Hercules हर्क्युलिस: भक्ती – शक्ती – युक्तीचा त्रिवेणी संगम

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Hercules हर्क्युलिस: भक्ती – शक्ती – युक्तीचा त्रिवेणी संगम

This topic contains 12 replies, has 10 voices, and was last updated by  Sangita Vartak 3 years, 7 months ago.

Viewing 13 posts - 1 through 13 (of 13 total)
 • Author
  Posts
 • #73725

  Yogindra Joshi
  Participant

  ll हरि: ॐ ll

  गुरुवार दिनांक २३ डिसेंबर २०१४ रोजीच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’(Pratyaksha) मध्ये प्रकाशित झालेल्या बापुंच्या अग्रलेखात हर्क्युलिसने(Hercules)  मोठा साहसाने एक महत्त्वपूर्ण शोध घेतलेला आपण वाचतो आणि त्यामुळेच झियस(Zeus) पक्षाला हे कळू शकले ही इष्टारमाता (Ishtar) कद्रु (Kadru) क्रॉनॉसच्या (Kronos)घरात जमिनीखाली राहत आहे. पुढे होणार्‍या युद्धाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.

  त्याचबरोबर हर्क्युलिसने (Hercules) इष्टारचे कपटसुद्धा प्रचंड बुद्धिमत्तेने झियस आणि डेमेटरला (Zeus and Demeter) दाखवून दिले. तो म्हणतो- ड्रॅकोसम्राट(Draco) इष्टारने अ‍ॅफ्रोडाईटला (Aphrodite)वसुंधरेवरून खूप दूरवर नेण्यासाठीच वैश्‍विक प्रवेशद्वारावर हल्ला केला असावा आणि त्यामुळेच अ‍ॅफ्रोडाईट इथून निघताक्षणीच त्या कद्रूने(Kadru) वसुन्धरेवर प्रवेश केला असावा.
  कद्रूचा पत्ता कुठल्याही यन्त्राला, अगदी महामस्तिष्कालाही लागू शकत नाही, हेदेखील आपण हर्क्युलिसच्या तोंडून ऐकतो.
  त्याचबरोबर हर्क्युलिस एक गौप्यस्फोट करतो की ड्रॅको ग्रहावर वावरत असतानाच त्याला आणखी एक शोध लागला होता. ड्रॅकोंच्या प्रत्येक उपासनागृहाच्या भिंतींवर अ‍ॅफ्रोडाईटचे एकतर शिरकाण केलेले चित्र तरी असते किंवा तिला पाळीव प्राणी केल्याचे तरी चित्र असते. आणि ड्रॅकोंकडून गुप्तपणे हे रहस्य जपले गेले आहे.
  ड्रॅकोसम्राट असणार्‍या इष्टारची भगिनी ‘इष्टारकुमारी’ हिला हर्क्युलिसने स्वत:च्या प्रेमात पाडून हे रहस्य जाणून घेतले होते. त्याचबरोबर तो हेदेखील सांगतो की ‘कद्रूची व म्हणून सर्व ड्रॅकोंची प्रमुख शत्रू मॉनाडॉरेगी अर्थात महादुर्गाच आहे व ह्यांचे सर्वोच्च ध्येय ‘अ‍ॅफ्रोडाईटला वशीकरणाने आणि दबावतंत्राने स्वतःची दासी बनविणे’ हेच आहे.
  ह्या कद्रूकडे सर्व कुविद्या आहेत व हिचेच पूजन ड्रॅको ग्रहावर सर्वत्र होत असते. हिच्या जिभेचा स्पर्श झालेली व्यक्ती फक्त पवित्र अग्नीच्या ज्वाळांनीच मृत होऊ शकते.’ हे रहस्यसुद्धा हर्क्युलिसच सांगतो.
  हर्क्युलिसकडून हे सर्व ऐकताच झियस त्याला म्हणतो, ‘‘हर्क्युलिस, तू खरेच नेहमीच पावित्र्याचा रक्षक राहिला आहेस. तू माझा कनिष्ठ बंधू असूनसुद्धा मी तुला आज खरेच प्रेमाने अभिवादन करतो.’’
  ‘सॅथाडॉरिना की कद्रू’ हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार करण्यासारखा मुद्दा हर्क्युलिसच मांडतो. हर्क्युलिसच्या मुखातील हे शब्द ऐकताच डेमेटरलासुद्धा त्याचे कौतुक वाटते. हर्क्युलिसकडून मिळालेल्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळेच झियस-डेमेटर वेळीच योजना बदलतात. जर हर्क्युलिसने आणलेली ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांना वेळेवर मिळाली नसती तर पुढे त्यांचे खूप मोठे नुकसान झाले असते, असे वाटते.
  एकंदरीत हर्क्युलिसचे हिमालयासारखे उत्तुंग पुरुषार्थी व्यक्तिमत्व त्याच्या भगीरथ प्रयासांतून डोळ्यांसमोर उभे राहते. स्वत:चा जीव धोक्यात घालून पावित्र्याच्या रक्षणासाठी लढणारा हर्क्युलिस एक जबरदस्त योद्धा आहे, भक्ती-शक्ती-युक्तीचा त्रिवेणी संगम त्याच्या व्यक्तिमत्वात आहे.
  अर्थात् तरीही एक प्रश्न अजूनही उलगडलेला नाही, त्याचे रहस्य अजूनही गुलदस्त्यातच आहे, तो प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे आणि तो प्रश्न आहे- असा हा हर्क्युलिस जिच्यावर प्रेम करतो ती कोण?

  ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll

  #74788

  Sailee Paralkar
  Participant

  अगदी खरे आहे योगींद्रसिंह, हा हर्क्युलिस(Hercules) एक जबरदस्त योद्धा(warrior) आहे खर तर त्याच्या व्यक्तिमत्वात भक्ती-शक्ती-युक्तीचा त्रिवेणी संगम आहे म्हणूनच तो जबरदस्त योद्धा / वानरसैनिक आहे. परमपूज्य बापू आपल्याला नेहमी सांगतात की खरा भक्त हा कधीच भित्रा नसतो त्याप्रमाणे हर्क्युलिससुद्धा अगदी बिनधास्त पणे गुप्तरित्या त्यांचा शोध घेण्याकरिता वेश बदलून त्यांच्यात वावरत असतो, एवढेच नव्हे तर तो जी कद्रू बद्दल माहिती झियसला(Zeus) सांगतो ती ७० वर्षांपूर्वीची त्याला आठवत असते म्हणजे काय त्याची स्मरणशक्ती असेल, जबरदस्त! ह्या एकंदर मालिकेतील आत्तापर्यंतच्या हर्क्युलिसला बघता कर्तव्यनिष्ठ, सावधपणा, महादुर्गेची निश्चल भक्ती अश्या खूप काही गोष्टी आपल्याला पण खूप काही शिकवून जातात.

  #75092

  Amit Prasade
  Participant

  हरि ॐ
  हर्क्युलिसचे(Hercules) व्यक्तिमत्व अजब आहे. तो ग्रीसचा(Greece) सम्राट आहे त्याचबरोबर वाराणसीचा राजा बलदेव(Baldev) म्हणूनही राज्य करीत आहे. तसेच सर्व महत्वाच्या ठिकाणी हजर असलेलाही दिसून येतो. अपोलोला(Apollo) सहाय्य करणारा, त्याचे रक्षण करणारा हर्क्युलिसच आहे. नेफिलचे रक्षणसुध्दा हाच करतो, त्याला मानसिक आधारही देतो. बिजॉयमलानाचे साम्राज्ञी पद धोक्यात आल्याची जाणीव होताच हर्क्युलिस प्रसंगावधान राखून आयरिसच्या मदतीने पुढील धोका टाळतो. अफ्रोडॉईटच्या मदतीला पण डेमेटर (Demeter)हर्क्युलिसलाच पाठवते. ते पण cosmic doorway जो चतुर्मितीत आहे, तिथेही हर्क्युलिस पोहोचू शकतो, हेच ह्यातून दिसते. या आणि अशा अनेक घटनांमधून हर्क्युलिस perfectionist असल्याचे दिसून येते. यामुळेच हर्क्युलिसच्या व्यक्तिमत्वाने भारावून जायला होते.

  #76117

  Vaibhavsinh Karnik
  Participant

  हरिॐ. हर्क्युलिसचे(Hercules) रसायन काही वेगळेच आहे. हा अत्यंत शांत डोक्याने काम करणारा व आपल्या CAUSE शी एकनिष्ट व कायम FOCUSED असणारा योद्धा आहे. हयाचे आपल्या भावंडांवर प्रचण्ड प्रेम आहे. खरतर सम्राट झीयस(Zeus) त्याचा सावत्र भाऊ आहे तरी देखील त्याचे झीयसवर सख्या भावापेक्षाही अधिक प्रेम आहे. ह्याचे आपल्या ज्येष्ट भगिनी डेमेटर वर पण प्रचण्ड प्रेम आहे. तो तीच्याशी आपल्या आयुष्यातील काही रहस्य देखील share करतो. ह्या वरुन एकाबाजूला कर्तव्यकठोर असणारा हर्क्युलिस दुसयबाजूने अत्यंत प्रेमळ व हळवा देखील आहे. त्याचे आपल्या प्रेयसीवर देखील खूप प्रेम असल्याचे जाणवते. तीला केसांमध्ये गुलाबाची फुले माळायला आवडतात म्हणून त्याने आपल्या ग्रुहात जागोजागी गुलाबाची रोपे लावली आहेत. ह्या वरून हर्क्युलिस ROMANTIC देखील आहे हे समजते.
  दिनांक २८ डिसेंबर २०१४ रोजीच्या अग्रलेखात हर्क्युलिसची अजून दोन qualities आपल्या समोर येतात आणि त्या म्हणजे
  १. त्याने लेटोच्या घोड्याला दिलेली दोंगर दया चढण्या उतरण्याची TRAINING
  २. लेटोच्या महत्वाच्या मोहिमेसाठी लागणारे नकाशे काढून देणे.

  डॉ योगींद्रसिंह, साइलीवीरा व अमितसिंह ह्यांनी मांडलेल्या हर्क्युलिसचे गुण एकत्र विचार केल्यास हर्क्युलिसचे व्यक्तिमत्व खरच असामान्य, अद्वितीय, अदभूत विलक्षणच आहेत आणी म्हणूनच हर्क्युलिसचे व्यक्तिमत्व एका खया श्रद्धावानासाठी आदर्श आहे.

  #76982

  Mihir Nagarkar
  Keymaster

  There is one more thing worth mentioning about Hercules here. Demeter says that it is only the presence of Hercules that is needed by Aphrodite to fight and win with the Dracos at the gate of Cosmic Doorway of 4th dimension.

  Moreover all the points that are mentioned above about Hercules or Baldev (King of Greece and Varanasi) are a pointer to the fact that Hercules was an expert warrior, he had a very sharp and intelligent mind, he is true devotee of Magna Themes or Mahadurga. He has capacities of undertaking inter-stellar flights as well. He is the best intelligence officer that Zeus has. He is totally fearless. Moreover is he good at so many other tasks like drawing maps, training horses and the list goes on. Moreover he is a lover at heart.

  With these qualities it feels like Hercules just cant be a common ‘man’. It is worth questioning ourselves to find if he is an pious avatar or Godly manifestation just like Aphrodite.

  #90040

  Rightly said Mihirsinh ..even I am of the similar opinion that Hercules cannot be a common persona..just like Aphrodite. As we have read that Aphrodite herself is Trivikramachi Shakti ( Trivikram’s strength), I think even Hercules should be related to Trivikram somewhere. Also, of all the personalities mentioned in Agralekhmala, only Aphrodite and Hercules can travel in 4th Dimension.
  Also, in today’s Agralekhmala, i.e. January 13, 2015, it is mentioned that Hercules informs King Zeus about Magnetogasillo ( some kind of Magnetic Gas ) prepared by Solomon and Marduk from harmful Sunrays to stabilize some hexagonal star around Saturn. This vital information really helped Zeus for further analysis.

  Till now, Hercules has almost touched all the aspects and facets of a human kind. Day by day, I am becoming a big fan of Hercules. Every moment i read about him, about his defense and intelligence skills, his Omnipresence and much more..It seems he is indeed a superhero of his time.

  Further, I am keen to know about his lady love. In today’s Agralekhmala, i.e. January 13, 2015, Bapu has mentioned a sentence एकाएकी प्रकाशाचा एक झोत डेमेटरच्या गुप्त कक्षाच्या सज्जातून आत आला व त्या प्रकाशाला गुलाबपुष्पांचा सुगंध होता. त्या प्रकाशझोतातून Aphrodite प्रत्यक्ष सर्वांच्या समोर उभी राहिली. This sentence proves that Aphrodite like roses. However, as mentioned in some previous Agralekh it is written as तीला केसांमध्ये गुलाबाची फुले माळायला आवडतात म्हणून हर्क्युलिसने आपल्या ग्रुहात जागोजागी गुलाबाची रोपे लावली आहेत.
  According to these sentences, I could sense that Aphrodite is the one for whom Hercules has planted Rose saplings in his house. Hence, proving Aphrodite to be his only lady love…..as per my observations……

  #91003

  Sailee Paralkar
  Keymaster

  हरि ॐ

  मिहिरसिंह आणि प्रणालीवीरा तुम्हां दोघांशीही मी पूर्ण सहमत आहे. हर्क्युलिसच्या(Hercules) व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्यासमोर येत आहेत. सम्राज्ञी अल्केमिनी व लेटोच्या प्रसंगामध्येही, अल्केमिनी हर्क्युलिसने बांधून घेतलेल्या उत्कृष्ट गुप्त मार्गाचे वर्णन करते आणि त्याचबरोबर त्याचा बांधकाम क्षेत्रातील प्रचंड अभ्यास व अनुभव या गोष्टी आपल्यासमोर येतात. एकूणच हर्क्युलिसचे हे सगळे गुण पाहता तो नक्कीच सामान्य माणूस असूच शकत नाही असे वाटते. प्रत्येक वेळेस तो वेळेवर उपस्थित राहून अनेकांना वाचवतो, सावध करताना दिसतो. यावरुन असेही वाटते की अ‍ॅफ्रोडॉईट प्रमाणेच त्यालादेखील क्षणात कुठेही जाण्याचे सामार्थ्य प्राप्त असावे. १३ जानेवारीच्या अग्रलेखात देखील झियसला Magnetogasillo बाबत हर्क्युलिसने आधीच सांगितल्याचे कळते. यावरून हर्क्युलिसला प्रत्येक गोष्टीबद्दलचे ज्ञान आहे आणि वेळ येण्याच्या आधीच तो झियस व अन्य महत्वाच्या व्यक्तिंना सूचित करीत असल्याचे दिसून येते. कद्रूच्या बाबतीतही हर्क्युलिसच पहिल्यांदा झियस आणि डेमेटरला सांगताना दिसतो.

  तर डेमेटरच्या(Demeter) गुप्त कक्षात प्रकाशझोत येतो तेव्हा गुलाबपुष्पांचा सुगंध येतो आणि तिथे अ‍ॅफ्रोडॉईट(Aphrodite) प्रगट होते, त्यावरून हर्क्युलिस जिच्यावर मनापासून प्रेम करतो ती अ‍ॅफ्रोडॉईटच असावी अशी खात्री वाटत चालली आहे.

  #96602

  Hitesh Jadhav
  Participant

  HariOm

  Hercules : Apart from giving his presence at all high time, Hercules also saved Nefil from Cronos in his childhood. The role of Nefil from his childhood till he go back to Nimbura (as Nimbura-Sorethas) was very crucial for King Zeus and all ‘Vrati’. And it was possible due to timely help from Hercules at Cronos house.

  #156428

  Mihir Nagarkar
  Keymaster

  The editorial written by Dr. Aniruddha Joshi on 1st March 2014 is really a wonderful twist. It describes the fight between Devil – Jahbulon against the mighty Hercules and Emperor Zeus. In the later stages of the fight when both Hercules and Zeus together get overpowered by Jahbulon is when we witness entry of God Trivikram. Offcourse with arrival of Trivikram Jahbulon gets defeated and Hercules and Zeus get free from his fatal clutches. We also read of divine Aphrodite being witness to this fight.

  Along with this incidence what I also liked in this article are the words Hercules narrates to Aphrodite. By now we know that Hercules is madly in love with her. After the fight with Jahbulon, Hercules is badly injured. Yet Aphrodite has not even bothered to even look at him. We are unknown of the divine level but atleast face-up Aphrodite did not assist Hercules in his fight with Jahbulon. And when Aphrodite herself reminds Hercules about these facts of her Hercules says, “I only know of one thing that all my expectation are from God Trivikram and His Mother (The Divine Mother or Aadimata Chandika). And to meet all your (Aphrodite’s) expectations is my only priority and responsibility”. Further, Hercules also expresses his faith in God Trivikram and divine Aphrodite but he does it silently in his mind. “You (Aphrodite) or God Trivikram would easily heal the wounds that I have sustained. But the wound that is caused in my heart can be healed only by you and rather should be healed only by you as you are the only one who has caused it”. This is just a transferred epithet expressing love of Hercules towards Aphrodite.

  These words of Hercules teach us two very basic yet most important things.
  1) Your world is only you and your God. All the others are there only because He is there.
  2) When you love you should do it madly without expecting anything in return.
  These are the very two very basic wheels that drive the Shraddhavan world.

  #172823

  Sailee Paralkar
  Keymaster

  ॥ हरि ॐ ॥

  २६ मार्च २०१५ चा अग्रलेख….तुलसीपत्र – १०९४ म्हणजे प्रचंड वेगाने घडणार्‍या घटना वाटत होत्या. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पुढचा क्षण आणखीन काहीतरी भन्नाट वास्तव दाखवणारा असतो. अनिरुद्ध बापू (Aniruddha Bapu) आपल्या अग्रलेखांमधून समोर आणत असलेला इतिहास अनेक गोष्टींवर विचार करायला भाग पाडतो. तुलसीपत्र – १०९३ व १०९४ मध्ये हर्क्युलिसचे (Hercules) प्रचंड सामर्थ्य, शौर्य आणि या सगळ्याचा आधार असलेली त्याची त्रिविक्रम (God Trivikram) व महादुर्गेवरील (Mahadurga) निष्ठा क्षणोक्षणी दिसून येते. महामाता सोटेरिया (Matriarch Soteria) म्हणते त्याचप्रमाणे हे धाडस केवळ हर्क्युलिसच (Hercules) करू शकतो. कोणत्याही थराला जाऊन स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन हर्क्युलिस पावित्र्याच्या रक्षणासाठी प्रयास करीत असतो. नाईल नदीचा (River Nile) अभ्यास करताना फक्त साडेतीन सेकंद एकत्र येणारे १२ रंगांचे पाणी कॉम्प्युटरवर हर्क्युलिसलाच दिसले. यातूनच त्याची concentration आणि observation power दिसून येते.

  पाण्याच्या २०० फूट खाली असणार्‍या प्रचंड प्रयोगशाळेत जाऊन तेथील माहिती गोळा करणं किती कठीण काम आहे, हे अनिरुद्ध बापूंनी लिहिलेल्या वर्णनातून डोळ्यांसमोर उभं राहतं. अजगराशी हर्क्युलिसने दिलेली झुंज पण अक्षरश: थरारक वाटते…..आणि पुन्हा एकदा हर्क्युलिसला वाचविण्यासाठी त्रिविक्रम (God Trivikram) स्वत: प्रगट होतो आणि क्षणार्धात त्या अजगराचा नाश करतो.

  श्रद्धावानावरील प्रत्येक संकट त्या अजगराप्रमाणेच असतं. त्या विळख्यातून बाहेर पडणं श्रद्धावानाच्या आवाक्याबाहेरचं असतं. त्यातून आपल्याला आपला सद्गुरुच (sadguru) …बापूच सहीसलामत बाहेर काढतात आणि प्रेमाने जवळ घेऊन धीरही देत असतात. अगदी प्रत्येक वेळेस. मात्र मला त्याच्याशी झुंज देण्याचे प्रयास करावेच लागतात. माझा सद्गुरु सर्वसमर्थ आहे, मग तोच काय ते करेल, असा विचार हर्क्युलिसने केला नाही, तो त्याचे कर्तव्य करतच होता. हेच बापूंनी या प्रसंगामधून सांगितले असावे, असा विचार मनात येतो. आणि हेच वारंवार घडत असतं……महादुर्गा (Mahadurga) आणि तिचा पुत्र काहीही करू शकतात….ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.

  #177150

  Sangita Vartak
  Participant

  Hercules is favourite of Mahadurga and Trivikram

  हरि ॐ,

  परम पूज्य अनिरुद्ध बापूंनी आपल्यासाठी दिलेल्या तुलसीपत्र – १०९४ अग्रलेख वाचल्यावर मन सुन्न झाले. यात वेगाने घडणार्‍या घटना अनुभवल्या. मौशमीवीरा तूम्ही छान लिहीले आहे तुमच्या commentशी मी सहमत आहे.

  पवित्र गोष्टींसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देणारा असा हा हर्क्युलिस (Hercules) जो महादुर्गेचा(Mahadurga) आणि तिचा पुत्र त्रिविक्रम (Trivikram) यांचा लाडका व्रती होय. आपण सुरुवातीपासूनच पाहत आलो आणि २६ मार्च २०१५ च्या अग्रलेखात आणखी एक प्रसंग अनुभवला…

  सम्राट युरेनसनी हर्क्युलिसशी बोलताना सांगितले की ‘Solomon ची तुम्हाला एक चावी मिळाली आहे अशा अजून दोन चाव्या मिळाविण्याची गरज आहे’ आणि ह्या मार्गाने जाताना अतिशय सावध रहा’ तेव्हाच वाटले की हर्क्युलिस आणखी काहीतरी मोठे दिव्य करणार आहे.

  खरचं तो भयानक प्रसंग अनुभवल्यानंतर तर हे आवर्जून जाणवले की महामाता सोटेरियाने (Matriarch Soteria) ‘हे धाडस केवळ हर्क्युलिसच करू शकतो’ असे उद्‌गार का काढले होते. मानवी पातळीवर हर्क्युलिसने पूर्ण तयारी करूनच गेलाच एवढेच नाही तर त्या विषारी अजगराशी लढतानादेखील त्याचे मनोधैर्य कुठे कमी झाले नाही किंवा कुठेच त्याला अपयशी झाल्याची जाणिवही शिवली नाही. मुख्य म्हणजे इतक्या बिकट प्रसंगीही कुठेही नामस्मरण कमी झाले नव्हते की भक्ती आणि विश्वास कमी झाला नाही.

  प्रत्येक कठिण प्रसंगी हर्क्युलिसचे गुण पाहून योगिंद्रसिंह तुम्ही या शिर्षक दिले आहे ‘हर्क्युलिस: भक्ती – शक्ती – युक्तीचा त्रिवेणी संगम’ हे किती समर्पक आहे याची प्रकर्षाने जाणिव होत रहाते. त्या शिर्षकाप्रमाणेच आहे हा हर्क्युलिस (Hercules) प्रत्येक वेळी आणि प्रत्येक कामगिरीसाठी अक्षरश: झोकून देऊन यशासाठी झटणारा असा योद्धाच आहे.

  आणि उचित वेळी येउन त्या चण्डिकापुत्र त्रिविक्रमाने (Trivikram) त्याला या संकटातून सहीसलामत बाहेर काढले. चण्डिकाकुलाची (Chandika Kul) सच्ची भक्ती करणारे असेच कीतीही प्रसंग आले तरी न डगमगता पवित्रमार्गांसाठी झटत राहतात. आणि ती कनवाळू मोठी आई चंण्डिका आणि तिचा पुत्र नेहमी त्यांची रक्षा करतच असतात. ह्याची प्रचिती आपण सर्व श्रद्धावानसुद्धा (Shraddhavan) नित्य घेतच असतो…

  जय जगदंब जय दुर्गे।…

  अंबज्ञ…

  #198719

  हर्क्युलिस आणि अफ्रोडाईट (Hercules and Aphrodite) यांचा स्वतःच्या भावनांवर किती संयम आहे हे दिसून आले. त्रिविक्रमाच्या (Trivikram) अनुमतीशिवाय ह्या भावना प्रगट करणॆ ही अफ्रोडाईटला उचित नाही वाटत. अहहा!!! काय ही कर्तव्य निष्ठा. महादुर्गेने (Mahadurga) दिलेल्या कार्या पुढे कोणतीही भावना महत्त्वाची नाही. स्वतःचे असे काही उरतच नाही. त्रिविक्रमाच्या अनुमती नंतर अफ्रोडाईटने हर्क्युलसकडे भावनिक झुकते माप टाकले. यावेळी बापूंनी ज्या प्रकारे वर्णन केले ते वाचून अक्षरशः निशब्द झाले.

  एक गोष्ट मला प्रकर्षाने मांडायची आहे.

  त्रिविक्रम – अफ्रोडाईटचा बंधू (संदर्भ अग्रलेख)
  अफ्रोडाईट म्हणजेच अरुला (संदर्भ अग्रलेख)
  अरु्ला – त्रिविक्रमाची कार्यशक्ती (संदर्भ अग्रलेख)
  अरुला (Arula) – विश्वातील हिलींग पावर (श्रीश्वासम प्रवचन)
  ह्नुमंत – त्रिविक्रमाचा मोठा बंधू (संदर्भ बापूंचे प्रवचन)
  हनुमंत हि हिलिंग पावर आपल्या शरिरात पोहचवतो आणि ती सप्त चक्रांमध्ये खेळविण्याचे काम त्रिविक्रम करतो. अर्थात इथे स्पष्ट होते त्रिविक्रमाच्या आज्ञेत हिलिंग पावर (healing power)कार्यरत असते.

  मग ही हिलिंग पावर अर्थात अफ्रोडाईट ज्या हर्क्युलिसच्या प्रेमाला दुजोरा देते तो हर्क्युलिस म्हणजे नक्की कोण? उत्कंठा अधिक वाढली आहे.

  कारण “हर्क्युलिसची खरी ओळख फक्त मलाच ठाऊक आहे”. हे त्रिविक्रमाच्या उदगाराने तो नक्कीच कुणीतरी वेगळा असावा हे पूर्णपणे पटते. मला वाटते मागच्या काही अग्रलेखांमधून आणि प्रवचनातून याच्या उत्तराची हिंट बापूंनी दिली असावी.

  —————————————
  हर्क्युलिस कोण? जगविख्यात हर्क्युलसचे १२ लेबर(12 labours) खरच होते का? जर होते तर त्यामागिल सत्य काय? त्याचा संबंध श्रीश्वासमच्या प्रवचनात बापूंनी उल्लेख केलेल्या ज्या १२ गोष्टींवर उपाय होतो त्याच्याशी काही संबंध असू शकेल काय?

  ते बारा उपाय पुढील प्रमाणॆ –
  Dis-ease (म्हणजे व्यधी, सर्व प्रकारच्या व्याधी)
  Dis-comfort (म्हणजे पीडा, सर्व प्रकारच्या पीडा दूर करण्याचं सामर्थ्य ह्या गुह्यसूक्तामध्ये आहे, ह्या हीलिंग कोडमध्ये आहे.)
  Dis-couragement (म्हणजे निराशा, उत्साहभंग, साहसहीनता, ह्यांचा नाश होऊ शकतो ह्याने)
  Des-pair (म्हणजे नाउमेद होणे, किंवा भग्नाशा, आशेचा पूर्ण नाश झालेला असतो)
  Depression (म्हणजे खिन्नता, न्यूनता, मंदी, किंवा उदासपणा, औदासीन्य नाही – उदासपणा)
  Fear (म्हणजे भय)
  Weakness (म्हणजे दुर्बलता, हे केवळ शारीरिक Weakness नाही, सगळ्या प्रकारचा Weakness लक्षात ठेवा)
  Deficiency (म्हणजे कमतरता, आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये विटॅमिन Deficiency झालेली आहे, म्हणजे विटॅमिनची कमतरता आहे, ही दुरुस्त केली जाऊ शकते)
  Unrest & Trouble (म्हणजे अशांती आणि त्रास, हे दोघेही जुळे आहेत, हे एकत्रच असतात)
  Grief (म्हणजे शोक)
  Conflict (म्हणजे संघर्ष)
  Feebleness (म्हणजे कमकुवतपणा)

  आणि हर्क्युलिसचे बारा लेबर पुढील प्रमाणे –

  Slay the Nemean Lion.
  Slay the nine-headed Lernaean Hydra.
  Capture the Ceryneian Hind.
  Capture the Erymanthian Boar.
  Clean the Augean stables in a single day.
  Slay the Stymphalian Birds.
  Capture the Cretan Bull.
  Steal the Mares of Diomedes.
  Obtain the girdle of Hippolyta, Queen of the Amazons.
  Obtain the cattle of the monster Geryon.
  Steal the apples of the Hesperides.
  Capture and bring back Cerberus.

  ही अग्रलेखांची मालिका श्रीश्वासमच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे. म्हणून हा प्रश्न पडला.
  खर तर कशाचाही संबंध कशासी असेल हे केवळ बापूंनाच ठाऊक.
  जसे अफ्रोडाईट-हर्क्युलस च्या प्रेमाला गती त्रिविक्रमाने दिली तसेच खरा हर्क्युलिस हा कोण आहे हे देखिल उलघडेल आणि मग तेव्हा सार्‍या प्रश्नांची उत्तरे सापड्तील
  पुढील अग्रलेखांच्या प्रतिक्षेत……

  – रेश्मा नारखेडॆ

  #203528

  Sangita Vartak
  Participant

  हरि ॐ

  रविवार दिनांक ५ एप्रिल २०१५ रोजीच्या १०९८च्या अग्रलेखात हर्क्युलिसचा (Hercules) आणखी एक गुण – हबेशा भाषा (language Habesha) अवगत असणे. या भाषेचा उपयोग करून घेऊन तेथील हबेशा लोकांशी जवळीक साधतो. त्यांना ‘निमरॉड तळ्याची’ माहीती घेऊन त्यांच्या बरोबर जाऊन खास यानाने निमरॉड तळ्यावरील जागेत जाऊन तळ्यातील एका भागात खडकांनी तयार केलेला नकाशा, डोळ्याची खोबणी असलेली कवटीसारखी रचना या सर्वांचे ताबडतोब फोटो व त्याला कळालेली माहीतीही माता सोटेरिया आणि झियसला (Zeus) पाठविली. एवढेच नव्हे तर स्वत: तेथील पवित्र चषक काढून घेऊन त्या जागेवर चपलख बसेल असा दुसरा पाषाण लावून ठेवला त्या पाषाणावर तसेच परंतु पुर्णपणे वेगळे असे चित्र रंगविले….

  मंगळवार दि ७ एप्रिल २०१५ चा १०९९व्या तुलसीपत्रातील अग्रलेखात आणखी एक चित्तथरारक प्रसंग अनुभवला तो म्हणजे हर्क्युलिसची पिशाच्च सम्राज्ञी ‘स्थेवो अनुबीस’ (Sthevo Anubis)शी तुंबळ युद्ध.

  हर्क्युलिसला स्थेवो अनुबीसशी लढताना खूप दुखापती झाल्या. दोन्ही हातातून रक्त वाहत होते. अवघे ५ दळे राहिले असताना त्याला अ‍ॅफ्रोडाईटचे (Aphrodite) शब्द आठविले – ‘तुझे मस्तक पर्वतालाही फोडू शकते.’ आणि लगेच त्याने कुठलाही विचार न करता स्वत:च्या मस्तकाने स्थेवो अनुबीसच्या सुळ्यांवर जोरदार आघात केला. एकामागोमाग एक अशी दोन्ही सुळे मोडताच ती पिशाच्च सम्राज्ञी निर्जीव होऊन खाली कोसळते… स्वत:च्या मस्तकाने जोरात वार करताना हर्क्युलिसने स्वत:चा जराही विचार केला नाही… आपल्या मस्तकालाही इजा होईल याची जराही भिती वाटली नाही. त्यावेळी फक्त त्या पिशाच्च सम्राज्ञीस मारायचे एवढेच ध्येय्य त्याच्या समोर होते मग त्यासाठी स्वत:ला इजा झाली तरी त्याला त्याचे काही पडले नव्हते… काय भक्ती आहे आणि काय समर्पण आहे!!!….

  गुरुवार दि ९ एप्रिल २०१५ चा ११००व्या तुलसीपत्रातील अग्रलेखात – हर्क्युलिस बेशुद्ध होतोय हे पाहिल्यावर लगेचच नेहमीप्रमाणे अ‍ॅफ्रोडाईट (Aphrodite) आली आणि त्याला तिकडून बाहेर काढले. इतकेच नाही तर तिने महादुर्गेचे स्मरण करून त्याच्या सर्व जखमा भरून आणल्या… काय तो हर्क्युलिस आणि काय ती अ‍ॅफ्रोडाईट

  अंबज्ञ… हरि ॐ

Viewing 13 posts - 1 through 13 (of 13 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.