Enaka- The Shraddhavan Scientist (श्रद्धावान शास्त्रज्ञ इनाका )

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Enaka- The Shraddhavan Scientist (श्रद्धावान शास्त्रज्ञ इनाका )

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by  Sachin Rege 3 years, 9 months ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #96439

  Sachin Rege
  Participant

  Enaka – The Shraddhavan Scientist (श्रद्धावान शास्त्रज्ञ इनाका )

  भक्तमाता पार्वतीच्या मुखातून उलगडत जाणारा ह्या विश्वाचा सत्य इतिहास आपल्यापर्यंत पोहोचविणारी सदगुरु बापूंची ‘अनुनाकीय’ विषयावरील अग्रलेखमाला आता महत्त्वाच्या वळणावर पोहोचली आहे. वसुंधरा पृथ्वीवर कुठल्याही वैध-अवैध उपायांनी कब्जा करण्यासाठी चाललेला अनुनाकीयांचा अट्टाहास आणि ह्या आसुरी योजनेला अटकाव घालण्यासाठी चाललेले श्रद्धावान, महादुर्गाभक्त ‘व्रती’ घराण्याचे प्रयास ह्यांच्या डावपेचांमधून हा इतिहास सध्या वळणं घेतो आहे. सुरुवातीचे शीतयुद्ध आता प्रत्यक्ष युद्धात परिवर्तित होणार असल्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. येणारा प्रत्येक भाग आता अधिकच उत्कंठा वाढवत चालला आहे.

  ह्या इतिहासातील सर्वच पात्रं वैशिष्ट्यपूर्ण आहेतच. पण ह्या सगळ्यांमध्ये एक पात्र मनाला भिडून जातं, ते म्हणजे श्रद्धावान शास्त्रज्ञ इनाका. इनाका अव्वल दर्जाची वैज्ञानिक आहे व ती रूढ अर्थाने अनुनाकीयच आहे आणि अनुनाकीय समाज वसुंधरेवरून निंबुरावर जाण्यापूर्बी तयार झाला तोच मुळी प्रचंड वैज्ञानिक प्रगती झाल्यामुळे अहंकाराने ईश्वराचं अस्तित्व नाकारणाऱ्या शास्त्रज्ञांतून!

  पण इनाकाकडे(Enaka) अहंकार नावालाही नाही. उलट ‘अँटीकायथेरा’(Antikythera) सारख्या सर्वोच्च तंत्रज्ञानाचा शोध लावूनसुद्धा ती महादुर्गेचरणी(Mahadurga नतमस्तकच आहे.

  ….आणि नुसती पॅसिव्हली नतमस्तक नव्हे, तर ऍक्टिव्हली ती अधर्म्यांचा नाश करण्याच्या महादुर्गेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत आहे. तिच्यासाठी, ‘व्रती’ घराण्याने आरंभलेल्या अधर्म्यांच्या नाशाच्या कार्याला सर्वोच्च प्राधान्य (प्रायॉरिटी) आहे. मग त्याच्याआड तिचे नातेसंबंध आले, तरी त्यांना कापून काढायला ती मागेपुढे पाहत नाही. आपला पती अधर्मी असल्याचं लक्षात आल्यावर त्याचा वध करायलाही ती कचरत नाही. मात्र अधर्मी पतीच्या वधापेक्षाही तिच्यासाठी कठीण काम होतं, ते म्हणजे आपली बहुतेक मुलं अधर्माची साथ देत असल्याचं कळल्यावर त्यांचाही वध करण्याचा निर्णय घेणं. स्वतःच्या पोटच्या पोरांप्रतिच्या आपल्या कोमल भावना दूर सारून तिने हा कठोर निर्णय घेतला व मुलांपैकी याम्मला ठार मारून तिने तो निर्णय अमलात आणण्याची सुरुवातही केली. पण हा तिच्यासाठी सोपा निर्णय नक्कीच नव्हता, हे ती झियस व अन्य व्रतींसमोर कबूलही करते. मात्र त्याचबरोबर ती – अजून तीन (अधर्मी) मुलांच्या मरणाचं दुःख मला सोसायचं आहे, हेदेखील ठामपणे सांगते. हा कणखरपणा, कडवेपणा तिला श्रद्धेतूनच मिळालेला आहे.

  खरंच. सर्वोच्च दर्जाची शास्त्रज्ञ असूनदेखील जराही अहंकारी नसलेल्या व महादुर्गेच्या चरणी रत असलेल्या इनाकाला सलाम!

  इथे मला साधारण समांतर वाटणारी एक गोष्ट सांगावीशी वाटते. भारताने मंगळयान यशस्वीपणे अवकाशात सोडण्यापूर्वी, ते तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांनी श्रद्धेने त्या यानाची प्रतिकृती तिरुपति बालाजीच्या चरणी अर्पण केली होती. ह्या घटनेवरून, स्वतःला ‘विज्ञाननिष्ठ’ वगैरे समजणाऱ्या समाजामधून प्रचंड गदारोळ उठला होता. (‘जिथे अवकाशयानाची प्रतिकृती देवाच्या चरणी वगैरे वाहण्यासारख्या गोष्टी घडतात, तिथेच आपला देश विज्ञानक्षेत्रात मागे का ह्याचं उत्तर मिळतं वगैरे वगैरे अशा आशयाची टीका करण्यात आली होती….). मात्र हे तथाकथित विज्ञाननिष्ठ, अनुनाकीयांप्रमाणेच ही गोष्ट विसरत आहेत की जिथे विज्ञानाच्या कक्षा संपतात, तिथे अध्यात्माच्या कक्षा सुरू होतात! परंतु श्रद्धावानांच्या मनात ही गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित असते, हे इनाकाच्या किंवा ह्या मंगळयानाची मोहीम सुरू होण्यापूर्वी यानाची प्रतिकृती ईश्वरचरणी अर्पण करण्याची भावना ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.