभाभिषेकासाठी देणगी मुल्य रुपये 351/- आहे. नोंदणी केलेल्या श्रद्धावानांसाठी  ’श्रद्धावान सेवेमार्फत’ “पंचकुंभाभिषेक” केला जाईल व त्याचा प्रसाद त्या श्रद्धावानांस त्यांच्या उपासना केंद्रावर देण्यात येईल. तरी श्रद्धावानांनी ह्याची नोंद घ्यावी.

उपासना केंद्रामध्ये घेण्यात येणारी नांवे  पुढील ई-मेलवर पाठवून द्यावित.

१.    [email protected]

२.    [email protected]

अधिक माहितीसाठी संपर्क :

१. अतुलितबलधाम रत्नागिरी – 02352-229292

(भुपेशसिंह सावंत – 94205 25152, पुरुषोत्तमसिंह गांधी – 75889 18166)

२. सी.सी.सी.सी   कार्यालय - 022- 26057054 Ext: 132 / 134

(शैलेशसिंह नारखेडे - 9819126399, अमितसिंह प्रसादे - 9930885660, सुरजसिंह बांदेकर - 8369173211, प्रसादसिंह बोरकर - 9820237163)

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥