प्रारंभ

This topic contains 195 replies, has 43 voices, and was last updated by  ketaki. Kulkarni 2 years, 8 months ago.

Viewing 15 posts - 181 through 195 (of 196 total)
 • Author
  Posts
 • #521798

  Sailee Paralkar
  Keymaster

  आजच्या अग्रलेखात बापूंनी शुक्राचार्यांचे खजिनागृह (Waltshire) ह्याचा उल्लेख केला त्याचे चित्र. आणि त्या सबंधित माहिती.
  https://en.wikipedia.org/wiki/Stonehenge

  #521870

  Sailee Paralkar
  Keymaster

  तसेच चीन “सैतानाची नगरी ” city of satan ह्याबद्दल देखील बापूंनी सांगितले आहे. Internet वर search करता असे दिसून आले कि हे एक चीन मधील ‘पर्यटन स्थळ’ म्हणून ओळखले जाते. बघून धक्काच बसला मला. खरच आज बापुंमुळे आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हे कळते.
  अम्बज्ञ बापू .

  http://tourismplacesworld.blogspot.in/2011/06/city-of-satan-moguicheng-in-xinjian.html

  https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/0/09/Moguicheng_xinjiang.pdf

  #523972

  shantanu natu
  Participant

  आता अग्रलेखामध्ये शुक्राचार्यांचा प्रथम शुक्राचार्य असा उल्लेख होतो आहे,
  आणि काही अग्रलेखांपुर्वी आपण वाचले आहे, कि पिंडार (Pindar) हा सेरापीस अनुबीस ह्याला व्दितीय शुक्राचार्य म्हणतो.

  आता एक तर नक्की कि सेरापीस अनुबीस (Serapis Anubis) म्हणजेच महर्षी सुमेधस,

  मग म्हणजे सुमेधस रुषी प्रथम शुक्राचार्य असताना व्दितीय शुक्राचार्य बनणार, कि प्रथम शुक्राचार्यांचा वध
  घडवुन आणुन व्दितीय शुक्राचार्य म्हणुन ते काम बघणार ?

  आणि महत्वाच म्हणजे, जर शुक्राचार्य देखील अमर असतील, तर हे सगळ कस घडणार ??

  #530173

  preeti bhangle
  Participant

  Hari om. Aajcha agralekh dt 3.12.15. Punha ekda Mothi Aai ani Trivikramachya akaran karunyacha pratyey deun jaato. Horrenaavas sarkhya krur hinsak vruttichya shraddhahinala sudharaychi iccha hote ani to tasa fakt nischay karto. Hyat apala ant suddha hou shakto hyachi purn jaaniv tyala aste pan asyla arthhin durachari ayushya jagnya peksha shraddhavan mhanun jagnyat mrutyu ala tari chalel hya drudh nirdharane to pahile paul uchalto ani ti mashal vizavto. Tyane ase kartach Moros tyala gilun takto. Pan horrenavas Mahadurgeche smaran karun purn takdinishi tyacha mukabla karto. tyach kshani Mothi Aai ani Trivikram Mahamata Soteria la pathavtat ani tyacha jeev vachavtat. Bapu aplyala nehmi sangtat ki apan valya koli itke paapi nakich nahi tar apan sudharnarach. Ani apan ek paul takle ki to 99 pavle dhavat yetoch. Ithe suddha aplyala hech disun yete. Tasech Satmargavarche shraddhavanamadhe suddha kshama ha Mothi Aai ani Trivikramacha gun aapoaap tyanchyathi utartoch ani Trivikramachya icche palikade kahich nahi ha drudh nirdhar asto mhanun Mahamata Soteria aplya patichya hatyet sahbhagi aslelya horrenavascha jeev vachavte jya kshani to Shraddhavan bananyacha nirdhar karto. 2.5 lakh varsh aso 2.5 koti Mothi Aai ani Trivikram hyanchi ‘kshama’ kadhich badlat nahi ani sudharnyachi iccha aslelya pratyek jeevala tyanchi krupa miltech. Bapu mhantat ‘you are not judged by your performance but by your faith’ ani hech satya ahe. Khrach Mothi Aai tu khup premal ahes ani amhi Ambadnya ahot.
  Preeti bhangle

  #533150

  Suneeta Karande
  Participant

  हरि ॐ.
  दिनांक ०६-१२-२०१५ चा अग्रलेख ११८३ वाचताना एक गोष्ट श्रध्दावानांसाठी किती महत्त्वपूर्ण आहे ते जाणवले ती म्हणजे त्रिविक्रमाची भक्ती !
  आणि आदिमाता महादुर्गेच्या वचनांचे सामर्थ्य , तिच्यावरच्या अनन्य विश्वासाचे अचित्यदानी फळ !
  अत्यंत विलक्षण महापराक्रमी महामाता जेव्हा तिच्या पतीच्या हत्येबाबत आणि तिची भगिनी अनंतव्रताची माता थिया हिच्या बलिदानाने भावुक आणि उद्विग्न झालेली दिसते तेव्हा नक्कीच त्या काळात काही तरी भीषण घडले असेल जेव्हा हे सर्वचजण हतबल झालेले होते ह्याची अस्पष्टशी जाणीव होते. सर्वसामान्यत: एक स्त्री तिच्या पतीच्या निधनाने खूपच हळवी होते, ती स्वत:ला खूपच निराधार समजू लागते आणि आपले आयुष्य़ पूर्णतया कोलमडून पडले असे मानून हतबल झालेली दिसते , अर्थातच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवबांची जिजाऊमाता ह्यासारखे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके अपवाद सोडले तर ! परंतु माता सोटेरियाने मात्र त्यापुढील काळात आपल्या जिवलग आप्तांच्या निधनाने हळवे न होता , भावनेच्या आहारी जाऊन अकार्यक्षम वा निष्प्रप्रभ न होता, अत्यंत कठोर संयमाने आणि महादुर्गा व त्रिविक्रमावरच्या अढळ विश्वासाने स्वत: आपण आणि आपल्या सार्‍या आप्तांकडून जो अचंबित करणारा प्रवास करवून घेतलेला दिसतो तो खरोखरीच अत्यंट स्पृहणीय आणि कौतुकास्पद आहे. तिचे आणि तिच्या पारिवारातील सर्वच सावर्णि घराण्याचे जीवितकार्य हे त्रिविक्रम आणि महादुर्गेवरच्या अनन्य , अविचल विश्वासातूनच यशस्वी होताना दिसते आहे.
  असाध्य ते साध्य। करिता सायास।
  कारण अभ्यास। तुका म्हणे।।
  ह्या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीची प्रचिती येथे पदोपदी येते कारण सदगुरु बापूंनी “आनंदसाधना ” ह्या श्रीमद्पुरूषार्थ्: – तृतीय खण्ड: ह्या ग्रंथात पुरुषार्थगंगेतील आचमन १ – अभ्यास मध्ये सांगितले आहे की अभ्यासानेच कुठलीही ताकद व कुठलेही सामर्थ्य प्राप्त होत असते.
  वेडीवाकडी असो वा अडाणी असो , भक्तीच अभ्यासाला बळ पुरविते. धनही व्यर्थ जाते, ताकदही निष्फळ ठरते, सत्ताही विफल ठरते, परंतु अभ्यास केव्हाही व्यर्थ होत नाही.
  अभ्यासाने प्रचंड मोठया पर्वताचेही हळूहळू चूर्ण करता येते.
  सर्वात महत्त्वाचे म्हणजे परमात्मा हा अनंत अभ्यासक आहे आणि म्हणूनच परम्यात्म्याच्या सर्व सुहृदांनी हा गुण आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे.
  माता सोटेरियाने आणि तिच्या परिवाराने अभ्यास हा गुण आत्मसात केला त्रिविक्रमाच्या भक्तीतून!
  आज त्रिविक्रम बापूंनी स्वत: ग्रंथातून हा सोपा मार्ग आपल्याला आधी दाखविला आणि त्याचे प्रात्यक्षिक कसे आचारणात आणायचे असते ते ह्या अग्रलेखांच्या , तुलसीपत्रांच्या माध्यमातून शिकवित आहे. आपण सर्व श्रध्दावानांनी हा त्रिविक्रमाचा – माझ्या बापूंचा , आपल्या सर्वांच्या बापूंचा मार्ग नक्कीच आचरणात आणायलाच हवा असे प्रामाणिकपणे वाटते.या वरून आम्हा सर्व श्रध्दावानांना त्रिविक्रम आणि त्याची माता महादुर्गा म्हणजेच आदिमाता चण्डिका हीच एकमेव खराखुरा आधार असल्याचा फक्त १०८ % विश्वासच ठेवून चालत नाही , तर भरोसाही असायलाच हवा हेच सप्रमाण सिध्द होते. डेमेटरने असाच विश्वास आणि अतूट भरोसा ठेवला असावा महादुर्गेवर आणि तिच्या पुत्रावर त्रिविक्रमावर ठेवला असावा,ज्यामुळेच ती निंबुरावर सम्राज्ञी झाल्यावर एकटी असूनही महामाता सोटेरिया तिच्या मदतीला कोणालाही पाठवायच्या वृध्द सेनापती आरकॉनच्या व अंनतव्रताच्या सूचनेकडे कानाडोळा करते, एवढेच नव्हे तर “नोहॉन” पठारावर डेमेटरला एकटीनेच जाण्याची आज्ञा करते असे वाटते.
  आता हा नोहॉन म्हणजेच पलाश वृक्ष ! ह्याचा संबंध हा युध्द्साहित्याशी, युध्दाशी आणि धर्मयुध्द्विजयाशी असतो हे अधिव्रताने डेमेटरला शिकविलेले विधान आठवण करून देते त्या त्रिविक्रमाने त्याच्या अनसूया मातेचे आख्यान सांगताना वर्णिलेल्या कथेतून ! अर्थातच आपल्या सदगुरु अनिरुध्द बापूंनी लिहिलेल्या “मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद्: ” ह्या ग्रंथातून आपण वाचतो ती सदगुरु दत्तात्रेयांनी भगवान परशुरामाला सांगितलेल्या अनसूया आख्यानमधील ४४ व्या अध्यायातील गोष्ट. जेव्हा माता अनसूया आपले प्रकट अवतारातील अंतिम कार्य संपादन करण्यासाठी स्वत:च्या आश्रमाच्या सीमेबाहेर येऊन एका पलाश वृक्षाच्या सावलीत एका शिळेवर बसते व दोन्ही डोळे बंद करून परमेश्वराचे अर्थात दत्तगुरुंचे निश्चल ध्यान करू लागते, तेव्हा कलिपुरुष तिला नाना प्रकारे त्रास देऊ पाहतो.अंतिम क्षणी कलिचे सर्व प्रयत्न विफल झाल्यावर अनसूया माता त्या कलिपुरुषाला शुध्दतेची व पावित्र्याची जरब बसणे आवश्यक आहे हे जाणून तिच्या चरणांवर अका अतिशय गरीब,अशिक्षीत परंतु निस्सीम भक्ती करणार्‍या भक्ताने वाहिलेले पळसाचे पान केवल संकल्पमात्रे व तेही दत्तगुरुस्मरण अखंड राखून कलिपुरुषावर फेकते आणि पुढे काय घडते हे आपण सारे जाणतोच की कलिची किती अगतिक, हीनदीन अवस्था करून अनसूया माता त्याला गलितगात्र करते व शरण येण्यास भाग पाडते.
  आता ह्याच नोहॉन म्हणजे पलाशवृक्षांनी वेढलेल्या गुंफेत डेमेटरला आढळतात “तत्पर” अवस्थेतील निरनिराळी युध्दयंत्रे, यंत्रिका, अस्त्रे आणि शस्त्रे !
  म्हणजेच अंतिम निर्णायक धर्मयुध्दाची जय्यत तयारी !!!
  येथेच डेमेटर थबकली आहे १५० फूट उंचीचे प्रचंद मानवी आकाराचे विलक्षण यंत्र आणि त्यावरील “सर्वयंत्रविनाश” हा माता सोटेरियाच्या खास सोटेर लिपीत कोरलेला शब्द वाचून ! कारण ही लिपी माता सोटेरिया, इनाका, झियस, इपेटस व डेमेटर ह्यांच्या व्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीला ठाऊक होती आणि तो होता तिचा प्रिय “हेफॅस्टस” ! आणि पुढे त्रिविक्रमावरील भक्तीतून येणार्‍या माता सोटेरियाच्या असंख्य आशीर्वादांची परिणीती म्हणजे साक्षात “हेफॅस्टस” च्या कुशीत स्थिरावलेली डेमेटर !
  अगणित उत्कंठा, अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा दाटविणारे हे माझ्या बापूरायाचे अग्रलेख !!!
  बापूराया खरेच खूप खूप खूप अंबज्ञ आहोत की आम्ही सारी तुझी लेकरे , जो हा अफाट ज्ञानाचा सागर तू आम्हासाठी मुक्त हस्ते उधळीला आहे. खरेच हे अत्यंत गूढ , अनाकलीय सत्य केवळ आणि केवळ तूच आम्हाला सांगू शकतोस.
  त्या यंत्रावरील “सर्वयंत्रविनाश” हा शब्द वाचताना अचानक बापूकृपेने आठवले की आपल्याला जो “दत्तमालामंत्र” आपले बापू म्हणायला लावतात दिपावलीतील धनत्रयोदशीच्या पूजनाच्या वेळीस त्यात दत्तमालामंत्रात आपण शेवटच्या कडव्यात म्हणतो –
  सर्वमंत्रस्वरूपाय, सर्वयंत्रस्वरूपाय, सर्वतंत्रस्वरूपाय, सर्वपल्लवस्वरूपाय ॐ नमो महासिध्दाय स्वाहा ।।
  “आनंदसाधना” मधील परिशिष्ट १ – मध्ये ह्याचा अर्थ बापूंनी सांगितला आहे की सर्व मंत्र, सर्व यंत्रे, सर्व तंत्रे, व सर्व पल्लव हे ज्यांचे स्वरूप आहे अशा महासिध्द दत्तात्रेयांना नमस्कार असो. ह्या यज्ञात मी दत्तात्रेयांना आहुती अर्पण करतो.
  म्हणजेच सर्व यंत्र ज्याचे स्वरूप आहे तोच सर्वयंत्र विनाशासाठी सुध्दा सहाय्यभूत होऊ शकतो आणि “त्या” अवधूत सदगुरु दत्तातेयांची कृपा आदिमाता चण्डिकेच्या , महादुर्गेच्या आणि त्रिविक्रमाच्या भक्तीतूनच मिळू शकते. म्हणजेच महामाता सोटेरिया आणि तिच्या परिवाराला “सर्वयंत्रस्वरूप” भगवान दत्तात्रेयांची कृपा, आशिर्वाद नक्कीच लाभणार आहेत.
  ह्यात आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आढळली की ६ डिसेंबरच्या अग्रलेखाच्या बाजूलाच दैनिक प्रत्यक्ष मध्ये एक तिसर्‍या महायुध्दाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी छापली गेली होती आणि ती म्हणजे –
  “तिसरे महायुध्द सुरु रशियाची आण्विक सिध्दता ” या बातमीत उल्लेख होता – लष्करी तळ उध्दवस्त झाल्यानंतरही संरक्षणदलांना प्रतिहल्ल्याची ऊचना व आवश्यक माहिती पुरविण्याची जबरदस्त क्षमता असलेले ’इल्युशिन आयएल-८०’ हे अतिप्रगत विमान ! या विमानाला ’डूम्सडे प्लेन’ अर्थात प्रलयाच्या दिवशी वापरले जाणारे विमान असे म्हटले जाते. आण्विक किंवा सर्वसंहार करणार्‍या भयंकर हल्ल्यात लष्करी तळ, जवान व अधिकारी ह्यांचा बळी गेल्यानंतर ’आयएल – ८०’ विमानांचा वापर करता येऊ शकतो. ह्या विमानाचा माग काढणे अशक्य कोटीतील बाब असते आणि त्यामुळे ’आयएल – ८०’ ही अजेय यंत्र्णा ठरते असा रशियाचा दावा आहे. रशियाखेरीज अमेरिकेकडेच अशी यंत्रणा असलेले विमान आहे.
  ह्या बातमीतील ” सर्वसंहार ” हा शब्द आणि अग्रलेखातील “सर्वयंत्रविनाश” हा शब्द कोठेतरी समान धागा दर्शवित आहेत असे राहून राहून वाटते. कदाचित हे चुकीचे असेलही पण बापूच आपल्याला एकाच पानावर ह्या दोन्ही साधर्म्य असणार्‍या बातम्या दाखवून येणार्‍या काळाची दिशा दर्शवित आहेत असेच वाटते कारण हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. बापूच गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात जगविख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइन यांच्या “माणूस ज्याला योगायोग म्हणतो, ती खरं तर भगवंताने नामानिराळे राहून त्या मानवाच्या हितासाठी केलेली योजना असते”, (coincidences are nothing but the God’s ways of remaining Anonymous) ह्या वाक्यासंदर्भात सांगितले होते की योगायोगाला अस्तित्व नसून ती भगवंताची लीला असते आणि भगवंत स्वत:कडे कुठलेही श्रेय न घेता लाभेवीण प्रेमाने आपल्या लेकारांसाठी त्यांच्या विकासाची योजना कार्यान्वित करत असतो.
  खरेच दैनिक प्रत्यक्ष मधून आपले सदगुरु बापूच येणार्‍या काळाची पावले आपल्याला समजावून दाखवित आहे प्रत्यक्षपणे आणि तेही आपल्या स्वत:कडे कुठलेही श्रेय न घेता, सारे श्रेय आदिमातेच्या चरणी अर्पण करून – हेफक्त तिचा पुत्र परमात्मा, त्रिविक्रमच करू शकतो – “लाभेवीण प्रेम”
  अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ
  हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.
  बापूराया तुझ्याच कृपेने आम्ही सारी तुझी लेकरे तुझ्या आणि आदिमातेच्या चरणी अंबज्ञ आहोत आणि सदैव अंबज्ञच राहू !
  जय जगदंब जय दुर्गे !!!

  सुनीतावीरा करंडे

  #534410

  shantanu natu
  Participant

  आजच्या अग्रलेखामधे (११८४) एन्की व एनलील (Enki & Enlil) ह्यांच्या पुर्व स्मृती मेड्युसा (Medusa) जागृत करुन देते आणि सांगते कि तुम्ही एकच एक आहात.
  ह्यावरुन अस वाटत, कि मातृवात्सल्यविंदानम मधे नमुद केलेले आद्य असुर ​​द्वयी म्हणजेच मधु व कैटभ म्हणजेच हे एन्की व एनलील तर नसतील ?

  कारण ह्या आधि देखील अग्रलेखांमधुन मातृवात्सल्यविंदानम ग्रंथामधे दिलेला reference आला होता, आणि तो म्हणजे महर्षी सुमेधस व समाधी वैश्य.
  मातृवात्सल्यविंदानम मधे बापु लिहितात कि ह्या आदिमातेच्या आख्यानाचा काही भाग महर्षी सुमेधसाने सम्राट सुरथ व समाधी वैश्य ह्या दोघांना कथन केला व ह्यातुन सप्तशती आख्यान तयार झाले!

  आता आपल्याला माहित झाले आहे कि सम्राट सुरथ म्हणजेच सॉरेथस (sorethus) व समाधी वैश्य म्हणजेच चिलोपस (chilopus), व ह्या दोघांनी काय काय केले.

  त्याच प्रमाणे आजचे आलेले एन्की व एनलील (Enki & Enlil) ह्यांचे वर्णन हे मधु व कैटभ ह्यांच्या वर्णनाशी मिळतेजुळते वाटते.

  कारण, मेड्युसा स्पष्टपणे म्हणते कि,
  > कालप्रवाहामधे अगदी पहिल्यापासुन एन्की व एनलील आहेतच
  > पहिला एन्की व पहिला एनलील हेच दुसरे, तिसरे एन्की व एनलील होते व आत्तादेखील ५० वे एन्की व एनलील हेच पहिले आहेत.
  > हि सम्राट अनु ने केलेली व्यवस्था आहे व हि सदैव अशीच राहील!
  > कारण जेव्हा जेव्हा मानव कर्मस्वातंत्र्याचा गैरवापर करतो व त्रिविक्रमाला आणी महादुर्गेला नाकारतो तेव्हा तेव्हा त्यांच्या देवतेची, स्कालीची ताकद आपोआप वाढते!

  मात्र ह्या सर्वांवर कडी करण्यासाठी महामाता सोटेरिया (Soteria) आहेच, फ़क्त तिलाच कळतं कि हे लोक इनाका समोर नाटक करत आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आता माता शिवगंगागौरी देखील स्वत: आली आहे !

  ह्या वाइट लोकांची एकी झालेली असली, तरिदेखील चांगल्या लोकांच्या बाजुने ऍफ़्रोडाइट (Afrodite), हर्क्युलीस (Herculis), महामाता सोटेरिया, स्वत: त्रिविक्रम, स्वत: माता शिवगंगागौरी तसेच चिलोपस, हायपेरियोन, अस्लेपियस झिदस (Aslepius Zidus) सारखे अनेक वीर आहेतच.

  आता पुढे काय होतय हे बघण्याची प्रचंड उत्सुकता लागुन राहीली आहे!!!

  #534599

  Suneeta Karande
  Participant

  हरि ॐ.
  आजचा तुलसीपत्र ११८४ चा दिनांक ०८-१२-२०१५ चा अग्रलेख वाचताना बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद् अर्थात् श्री स्वस्तिक्षेमविद्या ह्या ग्रंथात
  अध्याय ३ मध्ये लिहीलेले आठवले की साक्षात त्रिविक्रम प्रत्येक कल्पामध्ये घडत राहिलेला वैश्विक इतिहास उत्तम व मध्यमाला समजावून सांगतो की जोपर्यंत मानव आहे व मानवामध्ये दुराचार आहे , तोपर्यंत ह्या वृत्राचा एकदा वध झाल्यानंतर मानवांच्या दुष्कृत्यांनी ऋतनियमांची मर्यादा पार केली की वृत्र जिवंत होतोच व जोरदारपणे कार्य करू लागतोच.
  कारण ह्या वृत्राचा देह मधु-कैटभाचा आहे, ह्या वृत्राचा प्राण मानवाचे दुराचार व अश्रध्दा हेच आहेत आणि ह्या वृत्राचे मस्तक महिषासुर आहे.
  त्यामुळे ह्या वृत्राला जिवंत ठेवतो तो मानवच !
  आता महिषासुर म्हणजेच सध्याच्या प्रचलित भाषेत बफोमेट म्हणून ओळखला जाणारा सैतान आणि दैनिक प्रत्यक्षच्याच १४ जानेवारी २०१४ च्याबातम्यांमधून आपण वाचले होते की Arizona प्रांतात बफोमेटचे देऊळ बांधले गेले शेवटी तेथील जनसामान्यांच्या तीव्र विरोधाला झुगारून … म्हणजेच हा वृत्रासुर , महिशःआसुर , बफोमेट आज कार्य जोमाने करीत आहेत ते आम्हा मानवांच्याच दुराचाराने , अभक्तीने आणि त्रिविक्रमाला आणि त्याच्या मातेला आदिमाता चण्डिकेला (महादुर्गेला) नाकारल्यामुळे !
  पुढे ह्याच उपनिषदात बापूंनी अध्याय ३० मध्ये परशुरामाने उत्तम , मध्यम व विगताला माणूस विगति का होतो ह्या त्यांच्या प्रश्नाचे दिलेले उत्तर आठवले. खरेच आजच्या अग्रलेखातून तेच सत्य पुन्हा एकदा प्रकाशित झाले आहे असे वाटते.
  भगवान परशुराम म्हणाले होते की हे सुगति ! तू विगतो होतास कारण तू सर्वसुखात असताना प्रश्न विचारत होतास, ” आदिमातेला शरण मी का म्हणून जायचे ? ” व पुढे परशुरामांनीच समजावून सुध्दा सांगितले होते की हाच अशा अनेक श्रध्दावान विगतांचा व श्रध्दाहीन दुर्गतांचाही प्रश्न असतो व तो प्रश्नच त्यांचा घात करतो. पुढे परशुराम अधिकच स्पष्टपणे खुलासा करीत बोलले होते की अरे मित्रांनो ! ह्या प्रश्नाचे अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर देतो,
  हे शाश्वत व अपरिवर्तनीय वास्तवच सत्य आहे की कुणीही मानवच काय परंतु रावण, महिषासुर व वृत्रासुरसुध्दा तिला युध्दात जिंकू शकत नाहीत, जो जो चण्डिकेशी कृतघ्नतेने वागतो व असा प्रश्न विचारतो, तो असुरसैनिकच असतो व म्हणून तो महिषासुरसैनिक स्वत:च दुर्गेशी युध्द छेडत असतो व अशा युध्दात चण्डिकेशी लढ्णार्‍यांचा सर्वनाश हा ठरलेलाच.
  आणि आज बापूच परत अग्रलेखातून हेच सत्य परत मांडीत आहे मेडयुसाच्या तोंडातून की सम्राट अनुने निन्कूच्याच मदतीने स्कालीची घोर साधना करून निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि ही अशीच सदैव चालू राहील कारण जोपर्यंत मानव आहे, त्या मानवाकडे कर्मस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य आहे,
  जोपर्यंत मानव त्या महादुर्गेला ( अर्थातच आदिमाता चण्डिकेला) व त्रिविक्रमाला नाकारू पाहतो, त्यांची उपेक्षा करतो, त्यांच्या क्षमेचा गैरवापर करतो, तोपर्यंत ’स्काली’चे अस्तित्त्व तोच टिकवून ठेवत असतो. आणि ’ स्काली ’ ह्या स्व:च्याच ताकदीशिवाय अंकारा काहीही करू शकत नाही. व म्हणूनच आपण सर्व कुविद्याधारक मानवाला सतत देवयानपंथापासून दूर नेत राहतो. कारण त्यातच स्कालीचे सामर्थ्य दडलेले आहे व आपण सर्वजण त्या स्कालीचेच कार्य करत असतो आणि तीच आपल्याला सामर्थ्य पुरवीत राहते.
  बापू प्रवचनात आपल्याला नेहमी सांगतात की भगवंताला नकार म्हणजेच सैतानाला होकार. माणसाने एकदा जर का रामाला नाकारले की त्याला पाहिजे असो वा नसो त्याचा रावणाच्याच राज्यात प्रवेश हा होतोच. म्हणजेच येथे आजच्या अग्रलेखातून हे स्पष्ट कळते की देवयान पंथावरून माणसाला दूर ठेवण्याचा हे दुराचारी , वामाचारी , कुविद्येचे पुरस्कर्ते नेहमीच प्रयत्न करतात.
  मग आता माणसाला म्हणजे आपल्याला ठरवायचे असते की आदिमातेची आणि तिच्या पुत्राची त्रिविक्रमाची बांधिलकी ठेवाय़ची , त्यांना शरण जाऊन त्यांनी दाखविलेल्या देवयान पंथावर चालायचे का असुरपंथीयांना स्विकारून सैतानाचा, बफोमेटचा, महिषासुराचा मार्ग धरायचा .
  “त्या” ला नाकारणे , भगवतीला वा भगवंताला नकार म्हणजेच सैतानाला होकार असेच जणू समीकरण बनले आहे. हे सर्व टाळायचे असेल तर माझ्या जीवनाची सूत्रे मला माझा एकमेव आधार व माझा खराखुरा एकमेव आप्त असणार्‍य़ा ” त्रिविक्रमा”च्या हाती सोपवायलाच हवीत.. म्हणूनच आपले महाधर्मवर्मन डॉक्टर योगिंद्रसिंह जोशी त्यांच्या एका अभंगात म्हणतात –
  देवयान पंथी पार्थाचा सारथी तोच माझा साथी अखेरीचा
  पार्थाचा सारथी साक्षात भगवंत श्रीकृष्ण स्वत: झाले होते, आणि “तो” भगवंतच माझा शेवटचा साथी असतो, सदैव माझ्या सोबत असतोच हे विसरून आम्हांला चालणार नाही.
  महामाता सोटेरियाची त्रिविक्रमावरची आणि महादुर्गेवरची अनन्य भक्ती आणि तिचा अढळ विश्वासच सदैव तिला सत्य दाखवितो. आपण हे नेहमी ऐकतो की Truth is to be revealed and not to be told.
  अगदी ह्याच न्यायाने इनाकाला जरी मेडयुसा , सेमिरामिस ह्यांनी नाटक करून फसविले असले तरी चाणाक्ष महामाता सोटेरियाने बरोबर ओळखले आहे की हे त्यांनी केलेले नाटक आहे.
  प्रथमशुक्राचार्यांचा पुन्हा झालेला सक्रीय प्रवेश आणि स्कालीचे त्यांना मिळणारे सहाय्य ह्या गोष्टी ध्यानात घेता पिंडार, पॅंडोरा, बफोमेट, केरीडवेन च्या युती विरुध्द स्कालीच्या अधिपत्याखाली प्रथमशुक्राचार्य ,सेमिरामिस, मेडयुसा, सर्की अशी युती असे नवीनच वळण लागेल असे चित्र दिसत आहे, ह्या त्यांच्या आपापसातील कलहामध्ये कोणाचे पारडे जड होईल आणि महामाता सोटेरिया, ​​सेरापिस अनुबिसच्या रूपातील महर्षि सुमेधस ह्या सर्वांना कसे पुरुन उरतील हे वाचण्याची उत्कंठा वाढतच जात आहे….

  जय जगदंब जय दुर्गे

  हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ.
  सुनीतावीरा करंडे

  #535704

  || हरी ॐ श्री राम अंबज्ञ ||
  तुलसीपत्र ११८४ (८/१२/२०१५)लेखात आपण पहिले कि कुविद्याधारक कसे खोटे नाटक करतात ,फसवितात ,स्वार्थासाठी कसे एकजूट होतात.मेड्युसाने सेमिरामिसला मारण्याचे नाटक केले व सेमिरामिसने मेल्याचे नाटक केले.इनाका तेथून निघून गेल्यावर मेड्युसा ,सेमिरामीस ,kronos,Moros एकत्र आले . मेड्युसाने त्यांना अगर्थानगरी बद्धल सांगितले व वारुळाच्या मुखावरील सर्पाला होकारार्थी स्पर्श करताच त्या शेपटाला धरून प्रथम शुक्राचार्य ,ओसिरीस ,हॉरस ,मोलोच ,व सर्की आत आले.
  हे सर्व कुविध्याधारक निरनिराळ्या कुविध्यांमध्ये प्रवीणच होते.पिंडारविषयी पुसटशी शंका घेतली तरी काय शिक्षा होते हे मेड्युसाने अनुभवले होते.परंतु हे कुमार्गी ,कुविध्याधारक ह्या लोकांकडे फायदा आणि स्वार्थ ,सत्ता आणि काम ह्याचीच लालसा असते.ह्या शिवाय दुसरे काहीच नाही.हे कुविध्याधारक कधीच कोणावरही विश्वास ठेवत नाही व एकमेकांशी कधीच प्रामाणिक राहत नाही. कुविध्याच्या पातळीवर माता,पिता ,पुत्र,बंधू अशी नाती नसतात.
  मेड्युसा PANDORA ची कन्या व पिंडारची नात आहे.परन्तु तिला त्यांची गुलामी मान्य नाही.तिला पिंडारची सत्ता उलथून टाकायची आहे.कारण पिंडार स्कालीचा पुत्र आहे त्यामुळे तो त्याला हवे तेच करणार व तोच स्कालीसाधनेच्या आड येतो.सर्कीकडील स्कालीची मूर्तीसुद्धा पिंडारच्या अप्रत्यक्ष सहय्यामुळेच सोटेरीयाला जाळून टाकता आली.kronos व ओसिरीसची स्मृती पिंडारनेच ताब्यात ठेवली.Solomon झेलहुआ हाच मूळ बफोमेट आहे.बफोमेट पिंडारचा सर्वात लाडका आहे.आणि निन्कू अर्थात केरिडवेन अर्थात झेना हि बफोमेटची अत्यंत प्रिय साथीदार आहे. दनुशीहि पिंडार व pandoraने विश्वासघात केला.
  मेड्युसा सांगत होती स्कालीची कृपा मिळविण्याच्या आड पिंडार व pandoraच येत राहतात ,कारण त्यांना फक्त बफोमेट व केरिडवेन ह्यांनाच कुविध्यासम्राट व कुविध्यासम्राज्ञनी ह्या पदावर स्थिर करयचे आहे.
  पिंडार म्हणजे शुक्राचार्य ,अंकाराचे व त्याचे अतूटनाते.अंकाराचा एकमेव सर्वोच्च सेनापती ,साधक,शिष्य अर्थात सर्वात प्रिय प्रतिनिधी .प्रत्येक पिंडाला अर्थात शरीराला रुक्ष व शुष्क करणारा .वेदना हे त्याचे शस्त्र व अस्त्र .शारीरिक व मानसिक वेदना हे त्याचे अस्त्र . pandora म्हणजे प्रत्येक कुविव्धेचा व प्रत्येक वेदनेचा स्त्रोत .
  मेड्युसाप्रमाणे सेरापीस अनुबिसची पत्नी स्थेवो तिच्या पतीच्या विरोधात आहे व ती पिंडारच्या पक्षात नक्कीच नाही.तर प्रथम शुक्राचार्यांची पत्नी केरीडवेनसुद्धा तिच्या पतीच्या विरोधात आहे.ती पिंडारच्या पक्षात आहे.ह्यांना नाती नसतातच.फक्त स्वार्थ.
  स्वार्थासाठी कुविध्याधारकांची एकजूट झाली.प्रत्येकाकडे विशेष प्राविण्य होते.सेमिरामीस –निकेजा विद्या , मेड्युसा—क्रतक्षक विद्या,सर्की व मोलोच –पिक्यात्रीक्स ह्या सर्व विद्या एकमेकांशी जोडून kronos व ओसिरीसकडील एन्की व एनलिल विद्या जागृत करण्याच्या कार्यात एकजूट दनुची शपथ घेऊन केली.
  इथे हे शपथ घेऊन स्कालीचा जयजयकार होत असतानाच भयानक अक्राळविक्राळ स्कालीची आकृती प्रकट झाली व बोलू लागली पिंडार माझा पुत्र असला तरी माझ्या साधकांच्या व माझ्या आड येत राहतो.त्यामुळेच मी मेड्युसाची “मूर्तिमंत कुविध्या” ह्या स्वरुपात निर्मिती केली.मलाही पिंडारला आळा घालून ताब्यात घायचे आहे.एकत्र रहा व कामास लागा.तुम्हा सर्वांची शत्रू Afroditeच आहे.
  ह्या कुविध्याधारकांना माता चंडिका व तीचा पुत्र त्रिविक्रम व Afroditeची ताकद ,सामर्थ्य श्रेष्टत्व,क्षमाशीलता माहित आहे.कुमार्गी हॉरेवानसला खरोखर पश्चातापझाला,कुमार्गियांबद्धल घृणा उत्पन्न झाली व त्याने आदिमाता महादुर्गेचे स्मरण केले तेव्हा माताशिवगंगागौरीने मदत केलीच.
  ह्या कुमार्गीयांचे श्रद्धावानास देवयानपंथापासून दूर नेण्याचे प्रयत्न असतात.सम्राट अनुने निन्कूच्या मदतीने स्कालीची घोर साधना करून निर्माण केलेली अवस्था आहे व अशीच सदैवचालू राहील.कारण जो पर्यंत मानव आहे,त्याच्याकडे कार्मस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य आहे, जोपर्यंत मानव त्या महादुर्गेला व त्रिविक्रमाला नाकारू पाहतो,त्याच्या क्षमेचा गैरवापर करतो ,त्याचीउपेक्षा करतो ,तोपर्यंत “स्कालीचे अस्तित्व तोच टिकवून ठेवत असतो.
  आणि “स्काली” ह्या स्वतःच्याच ताकादिशिवाय अंकारा काहीही करू शकत नाही व म्हणूनच सर्व कुविध्याधारक मानवाला देवयानपंथापासून दूर नेत राहतो.
  आपण खूपच भाग्यवान आहोत. साक्षात त्रिविक्रम अनिरुद्ध बापू आपल्या बरोबर आहेत.आपल्यासाठी ते अहोरात्र कष्टत असतात.परंतु आम्ही बापू सांगतात तशी भक्ती,सेवा,आचरण ,मार्यादापालन केलेच पाहिजे.कारण ते असुरीपंथाचे लोक स्कालीचे उपासक स्वतःचे वर्चस्व निर्माण करू पाहत आहे.
  ३ रे महायुद्ध जवळच येऊन ठेपले आहे .आपण तरुन जाणारच .असुरांशी व वाईट मनुष्याशी लढताना किंवा असुरांच्या त्रासापासून संरक्षण करताना कुणीही “ सच्चा श्रद्धावान “ कधीही एकटा नसतोच.श्रद्धावानाने आदिमातेची भक्ती करीत करीत सद्गुरूंचे बापूंचे बोट धरून आपले काम करीत राहावे.कुठल्याही प्रकारच्या असुरांचे काहीच चालणार नाही.(उपनिषद अ.२५ )आदिमाता चंडिका काहीही करू शकते. माता शिवगंगागौरी व भगवान किरातरुद्र ह्यांच्याकडे आदिमातेने ह्या तमाचार तांत्रिकांच्या दुष्ट प्रयोगांपासून श्रद्धावानांना वाचविण्याचे कार्य सोपविलेले आहे.माता शिवगंगागौरी चंडिका भक्तांच्या बाह्यशत्रूंच्या कटकारस्थानापासून जसा बिमोड करते तशीच ती देवनिंदा,धर्मनिंदा व श्रद्धावाननिंदा करणार्यांना सजा देत राहते व श्रद्धावानांच्या बुद्धीला भ्रमित करू पाहणाऱ्या कुविद्ध्यांचाही नाश करते.’माता शिवगंगागौरीची नामावली’ व ‘किरातरुद्रसूक्त’ह्यामुळे श्रद्धावानाला तमाचार तंत्रापासून भय उरत नाही.(उपनिषद अ.२०).आदिमातेच्या नखाचे लहानसे अग्रसुद्धा असंख्य वृत्रांच्या सर्व शस्त्रांना छिन्नभिन्न करून टाकते.हे वास्तव ज्याने जाणले तोच सुखी होऊ शकतो.कारण विश्वाचे नियम वृत्रासुर ठरवत नाही .विश्वाचे नियम आदिमाता चंडिका ठरवते.
  अ.३१ त्रिविक्रम उवाच : “तुम्ही कितीही विद्वान ,विध्यापारंगत ,मंत्रापाठक आहात त्याने काहीच फरक पडत नाही.सर्व काही एकाच गोष्टीवर ठरते, तुमचा माझ्या आदिमातेवर किती शुद्ध विश्वास आहे.
  एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ||
  आदिमाते तू प्रेमळ आहेस मी अंबज्ञ आहे.
  बापू तूच आमचा एकमेव आधार आहे.तू प्रेमळ आहेस मी अंबज्ञ आहे.

  अंबज्ञ डॉ.ज्योतीवीरा मोहन.

  #539005

  Suneeta Karande
  Participant

  हरि ॐ.
  दिनाक ११-१२-२०१५ चा अग्रलेख तुलसीपत्र ११८५ वाचताना एक महत्त्वाची बाब प्रकर्षाने जाणवली की वैश्विक अंकारा महासंघाच्या अत्यंत महत्त्वाच्या सभेत प्रमुख प्रतिनिधी वसुंधरेवरील घडामोडींविषयी चिंता व्यक्त करीत होते – कारण ती वसुंधराच सर्व विश्वाच्या सूत्रस्थानी होती. ह्यावरून आपल्या वसुंधरेचे महत्त्व अधोरेखित होते. पावित्र्याची ताकद किती प्रचंड असते, जबरदस्त असते आणि ती मी मी म्हणणार्‍या भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळवू शकण्यास समर्थ असते हेही सिध्द झाले. तेथे मग तो अनुनाकीय असो, दुराचारी असो वा वामाचारी पंथीय असो, सार्‍यांनाच वसुंधरेच्या महतीचा चांगलाच दरारा होता हे लक्षात येते आणि हे वाचताना नकळत (बापूकृपेनेच)आठवले मातृवात्सल्य उपनिषद !
  उपनिषदातील पहिल्याच अध्यायात आपण वाचले होते की आदिमाता चण्डिकेने वसुंधरा पृथ्वीवर स्थापन केलेल्या त्रिविक्रम लिंगातून स्वत:च निर्माण केलेल्या श्रीत्रिविक्रमास आज्ञा केली होती की वसुंधरेच्या पावित्र्याचे केंद्रस्थान असलेल्या “श्रीगुरुक्षेत्रम्” पासून स्थूल प्रवास सुरु कर. म्हणजे युगानुयुगे आदिमाता आणि तिचा पुत्र श्रीत्रिविक्रम ह्या वसुंधरेचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि जपण्यासाठी सतत झटतच असतात असे मला वाटते.
  पुलिका जरी सेमिरामिसची मनोनियंत्रित गुलाम म्हणून काही काळ अनुनाकीयांच्या ताब्यात होती तरी तिने तिच्या लेकीला आशियाला ती माता थियाकडे वाढत असताना नियमितपणे भेटून ’झिबाल्बन’ ही झिबाल्बामधील अर्थात दनुच्या साम्राज्याची भाषा शिकवलेली होती जी आता आशियाला सम्राट अ‍ॅपोरोजाटसच्या साम्राज्यात वावरताना किती उपयोगाची ठरते ह्यावरून दूरदर्शी स्वभावाचे महत्त्व समजते. आशिया किती सावध राहून चाणाक्षपणे पावले उचलत आहे ह्यावरून ह्या नाट्याची भीषणता , त्यातील थरारकता स्पष्ट जाणवते. सम्राट अ‍ॅपोरोजाटसने केलेल्या झिबाल्बन भाषेतील स्वागताला आशि-थाडा रूपातील आशिया झिबाल्बन भाषेतूनच मोठ्याने शुभेच्छा देऊन अत्यंत जोरात ’माता दनुचा जयजयकार असो’ अशी ललकारी देते ह्यावरून तिच्या हजरजबाबीपणाचे आणि प्रसंगावधानतेचे कौतुक करावे तितके थोडेच वाटते.
  आपल्या इष्ट देवतेच्या महादुर्गेच्या आणि त्रिविक्रमाच्या विरोधी शत्रूपक्षात सामील होऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन कार्य करणे ही खरेच किती कठीण गोष्ट आहे तरी देखिल आशिया ज्या प्रकारे एकेक पावले उचलत आहे त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे, मुळात हे सर्व करताना किती प्रचंड भक्तीचे, श्रध्दा , सबूरीचे पाठबळ असायला हवे आणि आपल्या परमेश्वराच्या चरणांवर किती पराकोटीचा विश्वास असावा लागतो हे कळते आणि लक्षात येते का आपल्याला सदगुरु बापूंनी “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता सदगुरु ऐसा” हा संकल्प वर्षभर जपायला लावला होता.
  येथे आशिया असो वा पुलिका वा अ‍ॅटलास ( वेशांतर करून वावरणारा टॉलॉस म्हणजेच आशियाचा पुत्र) वा हायपेरिऑन वा हेस्टिया वा अनंतव्रत -सर्वच जण आपल्याला त्यांच्या त्यांच्या आचरणातून दाखवतात की त्यांना जरी स्वत:ला सोयीस्कर असणार्‍या प्रांतातून (कम्फर्ट झोनमधून) बाहेर काढून जीवावर बेतणार्‍या संघर्षाच्या प्रांतात टाकले गेले तरीही ते त्रिविक्रमाला किंवा महादुर्गेला किंवा महामाता सोटेरियाला कधीच का म्हणून प्रतिप्रश्ण करीत नाहीत , कधीच नाही. एवढा अढळ विश्वास, अटळ श्रध्दा असल्याशिवाय आणी पराकोटीची सबूरी असल्याशिवाय हे शक्यच नाही. मला वाटते बापूंना आणि आदिमातेला हाच पराकोटीचा विश्वास , अनन्य शारण्य आणि धैर्य आणि सबूरी आपल्या कडून अपेक्षित आहे , येणार्‍या काळात आपल्या सदगुरुंसोबत चालण्यासाठी असेच हे अग्रलेख शिकवत आहेत जणू!
  आतापर्यंत प्रेमप्रवास मध्ये बापूंनी सांगितलेली आचमन ७१ मधील तितिक्षा नीट समजत नव्हती पण ह्या डिसेंबर महिन्याच्या कृपासिंधुत महाधर्मवर्मन डॉक्टर योगिंद्रसिंह जोशी ह्यांनी लिहिलेला “उपासनेला दृढ चालवावे – भाग ५ ) हा वाचून आणि सदगुरु बापूंच्या तुलसीपत्र ११८५ ह्या अग्रलेखाला वाचून थोडे थोडे समजायला लागले आहे असे जाणवते.
  बापूंनी लिहिले होते की बाहेरील सुख-दु:ख, अडचणी, लोभ, मोह, त्रास, निंदा ह्या सर्वांना प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देण्यास शिकणे म्हणजेच ’तितिक्षा’
  अ‍ॅटलांटिसा प्रांताकडे निघून तीन दिवसाच्या प्रवास करूनही आपल्या बाजूला कोण यानचालक बसला आहे हे जाणून न घेता शांत बसणारी संयमी आशिया, मानवांना ज्या अ‍ॅटलांटिसा नगरीचे नावच फक्त माहीत आहे अशा अगम्य प्रांतात पाऊल टाकाय़ला न डगमगणारी आशिया, तिचा स्वत:चा पुत्र अ‍ॅटलास तेथे काही महिने वास्तव्य करत असून त्याच्याकडून आलेली कुठलीही माहिती तिला देण्यात आलेली नसतानाही त्याचा अर्थ तिला अ‍ॅटलांटिसावर कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय उतरणे आवश्यक आहे असे नीट समजावून घेणारी आशिया , पाषाणयंत्रे पाहताच प्रथमशुक्राचार्यांनी अल्बिऑन ( Britain) प्रांतात स्थापन केलेल्या पाषाणयंत्राचे स्मरण करून निर्णय घेणारी आशिया, आणि महादुर्गेची भक्त असूनही कार्याच्या पूर्ततेसाठी दनुच्या नावाचा जयजयकार अत्यंत जोरात ललकारी देऊन करण्यास न कचरणारी आशिया —- सारे काही अगम्यच वाटते … तितिक्षेचा खरा अर्थ बापूराया आज तुझ्या कृपेने तुझ्याच शब्दांतून थोडा तरी समजायला लागला ह्याचा आनंद होत आहे.

  बापूराया अजब तुझी लीला ! आता शेवटची खूण पुलिकाने महामाता सोटेरियाला कळवली आहे आणि त्यातही आरकॉन व पुलिकाला झिबाल्बामध्ये जायला हरकत नाही असा संदेशही दिला जातो म्हणजेच पुलिका हे पात्र दोन भूमिकांमध्ये खेळवले जात आहेत. आता महामाता सोटेरियाची पुढची आक्रमक खेळी काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच एकीकडे पुलिका सॉलोमन झेलहुआने दिलेल्या सांकेतिक नावानुसार डेल्टा आहे तर स्वत: पुलिका महामातेला सांगते तिलाच दोन्ही ठिकाणी ’ओमेगा’ म्हणत आहेत – त्या वैश्वैक अंकारा महासंघाच्या सभेमध्ये आणि झिबाल्बामध्येही … काय भयानक गुंतागुत चालली आहे … बापूच आता काय सत्य त्यावर प्रकाश पाडतील ….

  आदिमाता चण्डिकेचा जयजयकार ! जय जगदंब जय दुर्गे !
  मोठ्या आई आम्ही खूप खूप खूप अंबज्ञ आहोत की तू आम्हाला साक्षात तुझ्या पुत्राच्या त्रिविक्रमाच्या हाती सोपवलेस, वसुंधरा पॄथ्वीवर जन्माला घातलेस आणि वसुंधरेच्या पावित्र्याचे केंद्रस्थान असलेल्या “श्रीगुरुक्षेत्रम्” चे दर्शन घडविलेस आणि सर्वात महत्त्वाचे आमच्या बापूंच्या कृपेनेच त्यांच्या चरणीची आणि तुझ्या चरणीची अंबज्ञता शिकवलीस. आदिमाते सर्व काही सुटले तरी चालेल पण ही तुझ्या आणि त्रिविक्रम बापूंच्या चरणीची अंबज्ञता कधीही सुटू देऊ नकोस !

  जय जगदंब जय दुर्गे !

  हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ
  सुनीतावीरा करंडे

  #544836

  Suneeta Karande
  Participant

  हरि ॐ.
  तुलसीपत्र ११८७ हा दिनांक १५-१२-२०१५ चा अग्रलेख वाचताना बापूंनी लिहिलेले मातृवात्सल्यविन्दानम् आठवले.
  मातृवात्सल्यविन्दानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद: ह्या ग्रंथात आपण ११व्या अध्यायात वाचले होते की आदिमाता महिषासुरमर्दिनीने महिषासुराचे खड्गाने मस्तक छेदिले व परशुने त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले. पुढे २० व्या अध्यायात वाचतो की महासरस्वतीने अतिशय क्रोधाने शुंभाचे अक्षरश: शेकडो तुकडे केले होते. ते वाचताना आजपर्यंत वाटत होते की ह्या असुरांना आदिमातेने मारले म्हणजे असुरांचा समूळ नाशच झाला पण आज कळते की ह्या कपटी पाताळयंत्री प्रथमशुक्राचार्याने फोमॅलहुतान ग्रहावर दनुच्या सहाययाने महिषासुर , शुंभ व जंभासुराचे दहन न होऊ देता त्यांचे मृत अवशेष दफन करून ठेवलेले होते. आदिमातेने एवढ्या वेळेला ह्याच्या प्रत्येक धूर्त योजनेला पाने पुसली असूनही हा जरासुध्दा बधत तर नाहीच उलट दरवेळेला नवीन नवीन युध्दाच्या क्लृप्त्या शोढून काढायला थकत नाही. अशा ह्या नीचाला सुध्दा आदिमाता क्षमा करायला तयार असते ह्यावरून आदिमाता ही खरोखरीच किती क्षमाक्षील आहे, तिचे क्षमा हे नावच किती यथार्थ आहे हेच दिसून येते.
  निक्सचे विचार पाहून तर खरेच हसावे का रडाव का तिच्या सुमार बुध्दीची कीव करावी हेच समजत नाही. त्या चार पुतळ्यांच्या तिला भासणार्‍या दयनीय अवस्थेवरून तिला वाटते की श्रध्दावानांनी धडा घ्यावा व दुराचार्‍यांच्या मार्गाने जावे म्हणजे त्यांचे भले होईल.
  सेमिरामिसने मनोनियंत्रित केलेली पुलिका त्यांच्या जाळ्यातून सुटून जाते आणि तिचा थांगपत्ताही लावता येत नाही व हॉरेवॉनस जो जन्मजात दुराचारी श्रध्दाहीन असतो तोपण शेवटच्या अंतिम क्षणी आदिमातेच्या स्मरणाने ह्याच श्रध्दाहीनांच्या मृत्युच्या कचाट्यातून सहीसलामत वाचतो (तुलसीपत्र दिनांक ०३.१२.२०१५) व ह्यावरून अक्कल न आलेली ही निक्स समजते की कुविद्यांची चटक लागल्यावर त्रिविक्रमाची भक्ती कोण करणार ? हॉरेवॉनसच तर मुळापासून कुविद्याधारकांच्या घोळक्यातच वाढला होता तरी एका क्षणात तो आदिमातेला शरण गेला होता

  ह्या उलट अंकाराच्या काटेकोर नियमानुसार जाहबुलॉन त्याच्या जन्मानंतर त्याच्या जन्मदात्रीलाच खाणार होता. किती नीचता अगदी ठासून ठासून भरली आहे ह्या दुराचारी, श्रध्दाहीनांमध्ये. वाचताना सुध्दा मन शहारते नुसते.
  परंतु तेच दुसर्‍या टोकाला मन भारावून जाते तो सावर्णि घराण्याचा त्याग पाहून….
  माता पुलिकाचा निं:स्सीम त्याग, हायपेरिऑन, अनंतव्रत आणि हेस्टिया ह्या सर्वांचीच त्यागवृत्ती पाहताना संत तुलसीदास विरचित सुंदरकांडातील साक्षात महाप्राण हनुमंतानी लंकेत जाऊन स्विकारलेला अपमान आणि रामप्रभूंच्या कार्यपुर्तीसाठी कोणत्याही थरावर जाऊन अपमान स्विकारण्याची तयारी ह्याचे स्मरण झाले. रावणाच्या दरबारात त्याच्या पुत्राने इंद्रजिताने हनुमंतावर ब्रम्हास्त्राचा प्रयोग करून बांधून आणले होते अर्थातच फक्त ब्रम्हास्त्राचा मान ठेवण्याच्या पवित्र उदात्त हेतूने स्वत: हनुमंतानेच त्या ब्रम्हास्त्रात स्वत:ला बांधून घेतले होते. त्यानंतर रावण जेव्हा हनुमंताच्या शेपटीला वस्त्र गुंडाळून त्यावर तेल , तूप टाकून ती जाळण्याचे फर्मान सोडतो. ह्या वेळेला हनुमंताच्या पराक्रमापुढे य:कश्चित लायकी नसलेले नगरीतले लोक, असुर, राक्षस येऊन त्याला लाथा मारतात व त्याची थट्टा मस्करी करतात. पण मारूतीने प्रभुकार्यासाठी हे सर्व आनंदाने सहन केले कारण व्यक्तिगत मानापमानाची तमा न बाळगता त्याला सदैव रामकार्याचेच भान आहे.
  रहा न नगर बसन घृत तेला | बाढी पूंछ कीन्ह कपि खेला ||
  कौतुक कह आए पुरबासी | मारहिं चरन करहिं बहु हासी || १४५ ||
  (सुंदरकांड)

  येथे अग्रलेखात आपण वाचतो दुसरा अनंतव्रताचा पुतळा हा पायांवर ओणवा बनून कुत्र्याच्या रूपात उभा होता आणि चौथा पुतळा हायपेरिऑनचा ह्याच्या तर मुकुटाला केरिडवेनच्या रूपातील निक्स चक्क लाथ मारते.
  तरीही जिवंत अवस्थेतील पुतळ्याच्या रूपातले हे चौघेजण त्रिविक्रमाच्या कार्यपूर्तीसाठी हे सारे अपमान स्विकारतात.
  निक्सच्या बोलण्याप्रमाणे दीड हजार वर्षे पुतळा बनलेल्या अवस्थेत हायपेरिऑन (चौथा पुतळा) आहे.
  कुमार्गीयांना कधीच आदिमातेचे आणि तिच्या पुत्राचे त्रिविक्रमाचे सामर्थ्य कळूच शकत नाही. निक्सला वाटते की दनुच्या शापामुळे ते पुतळे बनले आहेत आणि नंतर जळून नष्ट होणार आहेत. पण बापूंनी सांगितलेले सत्य म्हणजे माता लोपामुद्रेने आधीच ते खोटे पुतळे संदुकीत लपवून ठेवले आणि हे प्रत्यक्षात चौघे तेथे वावरत होते पुतळे बनून!
  परमपूज्य नंदाईने श्रध्दावानांना एका अधिवेशनात केलेल्या मार्गदर्शाची आठवण झाली त्यात आईने सुध्दा हेच सांगितले होते की येथे आपण सारे बापूंसाठी उपासना केंद्रावर जमतो, बापूंचे कार्य करताना बॅच मोठा की पद मोठे ह्या गोष्टी आड येताच कामा नये. जेव्हा आपण Expectations ठेवतो तेव्हा त्या मिळाल्या नाही की दु:खी होतो.अपेक्षा ह्या वाढतच जातात. Expectations हे आपण आपलेच थांबवायला लागतात. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्यांमुळे आपण आपली उपासना थांबवतो, भक्ती थांबवतो, chanting थांबवतो. वानरसैनिक म्हणून मला हे शोभणारे नाही आहे. मला स्वत:ला प्रश्न विचारता आला पाहिजे की मी बापूंसाठी काय केले, काय करते , मी बापूंच्या कार्यात काय काय केले आहे.हे प्रश्न आले ना की आपणच आपल्याला बापूंच्या कार्यात इतके झोकून देऊ की पोस्ट गेली खड्यात. बापूंचे कार्य महत्त्वाचे का पोस्ट महत्त्वाची? कार्य महत्त्वाचे ना मग पोस्ट गेली उडत. मला कार्य करत राहू दे बापूंचे , पोस्ट काय मिळत राहील नाही मिळणार. ह्यात मला अडकायचे नाही. बापूंचा शब्द , बापूंचे आज्ञापालन आणि बापूंचे कार्य ह्या तीनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जन्माला आल्यापासून मला कोणी विचारले का ?कोणी पोस्ट दिली होती का? मी काय तुम्हाला लाचलुचपत देऊन सांगितले का मी तुम्हाला हे बनवते म्हणून नाही ना का बापूंनी दिलय का दादांनी दिलय , नाही ना. जन्माला आल्यापासून आपल्याला कोणी विचारले होते का, आज मी कार्य करते म्हणून मला विचारतात , मग मला कार्य करत राहू दे. जन्मापासून मृत्यूपर्यंत मला फक्त कार्य करत राहू दे हेच माझे aim असू दे. बापूंच्या कार्याचा मला इतका ध्यास लागू दे की मग Politics, भांडणे उरतच नाही. आईने तिच्या सुमधुर आवाजातून हनुमंताला रामाचा वानरसैनिक बनण्यासाठी जे आवश्यक आहे, अपेक्षित आहे असे वाटते त्याची जाणीव करून दिली एवढेच नव्हे तर असे वाटते त्याचाच धडा तिच्या लेकरांकडून गिरवून घेतला होता जणू काही !
  पूज्य समीरदादा पण नेहमी हेच सांगतात आवर्जून की जो निर्णय़ वा विचार माझ्या बापूंच्या कार्याला पुढे नेतो तोच खरा , जो माझ्या बापूंच्या कार्याला मागे खेचतो, मागे नेतो तो विचार , तो निर्णय बरोबर असूच शकत नाही.
  आई, दादा हे सारेच जण आपल्याला आपल्या बापूंच्या कार्यासाठी आपले मान-अपमान सोडायला सांगतात आवर्जून , ह्याचाच अर्थ आम्ही कळत-नकळत कुठेतरी चुकतो हे “त्या” अनंत करूणामयी सदगुरुतत्त्वाच्या कार्याला अवरोध करणारे ठरू शकते हे जाणूनच आई , दादा कळकळीने आम्हाला न रागावता , अतिशय प्रेमाने सांगतात . मला असे वाटते की आम्ही “आता तरी ” हे शिकायलाच हवे.
  हे अग्रलेख सावर्णि घराण्याचे आचरण दाखवतात की त्यांनी त्यांच्या आचरणातून , आचार- विचारांतून त्रिविक्रमाशी , आदिमातेशी म्हणजेच रणदुर्गेशी -महादुर्गेशी क्से घट्ट नाते स्थापले होते. हे अग्रलेख म्हणूनच आमचे बापू आम्हाला दाखवत आहेत की आम्ही देखिल शिकावे त्यातून की आम्हाला आमच्या बापूंशी, आमच्या त्रिविक्रमाशी आणि आमच्या आदिमातेशी किती घट्ट आपले नाते जोडायचे , आपली नाळ कशी जोडायची आहे.
  खरेतर तसे बघायला गेले तर त्रिविक्रम हा त्या सावर्णि घराण्याला क्वचितच कधीतरी दिसत होता आणि आपले अहोभाग्य म्हणजे “तो” त्रिविक्रम आज आपल्याला सगुण साकार सावयव रुपातील सदगुरु म्हणून लाभला आहे जो सतत आपल्या सोबत असतो, आपल्याला दर्शन देतो, आपल्या सवे हसतो, गातो, नाचतो. म्हणजे आपल्यावर किती मोठी कृपा ह्या आदिमातेची आहे मग तर आपली जबाबदारी पण तेवढीच वाढते की आपल्या लाडक्या बापूंसाठी आपण आपल्या सर्व वैयक्तिक मानापमानांना तिलांजली द्यायला हवी आणि फक्त बापूंच्या कार्यासाठीच , आदिमातेच्या आनंदासाठीच झटायला हवे एकजूट होऊन, सांघिकपणे.
  समीरदादा एकदा अधिवेशनात म्हणाले होते माझ्या बापूंच्या चेहर्‍यावरचा आनंद हीच माझी इच्छा ! किती सत्य आणि यथार्थ बोल आहेत आपल्या दादांचे.
  आदिमाते आम्हाला अशीच सुबुध्दी दे जेणे करून आमच्या बापूंचे, त्रिविक्रमाचे कार्य पुढे नेण्यास आमचा अंशभर तरी हातभार लागेल , तरच हा मानवी जन्म खर्‍या अर्थाने सार्थकी लागेल असे मला तरी वाटते.

  जय जगदंब जय दुर्गे !

  हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ
  सुनीतावीरा करंडे

  #552835

  Ajay Bhalkar
  Participant

  Ambadnya
  Shri chandika vijayte
  Shri trivikram sada vijayte

  #608489

  Harsh Pawar
  Participant

  धर्मयुद्ध सुरु झाले आहे आणि एक एक नीच मृत्युमुखी जात आहे .. मागे लिलिथच्या हाती मेड्यूसा मेली आणि आज ऋषि सुमेधसांनी इष्टार व झेनुच्या हाती कद्रू , क्रॉनस व मॉरॉसचा बळी अंकारोडोडस ग्रहावर चढविला .. काट्याने काटा कसा काढवा हे ऋषि सुमेधस बरोबर जाणतात ..
  एक कमालीची गोष्ट आज कळाली ..एका श्रद्धाहीन दुराचारी व्यक्तिसही मृत्यमुखी पोहोचवण्या आधी महादुर्गेचे उपासक आधी खात्री करुन घेतात की ही व्यक्ति आधी कधी चांगली होती का ? व पुढे कधी बदलणार आहे का ? कद्रूला झेनु हाती संपवण्या आधी ऋषि सुमेधसांनीही माता सोटेरियाकडून ह्या गोष्टीची खात्री करुन घेतली होती …
  दिव्य  एफ्रोडाइटच्या योजनेनुसार अंकारोडोडसवर 3 बळी गेले होते व त्या नंतर इष्टार व झेनु त्यांच्या यानामध्ये बसून ड्रैको ग्रहावर निघुन गेले .. त्यानंतर  महर्षि मेधातिथि काण्व व महर्षि प्रियमेध आंगिरस तेथे पोहोचले ..त्यांना त्या तिघांच्या शरीरांना अग्नी द्यायचा होता व त्यांची राख जमा करुन ठेवायची होती …
  ह्या दुष्ट दुराचार्यांच्या मृत शरीराला अग्नी देणे गरजेचे असते ..कारण आपण उपनिषदामध्ये वाचतो की आद्य असुर मधु-कैटभ ह्यांचा महाविष्णुने वध केल्या नंतर ही त्यांच्या शरीराचे तुकडे तसेच मासाचा गोळा बनून अंतरीक्षामध्ये फिरत राहिले व पुढे ह्याच मधु-कैटभांच्या मासामधुन नियतीच्या पोटी वृत्रासुर जन्माला आला होता …
  दैनिक प्रत्यक्षामध्ये बापूंच्या आजच्या अगरलेखामध्ये आज आणखी एक महत्वाचा मुद्दा कळला :
   अंकारोडोडसवर झेनु इष्टारला सांगत होता, ” प्रिय इष्टार! क्रॉनॉस व मॉरॉस हे पितापुत्र, तसेच ओसिरिस व हॉरस हे पितापुत्र एकरूप होऊन फक्त ५१वा ‘एन्की’ व ५१वा ‘एनलील’ ह्या रुपात प्रगट झाले व ५१व्या ‘एन्की’ची  आणि ५१व्या ‘एनलील’ची युति झाली, तर त्या शुंभ-निशुम्भांपुढे कुणाचेच काही चालणार नाही.
       त्या ‘एन्की’ व ‘एनलील’ला अर्थात शुंभ-निशुंभांना हरवू शकणारा फक्त एकच आहे – जंभासुर आणि हा जंभासुर सध्या ‘ डेव्हिडॉहाना’ रुपात बंदिस्त आहे”

  आता क्रॉनस व मॉरॉस नाही उरलेत व मग आता पुढे काय होणार ह्याची उतकंठा वाढली आहे …

  श्री राम
  – हर्ष पवार

  #612823

  Harsh Pawar
  Participant

   बापरे ! आज चक्क आद्य असुरगुरु शुक्राचार्य आदिमाता दुर्गेला आणि त्रिविक्रमला काकुळतीने हाक मारत आहे … !! ह्या दुष्ट श्रद्धाहीन दुराचार्यांना आदिमाता चण्डिका व त्रिविक्रमाचे सामर्थ्य नेहमीच ठावूक असते पण आज प्रथम शुक्राचार्य सरळ सरळ आदिमातेस व त्रिविक्रमाला मदतीला बोलावत आहेत ..कुठे गेली त्यांची स्वताःला सर्वश्रेष्ठ समजण्याची हेकेखोरी ? कुठे गेली त्यांची तामसी मिजास ?
  निक्स आणि मिनॉसने ( राजा तितान ) धूर्त योजनेचा वापर करुन मिथेच्या कन्येवर आक्रमण केला .. निक्सने तिच्या दोन्ही डोळ्यांतून निघणारी ‘ल्युसीफेरॉन’ प्रकाशकिरणे त्या कन्येभोवती फिरविण्यास सुरुवात केली व मिनॉसने त्याची अजगराची शेपटी अधिकाधिक बळकट करुन त्या शेपटीचे धारदार टोक त्या कन्येच्या हृदयाचा वेध घेण्यासाठी सज्ज केले …आपल्या लेकीवर ओढ़ावलेला हा भयानक प्रसंग पाहुन मिथेने शुक्राचार्यांना ” आता तरी धावत या ,तुम्हाला माझी शपथ आहे ” असे गारहाणे घातले व मिनॉसच्या शेपटाचे टोक मिथाच्या कन्येच्या छातीत घुसणार, एवढ्यात प्रथमशुक्राचार्य तेथे येऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या नाभीतील दोन मोती काढून निक्स आणि मिनॉसवर फेकले व बेशुद्ध होऊन जमीनीवर पडणाऱ्या त्या कन्येला आपल्या हातांनी सावरले ..निक्स आणि मिनॉस जागच्या जागी जळून ख़ाक झाले होते !

  पुढे शुक्राचार्यांच्या मुखातून निघणारे उदगार आणखी अचंबित करतात ” प्रिय ‘संजीवनी’, प्रिय कन्ये ! जागृत हो .मी तुझा पिता केवळ तुझ्यासाठीच जुने सर्व मार्ग सोडण्यास तयार आहे  ! हे आदिमाते दुर्गे ! हे त्रिविक्रमा ! पाहिजे तर माझा वध करा, पण माझ्या ह्या प्रिय कन्येला, तुमची प्रेमळ व पवित्र भक्त असणाऱ्या ह्या संजीवनीला ‘संजीवनी’ द्या ”
  आणि काय चमत्कार ! सदैव मातृहृदय विलसणारी आदिमाता शुक्राचार्यांच्या हाकेला प्रतिसाद देते ,व संजीवनी हळू हळू डोळे उघडू लागतेआणि हे पाहून शुक्राचार्यांच्या 14व्या पत्नीला अर्थात मिथेला शुक्राचार्यांविषयी अत्यंत आदर वाटू लागतो !

  महापाप्यालाही आदिमाता त्याने संकटसमयी मनापासून हाक मारताच , आदिमाता कशी वाचवते हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले !

  मेड्यूसा मेली , कद्रू गेली , क्रॉनस व मॉरॉसचा मृत्यु झाला आणि आज निक्स आणि मिनॉसही( राजा तितान ) मृत्युघाटी उतरले ! हे धर्मयुद्ध आता त्याच्या अंतिम निर्णायक स्थितीकडे झुकत आहे .. बापूंच्या या अदभूत लेखमालेत आपण मागील काही लेखांमध्ये खूप विलक्षण बदल होतांना पाहत आहोत .. हरक्यूलिस आणि दिव्या एफ्रोडाइटच्या प्रयासांमुळे मागे आपण दुष्ट दुराचारी टायफॉन ,  हॉरेवॉनस आणि हरन्नेखस ह्यांना आपण दुराचारी मार्ग सोडून श्रद्धावान होतांना पाहिले .. आज जो प्रकार घडला त्यावरून अशी अपेक्षा असुरगुरु शुक्राचार्यांकडून करणे हे कितपत योग्य ठरेल हे येणारे बापूंचे लेखच सांगतील .. शुक्राचार्य चण्डीकेच्या सेनेमध्ये सामील होतील की ” गरज सरो आणि वैद्य मारो ” च्या नियमाने ते पुन्हा महादुर्गेच्या विरोधात उभे राहतील हे लवकरच कळेल ..

  जय जगदंब , जय दुर्गे !!!
  श्री राम
  – हर्ष पवार

  #612954

  Suneeta Karande
  Participant

  हरि ॐ.
  जय जगदंब जय दुर्गे ! आदिमाता दुर्गेचा आणि त्रिविक्रमाचा (माझ्या बापूरायाचा ) सदैव विजय होतोच होतो !
  दिनांक ३१-०१-२०१६ चा अग्रलेख “तुलसीपत्र १२०७ ” वाचून खूप आनंद झाला की सरते शेवटी आपल्या आदिमातेच्या आणि त्रिविक्रमाच्या चरणी सर्व कुविद्याधारकांना स्वत:च्या अधिपत्याखाली हवे तसे कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचविणारा एवढेच नव्हे तर अंकाराशक्तीचे सामर्थ्य असलेल्या पिंडार व पॅंडोरांचींही डाळ शिजू न देणार्‍या प्रथम शुक्राचार्यांनाही आपली नांगी टाकावी लागलीच. अखेरीस का होईना ह्या कुकर्मी , दुराचारी प्रथम शुक्राचार्याने आदिमाता दुर्गेचा आणी त्रिविक्रमाचा धावा केलाच , आपल्या चौदाव्या पत्नी समन्मिताच्या प्राणांतिक हाकेला आणि तिने घातलेल्या शपथेला साद देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्या प्रेमळ व पवित्र मार्गावरून चालून भक्ती करणार्‍या “संजीवनी” नावाच्या कन्येला तिच्यावर त्यांचीच एक कन्या निक्स आणि तिचा पुत्र तितान उर्फ मिनॉसने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून वाचविण्यासाठी ! किती हा विचित्र खेळ आहे नियतीचा ! ज्या निक्सला शुक्राचार्य त्यांच्या इतर कन्यांपेक्षा सदैव झुकते माप देत होते तिच्या उपासना (अर्थातच कुमंत्राच्या आणि कुविद्येच्या )नियमिततेने करण्याच्या स्वभावाने , तिला देखिल स्वत:च्या हातांनी बळी चढवितात, शुक्राचार्य !
  खरे तर ह्याच शुक्राचार्यांना संजीवनी विद्या अवगत होतीच आणि तिचा ते दुरुपयोग करून दुराचारी समूहाला , कुविद्येलाच बळ पुरवित होते
  संत तुलसीदास विरचिते सुंदरकांडात आपण वाचतो की सहस्त्रबाहूशी झालेल्या युध्दात वानरराज वालीचे हात तुटलेले असतात आणि हेच शुक्राचार्य ते हात संजीवनी विद्या वापरून जोडून देतात आणि प्रभू श्रीरामांची भेट झाल्यावर जेव्हा सुग्रीवाचे व वालीचे युध्द होते तेव्हा वालीला युध्द संपल्यावर शस्त्र न उचलण्याची अट घालून पाठवतात, कारण त्यांचा भ्रम असतो की युध्द वालीच जिंकणार आणि नंतर शस्त्र ठेवलेल्या वालीवर श्रीराम वार करू शकणार नाही. म्हणजेच शुक्राचार्य कायम संजीवनी विद्येचा वापर परमात्म्याला विरोध करण्यासाठीच करीत असावे असे वाटते. पण अशुभाची ताकद ही क्षीण होतेच कधी ना कधी.
  बापूंनी आपल्याला तुलसीपत्र १०१६ मध्ये सांगितले होते की शुक्राचार्यांना ब्रम्हर्षि अगस्तींनी शाप दिल्याने त्यांची संजीवनी विद्या वापरता येत नव्हती. स्वत:च्या सामर्थ्याचा अनुचित प्रकारे वापर केल्यावर किती दारूण अवस्था होते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
  तुलसीपत्र १००९ मध्ये साक्षात पार्वती माता ब्रम्हर्षी कश्यपांना हा इतिहास सांगत असतानाचे बापूंचे बोल आठवले की पार्वती माता म्हणते शुक्राचार्य काही महादुर्गेला अर्थात मॉनडॉरगीला मानवी सम्राज्ञी मानत नव्हते. ते देखिल तिच्या विरोधातच होते. परंतु शुक्राचार्यांनी तिच्या अमर्याद ताकदीची चव अनेकवार चाखलेली होती. आणि म्हणूनच कदाचित आपल्या “संजीवनी” कन्येला वाचविण्यासाठी शुक्राचार्य स्वत:चा वध करा , पाहिजे तर अशी कळवळ्याची साद घालतात, व संजीवनीलाही केवळ तिच्यासाठी स्वत:चे सर्व जुने मार्ग सोडण्यास तयार असल्याचे कबूल करतात.
  मला वाटते की कदाचित त्रिकालज्ञानी, त्रिकालदर्शी आदिमाता आणि तिचा पुत्र त्रिविक्रम हे जाणत असल्यामुळेच शुक्राचार्यांसाठी क्षमेचा मार्ग खुला ठेवतात सदैव !
  मागील तुलसीपत्रात (तुलसीपत्र क्रमांक आठवत नाही ) बापूंनी लिहिले होते की आदिमातेने आणि त्रिविक्रमाने शुक्राचार्यांनी शरणागती स्विकारली तर त्यांना क्षमा करण्याचा मार्ग मोकळा ठेवला होताच आधीपासूनच त्यांच्या अकारण कारूण्याने. तेव्हा जराही कुठेही पुसटशी कल्पना देखिल येत नव्हती की हा अंहकाराने उन्मत्त झालेला शुक्राचार्य कधी तरी आदिमातेला आणि त्रिविक्रमासमोर नाक रगडत येईल म्हणून ! खरेच आदिमातेचे “क्षमा ” हे नाव किती किती किती महान आणि व्यापक प्रंमाणावर कार्यरत आहे त्याची ही साक्षच म्हणायला हवी.
  पण ह्या शुक्राचार्यांचा काही भरवसा वाटत नाही, लॉबिरिन्थमध्ये स्वत:ला अडकवून त्यांनी असेच सर्वांना गाफिल ठेवले होते, पण येथे गाठ आदिमातेशी आणि तिच्या पुत्राशी त्रिविक्रमाशी असल्याने कदाचित शुक्राचार्य कपट नीतीचा अवलंब करायला धजावणार नाहीत असाही आशावाद निर्माण झाला आहे खरा. पण ह्या दुराचार्‍यांचा विश्वास ठेवणे घातकच वाटते , न जाणो शुक्राचार्यांनी गरज संपताच पुन्हा आपल्या मूळ स्वभावाला कवटाळले !
  ह्या तुलसीपत्रात महामाता सोटेरियाची दूरदृष्टी किती जबरद्स्त ताकदीची आहे ह्याचा प्रत्यय येतो. पिंडार जेव्हा स्थेवोने सांगितलेल्या गोष्टींची सत्यता पडताळण्यासाठी त्याच्या कक्षात जातो आणी स्काली यंत्रावर तपासणी करतो तेव्हा ते सत्य असल्याचा संदेश मिळतो कारण ते स्काली यंत्र वसुंधरेवरील स्कालीस्थानाशी आधीच महामाता सोटेरियाने जोडून घेतले होते आणि त्याचा ताबा मीनाक्षी, बिजॉयमलाना आणि आयरिसकडेच होता.
  प्रत्यक्षात कद्रूचा बळी देताना मंत्र म्हणणारे सेरापिस अनुबीस (महर्षी सुमेधस म्हणजेच सम्राट युरॅनस ) होते जे कोणालाच दिसू शकत नाही ना निक्सला ना सॅथाडॉरिना ऊर्फ सर्कीला. झेनु आणि इष्टार तर तेथेच हजर असून देखिल ते मंत्र संध्या भाषेतले असल्याने त्यांनाही ते कळलेच नव्हते, जरी कद्रू प्राणांच्या आकांताने झेनुला समजावण्याचा प्रयास करत होती. कद्रूने ज्या कुविद्येच्या वापराने सम्राट युरॅनसच्या पित्याची निर्घृण हत्या केली होती त्याचा बदला घेण्यात सम्राट यशस्वी झाले होते. ( तुलसीपत्र १२०६)
  एकीकडे खुद्द Afrodite ज्या मेड्युसाबद्दल साशंक होती ती मेड्यूसा मेली , कद्रू मारली गेली , क्रॉनस व मॉरॉसचा (चक्क एन्की आणि एनलीलचा ) मृत्यु झाला – एकामागून एक जबरदस्त ताकदीचे प्रतिपक्षाचे मातब्बर नामशेष होत आहेत तर दुसरीकडे टायफॉन , हॉरेवॉनस , हरेन्नाखस , आणि आता शुक्राचार्य एकामागून एक बलाढ्य लढवय्ये शरणागतीचा मार्ग स्विकारत आहेत, त्यामुळे खरेच आता पुढे काय ह्याची उत्सुकता अजूनच शिगेला पोहचत आहे.

  जय जगदंब जय दुर्गे !
  आदिमातेचा आणी तिच्या पुत्राचा त्रिविक्रमाचा सदैव जयजयकार असो !

  मी अंबज्ञ आहे.
  आम्ही अंबज्ञ आहोत.

  हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ
  सुनीतावीरा करंडे

  #613360

  Shrinivas Gadkari
  Participant

  Hari Om,

  Agralekh of Sunday 31 Jan, will give a very different turn
  to the Annunaki history narrative. For quite some time
  people may have noted that in spite of being one of the
  sutradhara of many of the asuric activities, dear Bapu
  has always used respectful language whenever there was
  a mention of Shukracharya.

  Did Shukracharya finally transformed into a sadachari?
  Let us wait to read what really happened.

  On a related topic – in Gita 10.37, Shri Krishna says
  that among kavi-s I am ushana. Most of the commentators
  of Gita interpret ushana to mean Shukracharya. This has
  been a riddle to me: Why does Gita talk so highly of
  Shukracharya?

  May be Shukracharya did tranform into a noble person and was
  then known by the name ushana.

  Let us wait to hear the complete story.

  Regards,
  Shrinivas Gadkari

Viewing 15 posts - 181 through 195 (of 196 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.