सिद्धीक फाळकेचा अहंकार व बाबांचा क्रोध

Forums Sai – The Guiding Spirit सिद्धीक फाळकेचा अहंकार व बाबांचा क्रोध

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by  gauripatankar 2 years, 6 months ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #731081

  gauripatankar
  Participant

  हरि ओम. अंबज्ञ.
  सिद्धीक फाळकेच्या ( हाजी ) कथेवरून आपल्याला बोध होतो तो भक्ताच्या अहंकाराचा.
  1. सिद्धीक फाळके हा वयोवृद्ध यवन होता. त्याने मक्का – मदिनाची यात्रा केली होती. आणि याच गोष्टीचा त्याला अहंकार होता. त्याला असे वाटले की आपण शिरडीला गेल्यावर तत्काळ बाबा आपल्याला दर्शन देतील कारण आपण मक्का मदिनाची यात्रा करून आलोय. पण बाबांना त्याचा हाच अहंकार घालवायचा होता. म्हणून बाबांनी त्याला पहिले नऊ महीने मशिदीत येऊ दिले नाही. बाबांना त्याच्याकडून नवविधा भक्ति करून घ्यायची होती.
  2. नंतर सिद्धीक फाळक्यांनी माधवरावांना गळ घातली की बाबांचे दर्शन मिळवून द्या म्हणून. तेव्हा माधवरावांनी बाबांना याबाबत विचारले. तेव्हा बाबा म्हणाले की जर अल्लाचीच इच्छा नसेल तर कोणीच मशीदीची पायरी चढू शकत नाही. म्हणजेच कोणीही स्वतःच्या मर्जीने बाबांचे दर्शन घेऊ शकत नाही. जर त्या परमेश्वराची इच्छा असेल तरच तो मशिदीत येऊ शकतो. हाजीला मक्का मदीना यात्रा केल्याचा गर्व झाला होता. आणि हाच अहंकार मनात ठेऊन तो बाबांच्या दर्शनाला आला होता. बाबांना त्याचा हाच अहंकार नाहीसा करायचा होता. म्हणून ते त्याला मशिदीत याला बंदी करत होते.
  3. बाबांना हाजीचा भक्ति मार्गावर विकास करून घ्यायचा होता. म्हणूनच त्यांनी माधवरावांबाबरोबर हाजीसाठी निरोप पाठवले. पहिल्या निरोपामध्ये बाबांनी त्याला विचारायला सांगितले की बारवीपलीकडची वाट तू नीट चालून येशील काय? बारवीपलिकडची वाट म्हणजेच भक्तिमार्ग. बाबांना त्याला सांगायचे होते की तू भक्तीची वाट नीट चालून ये. त्यासाठी आधी अहंकार सोड. पण यावर हाजीने उत्तर दिले की वाट कितीही कठीण असली तरी चालेल मी चालून येईन. म्हणजेच अजूनही हाजीचा अहंकार गेला नव्हता.
  4. बाबांनी परत दूसरा निरोप पाठवला की तू मला चार वेळा चाळीस हजार रुपये देणार का? त्यावर हाजी उत्तर देतो चाळीस लाख मागितले तर मी देईन. म्हणजे दुसर्याा वेळेलाही त्याचा अहंकार तसाच होता. खरतर बाबा म्हणजे त्रैलोक्याचे स्वामी. त्यांना चाळीस हजार कोणाकडे मागायची काय गरजच नाही. पण हाजीचा अहंकार तपासण्यासाठी त्यांनी विचारले.
  5. परत बाबांनी तिसरी संधि म्हणून विचारले की उद्या मशिदीत बोकड कापायचा आहे. तुला त्यातले काय पाहिजे. मांस की अस्थि. तर हाजी म्हणतो की तुम्हाला जे द्यायचे ते द्या पण कोलंब्यातला एक भाकरीचा तुकडा मिळाला तरी मला चालेल. हाजीच्या या बोलण्यातूनही अहंकार डोकावत होता. त्यामुळे आता बाबा चिडले व त्यांनी पाण्याच्या घागरी व कोळंबा फेकून दिला व त्याला म्हणाले की तुझ्या म्हातारपणाचा आणि मक्का मदिना यात्रा केल्याचा तोरा तू दाखवतोस का? तू माझ्या मातेला अजून ओळखलेच नाहीस.
  6. बाबांना हाजीचा अहंकार नाहीसा करायचा होता. कारण अहंकार असेल तर भक्तिमार्गावरील – देवयान पंथावरील प्रवास नीट होऊ शकत नाही. यासाठी बाबांनी त्याला निरोप पाठवून संधि दिल्या अहंकार संपवण्याच्या. पण हाजीचा अहंकार गेला नाही. म्हणून शेवटी बाबांना क्रोध धारण करावा लागला. बाबांनी क्रोध दाखवून हाजीचा अहंकार घालवला. हाजीच्या धारेची राधा केली. त्याला भक्तिमार्ग दाखवला.
  7. बाबांनी पाठवलेले एकेक निरोप म्हणजे हाजीचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठीच्या पायर्या च होत्या. पण हाजी ते ओळखू शकला नाही. कारण त्याच्याकडे षडरिपूमधला अहंकार होता. प्रत्येक भक्ताचे असेच असते. त्याला परमेश्वराची भक्ति करायचि असते पण त्याचे षडरिपु याच्या आड येत असतात. मग परमेश्वरालाच त्याच्या भक्ताचे षडरिपु नाहीसे करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात जसे बाबांनी हाजीचा अहंकार संपवण्यासाठी क्रोध धारण केला.
  8. बाबांनी सांगितले की तू अजून माझ्या मातेला जाणले नाहीस. माता म्हणजेच ही मशीद. बाबांची मशीद ही केवळ एक वास्तु नव्हती. ती साक्षात द्वारकामाई होती. माय चंडिका आहे. आणि तिच्या परवानगी शिवाय कोणीही मशिदीत येऊ शकत नाही. ती ultimate आहे.
  9. हाजीचा अहंकार नाहीसा झाल्यावर बाबांनी स्वतः त्याच्याकडे प्रेमाने आंबे पाठवले व त्याला पंचावन्न रुपये दिले. आंबा हे फळ मधुर आहे. या फळाप्रमाणेच हाजीने मधुर भक्तीचे फळ चाखावे अशी बाबांची इच्छा असावी.
  10. भक्ताचे षडरिपु नाहीसे झाल्यावर मग तो परमेश्वराच्या प्रेमाची गोडी चाखू शकतो. जशी हाजीने चाखली.

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.