Empress Alcmene सम्राज्ञी अल्केमिनी

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Empress Alcmene सम्राज्ञी अल्केमिनी

This topic contains 3 replies, has 4 voices, and was last updated by  Amitsinh Katwankar 3 years, 10 months ago.

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)
 • Author
  Posts
 • #76675

  Vishakha Joshi
  Participant

  ll हरि: ॐ ll
  आज दिनांक ३०-१२-२०१४ च्या तुलसीपत्रामध्ये लेटोच्या मनातील विचार –ही केवळ हर्क्युलिसच नव्हे, तर तिच्या सर्वच पुत्रांची आणि त्यांच्या मित्रांची सख्खी माता आहे, सम्राज्ञी अल्केमिनीविषयीच्या(Empress Alcmene) ह्या उदगारांमधून तिच्या समर्थ व्यक्तिमत्वाची जाणीव होते. सम्राट झियसच्या गुप्तचर यंत्रणेची प्रमुख असणारी लेटो जेव्हा फॉसिस नामक दरीकडे जाण्यास निघते तेव्हा तिच्या मनात या सम्राज्ञीचा विचार येतो आणि काही वेळातच त्या दोघींची भेट होते. त्या मार्गावरील संकटांची लेटोला कल्पना नसते मात्र याची पूर्णपणे कल्पना असणारी सम्राज्ञी अल्केमिनी स्वत: लेटोच्या रक्षणासाठी येते.
  सम्राज्ञी अल्केमिनी ही हर्क्युलिसची (Hercules) माता. सम्राट युरॅनसची(Uranus) वसुंधरावासी पत्नी. ही ग्रीक सम्राट पर्सियस ( Greek king Persias) व सम्राज्ञी सुदीप्ता यांची एकुलती एक कन्या. हिचे एक अन्य नाव अलका असेही असल्याचा उल्लेख येतो. सम्राज्ञी अल्केमिनीची आई सुदीप्ता ही वाराणसीचा राजा हेमनंदन यांची कन्या होती. कालांतराने सम्राज्ञी अल्केमिनी ग्रीक व वाराणसी(Varanasi) दोन्ही राज्यांची सम्राज्ञी झाली.
  सम्राज्ञी अल्केमिनीकडे एक असे यान होते जे हर्क्युलिसला वैश्विक प्रवेशद्वाराकडे नेऊ शकणारे होते. या हर्क्युलिसची जडणघडण त्याच्या या मातेनेच केली आणि निंबुरावासी (Niburu) सम्राट झियसला श्रद्धावान बनविण्यात हिचाच मोठा हात असल्याचा उल्लेख येतो. म्हणजेच सम्राज्ञी अल्केमिनी ही एक समर्थ राज्यकर्ती, अत्यंत निपुण योद्धा, प्रगत तंत्रज्ञानाची जाणकार आणि त्याचा वापर करणारी आणि त्याचबरोबरीने एक अत्यंत प्रेमळ माता, जी केवळ स्वत:च्याच पुत्राची काळजी घेत नाही तर आपल्या इतर पुत्रांची आणि त्यांच्या मित्रांचीही तितकीच काळजी घेते.
  या सम्राज्ञी अल्केमिनीच्या उल्लेखाच्या वेळी दोन महत्त्वाचे उल्लेख येतात. पहिला- हिचा पिता ग्रीक सम्राट पर्सियसचे वसुंधरेवरील पवित्र भूमीत जाणे येणे असे व ह्या देवभूमीचे नाव होते- भारतवर्ष. दुसरा उल्लेख- ग्रीक नागरिक भारतवर्षास हेण्डिया या नावाने ओळखत.

  #76775

  Ajitsinh Padhye
  Participant

  विशाखावीरा, तुम्ही अल्केमिनी(Alcmene) विषयी जे मत मांडलय ते मलाही पटलं. आजच्या अग्रलेखात आलेल्या वर्णनानुसार, फॉसिस नामक दरीकडे जाण्यास निघालेली लेटो(Leto) ही शस्त्रास्त्रांनी युक्त (तिच्याकडे लेझर रे(Lazer Ray) गन व मिसाइल लॉन्चर (Missile Launcher)असल्याचे उल्लेख मागील अग्रलेखात आले होते) असली, तरी पुढे जाऊन तिच्यासमोर उभे ठाकणा-या सेटू लोकांच्या आक्रमणाच्या भीषणतेची कदाचित तिला कल्पना नसावी. हे ओळखून अल्केमिनी तिच्या मदतीला धावून येते आणि दोघी मिळून सेटू लोकांचे आक्रमण परतवून लावतात. आजच्या अग्रलेखात उल्लेख आल्याप्रमाणे लेटोने तिच्याकडील “सर्वश्रेष्ठ किरणतमंचाने (लेझर गन)” सेटूप्रमुखावर नेम धरूनही, तिच्या हातातील शस्त्र खाली करून अक्लेमिनीने स्वत:कडील एका नलिकाशस्त्राचा चाप ओढून त्या सेटूप्रमुखाला फक्त ग्लानीत ठेवण्यापुरते त्याच्यावर प्रहार केला. “त्या सेटूप्रमुखाकडून आपल्याला सर्व माहिती मिळवता येईल” ह्या उद्देशाने मी हे केले आहे असे स्पष्टीकरणही ती लेटोला देते. ह्यावरून अल्केमिनीची दूरदृष्टी आणि चाणाक्य बुद्धीमत्ताही समोर येते.

  पण शेवटी त्या सेटू लोकांच्या प्रमुखाबद्दल जे वर्णन आलंय, तो नेफिलीम असल्याचे कळते. तो त्याचा मुखवटा नाही हे ही लेटो सिद्ध करते. त्याचप्रमाणे तो नेफिलीम आहे हे पाहिल्यावर “दोघींनाही आश्चर्याचा मोठाच धक्का बसला” असाही उल्लेख येतो. ह्या गोष्टीमुळे मूळ कथानकाला पुन्हा एकदा एक जबरदस्त कलाटणी मिळाली आहे. नाही का ?

  #77494

  Amit Prasade
  Participant

  बरोबर आहे अजितसिंह, कारण नेफिलीमशी(Nephilim) निगडीत आणखी एक गोष्ट घडली आहे.
  जेव्हा हिरेनाखास निम्बुरावरून(Nibiru) वसुंधरेवर येतो त्यावेळी वसुंधरेवर उतरण्याच्या आधीच त्याचा मृत्यू होतो.तेव्हा त्याचा देह शुक्राचार्य व नेफिमिमनीच शुक्रचार्यांच्या(Shukracharya) गुहेत लपविलेला आहे.
  ३० डिसेंबरच्या अग्रलेखात हिरेनाखासच्या देहाचा,नेफिलीमचा व शुक्रचार्यांच्या गुहेचा उल्लेख आहे.
  सर्व घटनांनमुळे एक वेगळीच व विचार करायला लावणारी कलाटणी मिळाली आहे.

  #77611

  Amitsinh Katwankar
  Participant

  विशाखावीरा, तुम्ही अल्केमिनी (Alcmene) विषयी जे मत मांडलय ते मलाही पटलं. मंगळवार दिनांक ३०-१२-२०१४ च्या अग्रलेखात सम्राज्ञी अल्केमिनीचे अजुन दोन महत्वाचे स्वभावगुण आपल्या समोर येतात.

  १) लेटो (Leto) जेव्हा फॉसिस नामक दरीकडे जात असते तेव्हा तिला अल्केमिनी भेटते. पहिल्या शिखरावरून पठार सुरू होताच अल्केमिनी लेटोस शस्त्रसज्ज होण्याची सूचना करते व स्वतःची शस्त्रेही बाहेर काढते. पठाराच्या दुस‍र्‍या टोकाकडून एक हिंस्त्र मानवांचा जत्‍था खेचरांवर बसून जेव्हा दौडत येताना त्यांना दिसतो तेव्हा अल्केमिनी स्वतःच्या कंबरेस गुंडाळलेला एक विचित्र शेला लेटोच्या गळ्यात फेकते, लेटोच्या शरिराचा स्पर्श होताच तो विचित्र शेला एखाद्या चिलखताप्रमाणे लेटोच्या मस्तकापासून गुडघ्यापर्यंट घट्ट चिकटून बसतो.
  या प्रसंगातून अल्केमिनीचा सावधपणा दिसतो व ती लेटोच्या संरक्षणासाठी किती तत्पर आहे हे कळते.

  २) सेटप्रमुखाने फेकलेला काटेरी पेटलेला गोळा अल्केमिनी केवळ तिच्या उजव्या हाताने मध्येच अडवते व तसाच परत सेटूंवर फेकते. यामुळे अल्केमिनीचा हात चांगलाच भाजतो. तिच्या हातात असलेले स्फटिकाचे पातळ कवचदेखिल तिच्या हाता रुतून बसते तरीही तिच्या चेहर्‍यावर इवलूशीही वेदना नसते.
  पावित्र्याच्या रक्षणासाठी स्वतःवर कितीही संकट झेलून घेऊन त्यांच्या समर्थमपणे मुकाबला करायला ही अल्केमिनी सदैव तयार असते.

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.