सुंदरकांड प्रवासाची… सुंदर ९ वर्षे (तुलसीपत्र मालिका)

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) सुंदरकांड प्रवासाची… सुंदर ९ वर्षे (तुलसीपत्र मालिका)

This topic contains 3 replies, has 2 voices, and was last updated by  Chetansinh Deore 2 years ago.

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)
 • Author
  Posts
 • #765031

  Chetansinh Deore
  Participant

  हरि ॐ,

  २२ मे २०१६, नारद जयंती.
  आज ह्या दिव्य तुलसीपत्र अग्रलेख मालिकेला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत ,

  नारद – देवर्षी नारद म्हणजे भक्तीचा आद्य सूर व नामाच मधुर स्वरयुक्त उच्चार ह्यांचे केंद्रस्थान.

  अश्या ह्या नारद जयंती पासून त्रिपूरारी त्रिविक्रम अनिरूध्दांनी (प्रिय बापूंनी) “सुंदर कांड” वर अग्रलेख लिहण्यास सुरूवात केली.

  प्रिय बापूंनी भक्तीचा आद्य सुर अव्याहतपणे ह्या लेखमालेच्या स्वरूपात प्रवाहीत केला आणि करीत आहेत, ते ही ह्या विश्वातील सर्वात सुंदर अश्या श्री हनुमंतांच्या गुणसंकिर्तनातून, हनुमंतांच्या पुरुषार्थातून, त्याच्या पराक्रमातून.. सुंदर कांड च्या प्रत्येक शब्द, वाक्य, आेवी, चौपाई आणि प्रत्येक श्लोकातून…

  सुंदर कांड :

  मानवी जीवनास विकासासाठी, प्रपंचासाठी व परमार्थासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन ह्या सुंदर कांडात ठायी ठायी भरले आहे.
  एवढेच नव्हे तर ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन संपूर्ण जन्म उत्कृष्ट करण्यासाठी, सुख, शांती व तृप्तीच्या प्राप्तीसाठी लागणारे सामर्थ्यसुद्धा देण्याची ताकद ह्या सुंदरकांडात आहे. (तुलसीपत्र – १).

  ह्याची प्रचीती श्रद्धावानांना प्रत्येक तुलसीपत्र वाचतांना क्षणोक्षणी होत आहे.

  श्री त्रिविक्रम अनिरूध्दांनी सुंदरकांड तुलसीपत्र मालिकेतही आपली ३ पावले टाकली.. प्रथम पावलात प्रत्येक ओवीचा सरल अर्थ, दुसऱ्यात त्याचा भावार्थ आणि तिसऱ्या पावलात त्या ओवी मागील गुढ अर्थ त्यामधील संपूर्ण दिव्य रहस्य अर्थात संपुर्ण सत्य..
  हा रामसत्यसंकल्प फक्त आणि फक्त बापूच करू शकतात..

  सुंदरकांड हे महाप्राण हनुमंताचे चरित्र तर आहेच पण त्याहून अधिक ही सर्वश्रेष्ठ तीर्थयात्रा आहे. ह्या सुंदर तीर्थयात्रेचं पवित्र तीर्थ आपल्याला मागच्या ९ वर्षापासून प्रत्येक तुलसीपत्रातून मिळत आहे.. ते प्रिय बापूंच्या अथक परिश्रमातून आणि त्याहून अधिक अकारण कारूण्यातून..

  वैश्विक इतिहास :

  तुलसीपत्र-९९७ पासून एक वेगळ्याच आणि अद्भुत वाटाव्या अशा विषयाची बापूंनी सुरुवात केली. तुलसीपत्र-९९६ मध्ये मूषक हा श्रीगणपतीचे वाहन म्हणून अनसूयामातेच्या आश्रमात सिद्ध होतो आणि देवीसिंह असणाऱ्या परमशिव, चण्डिकाकुल वाहने आणि नारदांसह कैलास शिखरावर जातो.

  ” त्रिपुरासुराशी होणाऱ्या युद्धाची तयारी” म्हणून आदिमाता महालक्ष्मी एक अत्यंत विलक्षण असा नकाशा कैलासाच्या भिंतीवर काढते व त्याविषयी परमशिव आणि त्याच्या पुत्रांस समजावून सांगते.

  त्यावेळी किशोरावस्थेतील श्रीगणपति म्हणतो की ‘ह्या विश्वातील प्रत्येक ज्ञान हे शिव-पार्वती संवादातूनच मानवांसाठी प्रगट होत असतं.

  पण माता पार्वतीचे प्रश्न व परमशिवाने दिलेली त्यांची उत्तरे यामुळे मानव चण्डिकाकुल सदस्यांना स्वत:च्या पातळीवर आणून ठेवतो व कथांचे चुकीचे अर्थ लावून अधिक अज्ञानात पडतो’ आणि म्हणूनच मानवांच्या अज्ञानाचे निराकरण माता पार्वतीने करावे अशी प्रार्थना करतो व परमशिवही त्यास अनुमोदन देतात.

  ….आणि तिथूनच माता पार्वती ‘मानवांचे अज्ञान नष्ट करण्याचे’ कार्य सुरू करते.

  कैलासाच्या शिखरावर सर्व ब्रह्मर्षि, ऋषि व शिवात्मे ह्यांना बोलावून घेतले जाते आणि गणपतिने विचारलेल्या ‘कैलास पर्वताच्या चार विचित्र व विलक्षण बाजूंचे रहस्य काय?’ या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी माता पार्वती कैलासच्या उत्पत्तीची कथा सांगण्यास सुरुवात करते. त्याच क्षणी तेथे उपस्थित असणाऱ्या ब्रह्मर्षि कश्यपांना जाणीव होते की ‘आता सृष्टीतील एक खूपच विशाल व व्यापक असे सत्य विशद केले जाणार आहे’ व हा इतिहास शब्दबद्ध करून ठेवण्याची अनुज्ञा मागितली जाते. त्यावेळी आदिमाता आपले ‘श्रीविद्या’स्वरूप धारण करून नित्यगुरु याज्ञवल्क्यांना हा इतिहास मन:पटलावर कोरण्याची आज्ञा करते आणि इथूनच सुरुवात होते त्या इतिहासाची….खरं तर वसुंधरा पृथ्वीवर प्रजापती ब्रह्माने मानवी जीवन निर्माण केल्यापासूनच्या इतिहासाची.

  हा अद्भुत इतिहास वाचतांना अनुभूती होते की, प्रत्येक गोष्ट, घटना किती गुढ रहस्यमय आहे, अचंबित करणारी, अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी आणि अनेक प्रश्नांची श्रृंखला निर्माण करणारी आहे.

  ह्या लेखमालेतून श्रद्धावान आणि श्रद्धाहीन यातील फरक ह्यातील अनेक व्यक्ती, घटनांतून प्रत्ययास येतो.

  दोघांची (श्रद्धावान, श्रद्धाहिन) बलस्थाने, नितीमुल्ये, त्यांच्या कर्म स्वातंत्र्याच्या वापराचा परीणाम, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सतर्क करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहेत.

  श्रद्धावानांची कोण कोणत्या मार्गाने फसवणूक केली जाते, कुठल्या चूका होतात तसेच श्रद्धाहीनतेपासून श्रद्धावानतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग,

  तसेच आदिमाता महिषासूरमर्दीनी महादुर्गेचे अकारण कारूण्य, त्रिपूरारी श्री त्रिविक्रमाची श्रद्धावानांना असलेली कृपा त्रिविक्रमाची शक्ती असलेल्या “अरूला” ची सर्व प्रकारच्या संकटातून श्रद्धावानांना सोडवताना दिलेली साथ ह्या दिव्य तुलसीपत्र मालिकेतील असंख्य घटनेतून उदाहरणासह दाखवून दिली आहे.

  ही लेखमाला आता अश्या वळणावर येऊन ठेपली आहे ज्या ठिकाणी युद्धाची तयारी होत आहे.

  पहिल्या टप्प्यात,
  त्रिपुरासूराशी युद्ध करण्यास समस्त चण्डिका कुल कैलासावर जमले आहेत, श्री आदिमाता महालक्ष्मी युद्धाचा आराखडा कैलासावर काढून सर्वाना समजवत आहे…

  दुसऱ्या टप्प्यात,
  समस्त व्रतधारक महामाता सोटेरीयाच्या मार्गदर्शनाखाली अंतिम निर्णायक धर्मयुद्धासाठी सज्ज झाले आहेत आणि युद्ध गीत गाण्यास सुरुवात झाली आहे..

  तर तिसऱ्या टप्प्यात..

  सर्व श्रद्धावानांचे सर्व स्तरावर प्रारब्धाशी होणार्‍या युद्धाची तयारीही बापूंनी आपल्याकडून करून घेतली “सुंदरकांड पठण” उत्सवातून… साक्षात हनुमंतासोबत, हनुमंतासमोर…ह्या उत्सवात श्री शब्द ध्यानयोग मधील स्वस्तिवाक्य मनामध्ये आठवत राहीले .. “साक्षात श्री हनुमंत माझा मार्गदर्शक आहे आणि माझे बोट धरुन चालत आहे”
  श्री त्रिपूरारी त्रिविक्रमाची “अरूला” आमच्यासाठी बापूंनी प्रगट करून दिली श्रीश्वासम गुह्यसुक्तम रूपाने.. श्री गुरूक्षेत्रम् मंत्र ह्रदयात धारण करून आम्ही सर्व वानर सैनिकही आता सज्ज झालो आहोत..

  आता प्रतिक्षा आहे ती केवळ “रामराज्याची ”

  बापू मी अंबज्ञ आहे..
  जय जगदंब जय दुर्गे ? ? ?
  चेतनसिंह देवरे

  #791774

  Ajay Bhalkar
  Participant

  Hari om,

  Ambadnya article. Due to grace of bapu we all shraddhavan are fearless.

  I am ambadnya
  Jai jabdamb Jai durge

  #943263

  Chetansinh Deore
  Participant

  हरि ॐ,

  आला सहज हस्त तुझा मस्तकावरी माझ्या…

  आज सकाळी प्रत्यक्ष दैनिक हातात घेतला… विशेष सूचनेकडे लक्ष गेले..पहिले काही शब्द वाचले.. आणि मन आनंदाने बेभान नाचू लागले.. कारण *तुलसीपत्र अग्रलेख* मालिका परत सुरू होत आहे.. रोज प्रत्यक्ष हाती घेतांना ह्याच बातमीला नजर शोधत असायची.. इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ही गोड बातमी.. *गुरू*वार च्या दिवशी मिळाली.. अग्रलेख परत सुरू होत आहे *अशुभनाशिनी नवरात्री* च्या पर्वामध्ये..ह्या मागे सुद्धा निश्चितच *डॅड* ची आणि *मोठय़ा आई*ची सुंदर योजनाच आहे…

  त्या आनंदातच पुढच्याच क्षणाला पुढील विचार सुरू झाले.. अग्रलेख येण्यापुर्वी तयारी करावी लागेल.. मागचे काही अग्रलेख पुन्हा वाचावे लागतील.. जेणे करून येणारे लेख निट समजतील..
  पण ह्याची काळजी सुद्धा त्या माऊलीला आहे.. तो सर्व मनातले ओळखतो… जेव्हा पुर्ण मेसेज वाचला.. तेव्हा कळले.. अगदि सुरूवातीपासून ह्या सर्व लेखमालेतील कथाभागांचा सारांश आधी येणार आहे..
  ह्या अभाट लेखमालेचा सारांश करणे आमच्यासाठी शक्य नाही.. हे सुद्धा तो जाणतो.. तसेच कुठले तरी संदर्भ, कथा.. संवाद जे खूप आवश्यक आहे ते कळणे सुद्धा आमच्या साठी कठीण आहे ते सर्व ह्या सारांश रूपातून डॅड सहज आपल्या हाती देत आहे.. हे जाणून खरच थक्क झालो..

  तेव्हा जाणवले डॅड चे अपरंपार प्रेम.. अकारण कारूण्य.. आणि ह्या सर्वांमागील डॅड ची प्रचंड मेहनत…

  *किती हा श्रमतो माझ्यासाठी.. युगानुयुगे धावतो आहे..

  डॅड खूप खूप अंबज्ञ ? ?
  I love my Dad…

  जय जगदंब जय दुर्गे ? ?
  चेतनसिंह देवरे
  चेंबूर उपासना केंद्र.

  #1012049

  Chetansinh Deore
  Participant

  अनिरुद्ध पौर्णिमा एएडिम परेड- 2016

  हरि ॐ,

  अनिरुद्ध पौर्णिमा एएडिम परेड

  तो दिवस, तो क्षण जवळ आला आहे ज्याची प्रत्येक “एएडिम परेड डिमव्ही” आतुरतेने वाट पाहत असतो… तो दिवस म्हणजे — अनिरुध्द पौर्णिमा..

  वर्षभर प्रत्येक डिमव्ही प्रत्येक रविवार आपल्या वैयक्तिक कामांना, आठवडय़ाच्या विश्रांतीला बाजूला सारून, आळसाला झटकून परेड प्रॅक्टिस करतो, डॅड चा सर्वात आवडता उपक्रम एएडिम – अनिरुध्दाज् अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट मधील “परेड” ह्या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी.

  श्रीमद् पुरुषार्थ ग्रंथराज द्वितीय खंडात डॅड नी नवविधा निर्धार दिले आहेत, यांचे पालन करून “उत्तम” वानर सैनिक होण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  अगदि सोप्या भाषेत डॅड नी प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व ह्या नवविधा निर्धारा मध्ये दिले आहे.
  नवविधा निर्धारांचा अभ्यास करतांना वानर सैनिक बनण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन दुसऱ्या निर्धाराने आपल्याला मिळते.

  नवविधा निर्धार – 2 :

  “रामाच्या वानरसैन्यातील उत्तम सैनिक बनण्यासाठी ती शिस्त – अनुशासन ; देहाला (शरीर, प्राण, मन, व बुद्धी) यांना लावणे एवढाच माझा योगमार्ग.”

  आम्हाला रामराज्य हवे आहे, त्यासाठी मी वानर सैनिक बनणे आवश्यक आहे, आणि रामाचा उत्तम वानर सैनिक बनण्यासाठी शरीर, प्राण, मन, व बुद्धीला शिस्त आवश्यक आहे,

  ही शिस्त, अनुशासन सहजतेने प्रत्येकाला मिळावी यासाठी डॅड नी जी सुंदर योजना बनवली ती म्हणजे एएडिम परेड.

  अनिरुध्द पौर्णिमेला डॅड… आपल्या प्रत्येक एएडिम डिमव्ही ला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचे कौतुक करण्यासाठी सेल्यूट करतात. प्रत्येक डिमव्ही साठी ही आयुष्यातील सर्वात मोठी पर्वणीच असते.
  कारण मातृवात्सल्य उपनिषद मधील क्षमासुगंध प्रार्थना येथे आठवते..

  “आणि हे क्षमाशील आदिमाते ,
  माझी फक्त एक इच्छा पूर्ण कर ,
  मला तुम्हाला माझ्यामुळे
  आनंदित झालेले बघायचे आहे ”

  परेड बघून डॅड च्या चेहर्‍यावरील आनंद पाहून प्रत्येक डिमव्ही कृतकृत्य होतो.

  ह्या परेड मध्ये सामील होण्याची संधी डॅड नी मला दिली म्हणून मी खूप अंबज्ञ आहे..

  अनिरुद्ध पौर्णिमा ते अनिरुध्द पौर्णिमा असे परेड चे कार्यकाल वर्ष असते , पुढील वर्षाला सुरूवात होत आहे, तर चला पुढच्या वर्षासाठी संकल्प करूया.. डॅड चा उत्तम वानर सैनिक बनण्याचा.. डॅड च्या चेहऱ्यावरील आनंद पुढच्या अनिरुध्द पौर्णिमेला अनुभवण्याचा.. आणि वर्षभर नियमित परेड प्रॅक्टिस करण्याचा..

  हे मोठी आई, आमच्या कडून हा संकल्प पूर्ण करवून घे.

  मी अंबज्ञ आहे

  हरि ॐ श्रीराम अंबज्ञ

  जय जगदंब जय दुर्गे

  चेतनसिंह देवरे
  चेंबूर उपासना केंद्र (मुंबई)

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)

You must be logged in to reply to this topic.