Nectar Nevus and Eagle (अमृतनाभि स्तंभ आणि गरुड)

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Nectar Nevus and Eagle (अमृतनाभि स्तंभ आणि गरुड)

This topic contains 5 replies, has 6 voices, and was last updated by  Suneeta Karande 3 years ago.

Viewing 6 posts - 1 through 6 (of 6 total)
 • Author
  Posts
 • #82903

  Yogindra Joshi
  Participant

  Nector Nevus and Eagle (अमृतनाभि स्तंभ आणि गरुड)

  ll हरि: ॐ ll

  २७-१२-२०१४

  रविवार दिनांक ०४ जानेवारी २०१५ रोजीच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित झालेल्या बापुंच्या अग्रलेखात वसुन्धरेच्या अमृतनाभिचा (Nector Nevus) उल्लेख वाचनात आला. पूर्णपणे स्फटिकाचा असलेला, बाहेरून सोनेरी शेवाळाचे आवरण असलेला, तळ्यातून बाहेर आलेला असा हा दिव्य स्तंभ!
  सम्राज्ञी माता अल्केमिनीला(Alcmene) तो दिसला. तिने लेटोबरोबर (Leto) माता थियाने(Theya) सांगितलेला मन्त्र म्हणण्यास सुरुवात केली आणि माता थियाकडील गरुड(Eagle) मादीचेच खास अपत्य असणारा लेटोच्या खांद्यावरील गरुड उडून त्या स्तंभावर जाऊन बसला.
  दोघींनी महादुर्गेचा जयजयकार केला. ‘तो पवित्र गरुड फक्त एकदाच उडणार होता आणि फक्त या अमृतनाभि स्तंभावरच बसणार होता’, असे सम्राज्ञी माता अल्केमिनी म्हणते.
  दोघी त्या अमृतनाभि स्तंभाला वन्दन करतात आणि त्या दोघी गरुडाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात व त्या क्षणाला तो गरुड उंच उडतो. कुठे जातो? भारतवर्षात असणार्‍या आद्य अमृतनाभि दिव्य स्तंभाकडे? की आणखी कुठे? प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे.
  हे वाचत असताना महाविष्णुचे वाहन बनलेल्या गरुडाची कथा आठवली. तो गरुड आपल्या आई विनिताला तिच्या कद्रु (सरपटणार्‍या योनितील प्राण्यांची कद्रु ही जननी आहे) या सवतीच्या ताब्यातून सोडवण्यासाठी पराक्रमाने अमृत आणतो, अशी ती कथा आहे.
  त्या कथेत आपण वाचतो की कद्रु अत्यंत कपटीपणे आपल्या सवतीला म्हणजेच विनिताला स्वत:ची गुलाम बनवते आणि यातून विनिताला मुक्त करण्यासाठी अमृत आणून देण्याची अट गरुडास घालते. मातृभक्त गरुड पुरुषार्थाने हे अद्‍भुत कार्य करतो. पण तरीही त्यामुळे कद्रुपुत्रांना(Longmu) अमृत मिळत नाही. इन्द्र तो अमृतकलश पुन्हा घेऊन जातो आणि कद्रुच्या सरपटणार्‍या मुलांना अमृत मिळू देत नाही. अशा प्रकारचा तो कथाभाग या निमित्ताने आठवला.
  बापुंची ही अग्रलेखमालिका अशा प्रकारे वेगवेगळ्या दिशांनी विचार करायला शिकवते, काही स्मरणाच्या कोशातील संदर्भ आठवून देते आणि अग्रलेखांमध्ये घडणार्‍या कथांचा सखोल विचार करण्याचे वळण लावते. त्याबद्दल आम्ही बापुंना नक्कीच अंबज्ञ म्हणायला हवे.

  ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll

  #83670

  Amit Prasade
  Participant

  कद्रू (Kadru)ज्या व्यक्तीला चाटते त्याच्या वर कोणतेच शास्त्र चालत नाही. फक्त पवित्र(sacred fire) आग्नीच त्यांना जाळू शकतो.
  ६ जाने २०१५ अग्रलेखामधे fountain of Mother चे वर्णन केले आहे. त्या मध्ये विश्वाजननीने त्या करंज्या खाली गुप्त अग्नी ठेवला आहे.
  मला असे वाटते की हाच पवित्र अग्नी असावा. ह्याच्या जालानेच सर्व दुष्टांचा नाश होणार.
  म्हणूनच अनंतव्रत धामिरला(Dhamir) मिठी मारून म्हणतात ज्या अर्थी हे कारंजे अजून सुरक्षीत आहे त्याअर्थी आता विजय आपलाच आहे.

  #83714

  Sailee Paralkar
  Participant

  ​खर आहे अमितसिंह, हे दिव्य कारंजे म्हणजे मला तर वाटते कि हेच ते त्रिविक्रम जल असेल(Trivikram), कारण त्या कारंजाचे संरक्षण एक भला दांडगा सिंह करत आहे. म्हणजे हाच तो देवीसिंह असणार कारण त्याला कुठलेही विष किवा शस्त्र हानी करूच शकत नाही. आणि त्या महादुर्गेची लीला कशी आहे, तो मोलोच(Moloch) ह्या दिव्य कारंज्याचा खूप शोध घेत होता, पण त्याला कधीच यश आले नाही आणि धामिरला त्याचा बरोबर शोध लागला म्हणजेच काय कोणाकडे कितीही ज्ञान असेल किवा कितीही हुशार शास्त्रज्ञ असले तरी तिच्या इच्छेशिवाय कोणालाच यश मिळू शकत नाही.

  #83760

  Sailee Paralkar
  Keymaster

  हरि ॐ
  योगिंद्रसिंह, अमितसिंह आणि साईलीवीरा यांनी अमृतनाभि स्तंभावर खूप सुंदर विचार मांडले आहेत. याठिकाणी अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते, ती म्हणजे धामिर सम्राट झियसला सांगतो कि, “पहिल्या कारंज्यातील (fountain of god)पाण्याचे काही थेंब फक्त माझ्याच तोंडात पडले व ते खरोखरच मधुर होते, तर सैतानी कारंज्यातील(fountain of devil) पाणी मी बरोबर नेलेल्या जिवंत माशांवर पडताच ते तत्काळ मृत झाले.”
  म्हणजेच पवित्र मनाच्या व महादुर्गेची (Mahadurga)भक्ती करणार्‍या धामिरला पवित्र जल आपोआप मिळाले, ते फक्त त्याच्याच तोंडात पडले, हे त्या महादुर्गेचे अकारण प्रेमच नाही काय! आणि सैतानाच्या कारंज्यातील पाण्याचे थेंब केवळ माशांवर पडून ते लगेच मरण पावले पण धामिर पूर्णपणे सुरक्षितरित्या तेथून परत आला. हे महादुर्गेचे धामिरला म्हणजेच प्रत्येक श्रध्दावानाला असलेले कवच म्हणायला हवे. नाही का? म्हणजेच ती महादुर्गा आणि तिचा पुत्र सदैव पवित्र्याच्या आणि श्रध्दावानांच्या संरक्षणासाठी तत्पर असतात, याचाच पुन्हा एकदा प्रत्यय येतो.

  #493830

  Shrinivas Gadkari
  Participant

  Greetings,

  In today’s agralekh, Tulsi-Patra number 1173, we again have reference
  to the Nectar Nevus (amruta naabhi). This pillar will now be recharged
  with Prana by Sorathus and Aries using the Orgone vidya. Dear Bapu
  has referred to Orgone vidya as Swastika vidya. And we all know that
  Svastika Vidya is another name for Shri Shvaasam. So we are learning
  about another dimension of the glory of Shri Shvaasam.

  Happy Diwali to all the readers of this Blog. Hari om.

  Best regards,
  Shrinivas Gadkari

  #495927

  Suneeta Karande
  Participant

  हरि ॐ.
  दिनांक १०-११-२०१५ चा अग्रलेख – तुलसीपत्र ११७३ वाचताना उल्लेख आला की पार्नासस पर्वतरांगामध्ये अनेक गुंफा लेटोनेच तयार करवून घेतल्या आहेत व त्या गुंफांमध्ये माता अल्केमिनीचे भारतवर्षातून आलेले सैन्य त्यांच्या कुटूंबीयांसह राहत आहे व राजा इथर त्याचा प्रमुख आहे. त्यामुळे
  वसुंधरेची अमृतनाभी (Nectar Nevus) असणार्‍या त्या दिव्य स्तंभाच्या (The Divine Pillar) भोवती त्या तळ्यामध्येच लेटोने जे छोटेसे बेट तयार करवून घेतले होते त्यावर राहून सुरथ (सॉरेथस) व आर्यमा (एरिस) ह्या दोघांना त्यांनी भारतवर्षात राहून शिकून आलेल्या स्वस्तिकविद्येनुसार ऑरगॉनचा संचय करायचा होता एका सुयोजित वेळेपर्यंत. आणि त्यासाठी ती जागा पूर्णपणे सुरक्षित असणे अत्यंत जरूरीचे होते. राजा इथरच्या आज्ञेनुसार एकही सैनिक किंवा इतर मनुष्य त्या तळ्याच्या आसपास येणार नाही ह्याची ही दक्षता बाळगली गेली होती. राजा इथर तेथील एका सर्वोच्च सुळक्यावर दुर्बिणीतून त्या दोघांवर सतत लक्ष ठेवून होता.

  ह्या आधी दिनांक ४ जानेवारी २०१५ च्या तुलसीपत्र १०६१ मध्ये बापूंनी लिहिले होते की अमृततनाभी शोधण्याबरोबरच त्या दोघींना ( माता अल्केमिनी व लेटो ) तेथील गुहांमध्ये अनेक माणसांना गुप्तपणे राहता येईल अशी रचनाही करायची होती. त्याचे कारण फक्त अल्केमिनीलाच माहित होते व लेटोने कधी तिला विचारले नव्हते. त्या गुप्त योजनेमागचे कारण आज १० नोव्हेंबरच्या अग्रलेखातून कळले. परंतु येथे मला लेटोचे खरेच कौतुक वाटते की किती दृढ विश्वास होता तिचा अल्केमिनीवर की तिला कधी आपण जे काही करतो आहोत त्यामागचे कारण जाणून घेण्याचीही इच्छा झाली नाही.
  तसेच सुरथ आणि आर्यमाच्या बाबतीत आढळते माता अल्केमिनी त्यांना त्यांचे ऑरगॉनचा संचय करण्याचे कार्य़ पूर्ण होण्याची खूण सांगते की येथून माझ्या खांद्यावरूनच उडालेला तो पवित्र गरूड येथे येऊन ह्या स्तंभावर बसेल ही खूण समजावी आणि त्या गरूडापाठोपाठच पुढील सर्व व्यवस्था तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची माहिती सध्या देणे शक्य नाही. ह्या सर्वांच्याच कार्यात काही गुप्तता पाळल्या जात होत्या ज्या कार्याच्या पूर्णतेच्या व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होत्या पण कधीच कोणीही का, कसे , कशासाठी हे प्रश्न कधीच विचारत नाही. ह्यालाच म्हणतात ” एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ” माता अल्केमिनीचे स्थान ह्या सर्वांनाच अत्यंत आदराचे , मानाचे होते, हे निर्विवाद सत्य आहेच ह्या मागे दडलेले.
  येथे बापूराया तुम्हीच आठवून दिले ते मातृवात्सल्यविन्दानम् ग्रंथात तुम्ही लिहिलेले प्रभु परशुरामाचे आचरित !
  सरतेशेवटी प्रभु श्रीरामचंद्राच्या अवताराचे माधुर्य हृदयात घेऊन ते जगत्वंद्य , पुरुषोत्तम परशुराम श्रीरामांस आशीर्वाद देऊन परत तपश्र्चर्येसाठी निघाले.
  आता परशुरामाच्या मनात एक प्रश्न उठू लागला ,” परमेश्वराने त्याच्या कार्याच्या ज्या प्रथम खंडासाठी मला पाठविले होते, तो खंड तर समाप्त झालेला आहे व त्या कार्याचा द्वितीय खंड हा क्षत्रियश्रेष्ठ रूपातील श्रीरामचंद्र पूर्ण करणार आहे. मग ’चिरंजीव अवतार’ म्हणून पाठविलेल्या ह्या परशुरामाचे पुढील कार्य काय?”
  प्रभु श्रीपरशुरामांना पूर्ण स्मरण होते की परमेश्र्वराने अर्थात आपल्या परमपित्याने आपणास पाठवितानाच ’श्रीरामभेटीनंतरच्या तुझ्या जीवनाच्या उत्तरार्धातील तुझ्या कार्याची जाणीव तुला तेव्हाच होईल ’ असे सांगितले होते.
  ती आठवण मनात घेऊन व चिंतन करीत प्रभु श्रीपरशुरामांनी तपश्र्चर्येस आरंभ केला.
  ह्या सर्वांचेच “का” संपले होते कारण मला वाटते त्यांनी त्यांच्या गुरुंच्या चरणी अतूट विश्वास ठेवला होता .

  बापू ३०.०१.२०१४ च्या प्रवचनात म्हणाले होते की आमचा विश्वास कमी पडतो का? कारण आमचा स्वत:वर विश्वास नसतो. ह्यालाच आपण थर्व – गोंधळ (confusion) म्हणतो. हे करायचं की ते करायचं हीच गोंधळाची परिस्थिती असते. अथर्वशीर्ष मस्तकातला गोंधळ (confusion) दूर करतं. अथर्वचा दुसरा अर्थ आहे पूर्ण माहिती, ज्ञान. (complete / detailed knowledge)
  आमचा परमात्म्यावरचा विश्वास डळमळीत का होतो? राम आला तेव्हा फक्त वानरांनीच त्याला पुजलं, कृष्णाला पाच पांडव आणि गोपांशिवाय कोणीही देव मानलं नाही, साईबाबा जिवंत होते तेव्हा आता जेवढी गर्दी होते त्याच्या एक शतांश लोकही त्या काळात नव्हते. कारण त्यांच्याकडे बघताना तो देव आहे हे कोणाला कळलंच नाही. आम्ही त्याच्यात देव बघत असतो. आम्हाला त्याला आधी बेस्ट मानव मानलं पाहिजे. त्याच मानवत्व पटलं पाहिजे, तरच त्याला देव मानता येईल. ज्यांना हे कळलं ते खूपच भाग्यवान होते. कैकयी, मंथरा, कौरव, यादव – यादव तर प्रत्यक्ष कृष्णाच्या राज्यात राहत होते. पण काय झालं? Physical presence does not matter. आम्ही त्याच्या जवळ physically आहोत ह्यामुळे तो खूश होणार नाही. आमचे प्रेम किती आहे, विश्वास किती आहे हे महत्वाचे आहे. चण्डिकाकुलाचं नातं प्रेम आणि विश्वास ह्यावरच असतं. प्रेम आणि विश्वास आहे का? हे महत्वाचं आहे. आमचं प्रेम, विश्वास कमी पडत असेल no problem पण माझं aim १०८% प्रेम आणि विश्वास वाढवणं हेच हवं. त्याच्यावर पूर्ण प्रेम आणि विश्वास करता आलाच पाहिजे. आपल्याला आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहेच, त्याच्याबरोबर मला त्याची प्रत्येक चांगली गोष्ट घ्यायची आहे, अनुभवायची आहे. आमच्यातले कमी points आपल्याला down करतात, तसंच आम्ही देवामध्ये कमीपणा शोधतो तेसुद्धा तेच करतं.
  बापू तुम्ही म्हणाला होता की आदिमातेने पहिली सीट घेतली की तुम्ही -१८ असाल आणि तुमची श्रद्धा असेल तरी उत्तर १०८ च असते. तिच्या कारुण्यामुळे तिचा जेष्ठ पुत्र महाप्राण तुमचं जीवन चालवत असतो. तिचा तृतीय पुत्र परमात्मा, तुम्ही खरंखुरं प्रेम करता, तेव्हा तुमचा नंबर तो स्वत: ठरवतो कारण तो तुमच्यातच राहत असतो. आम्हाला जीवनात कळलं पाहिजे, गरज + मी = दुर्बलता, दुर्बळ + मी = फालतू, फालतू + मी = अपयशी, अपयशी + मी = नैराश्य, नैराश्य + मी = पूर्ण वाया, व्यर्थ गेलेला.

  त्याच्यावरचा विश्वास असणारा, चण्डिकाकुलावरचा विश्वास असणारा मी म्हणजे विश्वासू मी + माझी गरज = सामर्थ्य. गरज माणसाला असतेच. माझा त्याच्यावर विश्वास असला, चण्डिकाकुलावर विश्वास असला की मग आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ह्या अल्गोरिदममधून पुढे जात राहते. विश्वासू मी + माझी गरज = सामर्थ्य, सामर्थ्य + विश्वासू मी = गरजपूर्ती. विश्वासू मनुष्याची गरज त्याला समर्थ बनवते. विश्वास नसणार्या मनुष्याची गरज त्याला दुर्बळ बनवते. हा अल्गोरिदम तुम्हाला समर्थ करणारा आहे. म्हणून ह्याचं नाव काय आहे? विश्वासू मी + गरज = सामर्थ्य आणि सामर्थ्य कसं तर सतत वाढत जाणारं. म्हणून ह्याला ‘अनिरुद्ध गती’ अल्गोरिदम म्हणतात. हा अनिरुद्ध अग्लोरिदम आहे. हा आयुष्यात आल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. मी + गरज = दुर्बलता हा अल्गोरिदम वृत्रासुराचा आहे. वृत्रासुराला परमात्मा बनण्याची इच्छा आहे. तिच्या पुत्राला काही बनण्याची इच्छा नाही. तुम्हाला वृत्रासुराचा अल्गोरिदम हवा की अनिरुद्धाचा अल्गोरिदम हवा ह्याचा तुम्हाला choice आहे.
  बापू आज ह्या तुलसीपत्रांच्या अग्रलेखातून तुमचे बोल अजून स्प्ष्टपणे उलगडू लागले आहेत तुमच्याच कृपेने. मला माझ्यातला “का” संपवायचा असेल तर मला आधी ‘अनिरुद्ध गती’ अल्गोरिदम स्विकारायलाच हवा आणि बापू तुमच्या कृपेने तो जीवनात येणारच आहे. ह्याच विश्वासाची अत्यंत गरज होती जो कदाचित नव्हताच आणि Physical presence does not matter हीच गोष्ट तुला शिकवायची होती. निदान ” आता तरी ” हा ‘अनिरुद्ध गती’ अल्गोरिदमच तू दिलेल्या जीवनात कार्यरत व्हावा आणि “एक विश्वास असावा कर्ता हर्ता बापू ऐसा” ह्याचीच परिपूर्तता तुझ्या चरणी होवो हीच प्रार्थना ! मला आता माझा choiceच नको, फक्त “तू आणि एकमेव तूच” माझा choice होवो !

  जय जगदंब जय दुर्गे

  हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ.
  सुनीतावीरा करंडे

Viewing 6 posts - 1 through 6 (of 6 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.