Ahomina – “आता काय करु शकनार पती व माहेर ह्यांनी टाकलेली ओहोमिना?

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Ahomina – “आता काय करु शकनार पती व माहेर ह्यांनी टाकलेली ओहोमिना?

This topic contains 3 replies, has 4 voices, and was last updated by  Sachin Rege 3 years, 10 months ago.

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)
 • Author
  Posts
 • #91213

  Mandar Patil
  Participant

  ओहमिना (Ahomina) या व्यक्तिरेखेची ओळख तुलसीपत्र(Tulsipatra) १०१५ मध्ये आम्हाला झाली. ओहोमिनाचा वसुन्धरेवर सुरु झालेला जीवनप्रवास तिच्या आजारपणामुळे संपतो असे आपण वाचतो.
  ओहोमीना (Ahomina) आपल्याला आजारी असल्याचे तुलसीपत्र १०२१ मध्ये कळते. ओहोमिनाचा मृत्यु झाला असं आपण वाचतो, पण खरं तर ओहोमिना तर तुंरुगात आहे, असंही आपण वाचतो. मग ओहोमिनाच्या जागी कोणाला मारले, हा प्रश्न उभा राह्तो.
  आता काही संदर्भ पाहत आपण याचा अभ्यास करूया.
  ओहोमीना ही नेफिलिमची (Nephilim)पत्नी व सॅथॉडोरिनाची (Circe)सख्खी बहीण आहे.
  ओहोमिना मरण्याच्या तीन दिवस आधी तिची तबेत खालावलेली असते. पण जर आपण बघीतले तर आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर ओहोमिनाची तबेत स्थिर झाल्यासारखी वाटू लागली तेव्हा तीच्या जवळ असलेल्या मंडळींपैकी अल्प आहार घेण्यास जाणारी व्यक्ती कोण? या व्यक्तीचा काही संबंध आहे का?
  मध्यरात्री ओहोमिनाची तब्येत सावरीत चालली आहे. हे पाहुन तीन्ही वैद्यानी सुस्कारा सोडला. पण ओहोमिना मृत झाली, हे बघताच तेथील सॅथॉडोरिना मोठमोठ्याने रडू लागली तीचा आवाज ऎकुन महालाबाहेरील अगदि दुरवरुन माणसे येउ लागली व नेफिलीमची अवस्था कोणास ही पहावत नव्हती.
  मग जेव्हा ओहोमिनाला तुंरुगात कैदी म्ह्णून नेण्याचा कट वास्तवात उतरवला जातो, तेव्हा ती एक वाक्य बोलते.- “पती व माहेर ह्यांनी टाकलेली ओहोमिना आता काय करु शकनार?
  या वाक्यातून ती काही सुचवू इच्छिते का? हे वाक्य व्यक्तिश: मला खूपच महत्त्वाचे वाटते.
  बापुंचे अग्रलेख जे प्रश्न उत्पन्न करतात, त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना विचारांना चालना मिळते. ओहोमिनाच्या जागी कुणाला मारले, याचे उत्तर मला जरी अजून मिळालेले नसले तरी अधिक खोलवर विचार करत राहण्याने याचे उत्तर मिळेल याची मला खात्री वाटते. त्याचबरोबर उचित् वेळी बापू याचे उत्तर नक्कीच आम्हाला सांगतील. आम्हा सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे अग्रलेख लिहिणार्‍या बापुंना याबद्दल अंबज्ञ म्हणावेसे वाटते.

  #92089

  Yogindra Joshi
  Participant

  ll हरि: ॐ ll

  १५-०१-२०१५

  हरि ॐ मन्दारसिंह. तुम्ही ओहोमिनाच्या(Ahomina) संदर्भातील घटनाक्रम व्यवस्थितपणे मांडला आहे. ‘ओहोमिनाच्या जागी त्या दुष्ट मंडळींनी कुणाला मारले’ हा खरोखरच अजूनही अनुत्तरित असलेला प्रश्न आहे, पण तुम्ही मांडलेल्या पद्धतीने विचार केल्यास याबाबत दिशा मिळू शकेल असे वाटते. ‘थाडा’ (Thada)या गूढ व्यक्तिमत्वाभोवतीसुद्धा अजूनही धुकेच आहे.
  रविवार दिनांक १५ जानेवारी २०१५ रोजीच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित झालेल्या बापुंच्या अग्रलेखात थाडाबद्द्ल अधिक माहिती मिळते. अर्थातच सध्या थाडा या पदी असलेली व्यक्ती कोण आहे, याचा उलगडा होत नाही. पण ही नक्कीच तगडी चेटकीण असावी, असे वाटते. पझुझुच्या (Pazuzu)तोंडी असलेला उल्लेख या संदर्भात पुरेसा आहे. पझुझु म्हणतो की ही थाडा जरी आमच्या दारात उभी राहत असली व आम्हाला पाहून आदर दर्शवीत असली, तरीदेखील ‘थाडा’ हे पद नेहमीच प्रत्येक लॅमॅसुला(Lamasu) व पझुझुला आदराचे स्थान असते. त्यातच ही थाडा तर खूपच ताकदवान आहे व हिची बुद्धीसुद्धा अतिशय तल्लख आहे. पुढील काळात या थाडाबद्दल व्यवस्थितपणे कळेल असे वाटते.
  ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll

  #93904

  Ajitsinh Padhye
  Participant

  हरि ॐ योगीन्द्रसिंह. “थाडा”(Thada) हे व्यक्तिमत्त्व खरोखरच विलक्षण आहेच, शिवाय कथेच्या पुढील भागामध्ये हे व्यक्तिमत्त्व खूप महत्त्वाची भूमिका बजावेल असे मला वाटते. योगीन्द्रसिंह, तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये पझुझुने (Pazuzu) थाडाबद्दल केलेल्या उल्लेखाबरोबरच, मला ह्या “थाडा”बद्दल ३ महत्त्वाचे मुद्दे जे जाणवले ते असे:
  १) दि. ११ जानेवारीच्या अग्रलेखात बापूंनी लिहिलय की लॅमॅसुच्या तंत्रगृहामध्ये प्रवेश करण्या अगोदर जेव्हा थाडा ओसिरिस (Osiris) व हॉरसला(Horus) प्रवेशद्वारावरील स्फटिक गोलासमोर उभे राहण्यास सांगते तेव्हा त्यावर पडलेल्या त्यांच्या प्रतिबिंबांना पाहून थाडा एकदम हसते व ती प्रतिबिंब हिरवी होताना पाहिल्यावर ती त्यांना आत घेऊन जाते. म्हणजे नक्की काय ? ती प्रतिबिंब हिरवी झाल्यामुळे काय संकेत मिळाला असावा ?
  २) दि. १५ जानेवारीच्या अग्रलेखात बापूंनी लिहिलय की “थाडाने एकमेव दात विचकत डेव्हिडॉहानाला(Devidohana) नीट पारखून पाहिले व ती आनंदाने दर्शविणारे उद्गार काढू लागली.” ह्या वाक्यामध्ये काहीतरी मोठी गोष्ट लपलेली आहे असे वाटते. डेव्हिडॉहानाला नीट पारखून पाहिल्यावर थाडाला आनंद का बरं झाला असेल ?
  ३) त्यानंतर ह्याच अग्रलेखात उल्लेख येतो की डेव्हिडॉहानाला लॅमॅसुच्या (Lamasu)चार पत्नी व थाडा ह्यांच्याबरोबर नाचणे कठीण जात आहे हे लक्षात येताच थाडा त्या चौघीजणींना वेगळे नाचण्यास सांगते व डेव्हिडॉहानाबरोबर थाडा वेगळी नाचू लागते. त्याचप्रमाणे पुढे उल्लेख येतो की “डेव्हिडॉहानाला थाडाबद्दल, ’ही नाचता नाचता आपल्या मानेचा लचका तोडेल’ असे वाटत असले तरी थाडा मात्र प्रत्येक पावलाला डेव्हिडॉहानाला सांभाळून घेतच नाचत होती”. म्हणजे ह्या थाडाला डेव्हिडॉहानाबद्दल विशेष आपुलकी आणि विशेष माहिती असल्यासारखे वाटते. नाही का ?

  परंतु काही सांगता येत नाही. नेहमीप्रमाणे वरील प्रश्नांची उत्तरं पुढच्या अग्रलेखांमध्ये काही वेगळीच मिळतील असे वाटते. पण हे थाडा व्यक्तिमत्व नक्कीच कुतुहल वाढवणारे आहे.

  #96490

  Sachin Rege
  Participant

  हरि ओम् मंदारसिंह,
  ओहोमिनाच्या (Ahomina)बाबतीत तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले आहेत्, ते प्रश्न मलाही छळत आहेत. बापूच त्याचं उत्तर देतील.

  त्याबरोबर योगिंद्रसिंह व अजितसिंह ह्यांनी चेटू-वेटूंची चेटकीण थाडा ह्यांबद्दल लिहिलेले मुद्देही विचार करायला लावणारे आहेत्. अजितसिंह अजून एक मुद्दा – ह्या थाडाला (Thada)कुठेतरी पाह्यलंय असा संशय डेव्हिडॉहाना(Devidohana) व ओसिरिस (Osiris) ह्या दोघांनाही येत राहतो….खरंच कोण असेल ही थाडा?

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.