गुरुवाक्य ( Guru vakya )

गुरुवाक्य ( Guru vakya )
काल श्रीसाईसच्चरितावर प्रवचन करताना बापूंनी (अनिरुद्धसिंह) पहिल्या अध्यायातील खालील ओवीचे निरुपण सुरु केले.
अखंड गुरुवाक्यानुवृत्ती l दृढ धरितां चित्तवृती l श्रध्देचिया अढळ स्थिती l स्थैर्यप्राप्ति निश्‍चळ ll
ह्या ओवीच्या पहिल्या चरणाचं निरुपण सुरु झाल. "गुरुवाक्य" म्हणजे नक्की काय? हे समजावून सांगताना बापूंनी (अनिरुद्धसिंह) साईनाथांच्या ११ वचनांचं उदाहरण दिलं. प्रत्येक वचन हे जरी साईनाथांचच असलं तरी सुध्दा ह्यातील गुरुवाक्य कोणतं हे त्यांनी सर्व श्रध्दावानांना विचारलं व प्रत्येक जण आपआपल्या परीने उत्तरं देत होता आणि शेवटी बापूंनी (अनिरुध्दसिंह) "शरण मज्‌ आला, आणि वाया गेला दाखवा दाखवा ऎसा कोणी ll", हे साईनाथांचं गुरुवाक्य कसं हे समजावून सांगितल व त्याच बरोबर सर्व श्रध्दावानांना "गुरुवाक्य" ही संकल्पना समजावून सांगितली.
आणि मग प्रत्येक श्रध्दावानांना प्रश्‍न उभा राहिला आमच्या सद्‌गुरुंचं गुरुवाक्य कोणतं? आणि सद्‌गुरुंनी हा प्रश्‍न जाणला. आणि बापूंनी (अनिरुद्धसिंह) त्यांचं गुरुवाक्य कुठचं आणि ते केव्हा उच्चारलं गेलं हे सांगितलं. आपल्या पैकीच एक श्रध्दावान मित्र; श्री. अजयसिंह केळसकर ह्यांनी हे गुरुवाक्य बापूंनी (अनिरुद्धसिंह) आत्मबल महोत्सवादरम्यान उच्चारलेलं हे वाक्य सगळ्यांना ऎकवलं. मोठ्या प्रेमाने ते त्यांनी रेकॉर्ड करुन घेतलेलं. "मी तुला कधीच टाकणार नाही" हे बापूंनी (अनिरुद्धसिंह) त्यांच्या श्रध्दावान मित्रांना दिलेलं वचन हे ते "गुरुवाक्य". आज अनेक श्रध्दावान मित्रांना बापूंच्या (अनिरुद्धसिंह) आवाजातील बापूंचं (अनिरुद्धसिंह) ते गुरुवाक्य आपल्याकडे असांव अशी इच्छा आहे. सगळ्या श्रध्दावान बापूभक्तांकरिता हे रेकॉर्ड केलेलं वाक्य ह्या पोस्ट बरोबर जोडत आहे.
गुरुवाक्य मोबाईल रिंगटोनच्या स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करुन डाऊनलोड करता येऊ शकेल:http://goo.gl/tP5uz