सर्की चे पलायन

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) सर्की चे पलायन

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by  Amarsinh Jagtap 3 years, 5 months ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #262623

  Amarsinh Jagtap
  Participant

  हरि ॐ
  मंगळवार दिनांक २६ मे चा बापूचा अग्रलेख वाचला त्यातून सर्की स्वताची सुटका कश्या प्रकारे केली हे समजले.सर्की तिला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मारून टाकत आहे ह्यावरून आपण श्रधावान लोकांनी श्रधाहीन लोकाशी कोणताही व्यवहार करताना किती सावध राहिले पाहिजे हे लक्षात येते.
  वल्ला हा प्रामाणिक आहे पण त्याने एका अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे आज त्याला त्याची आई आणि मावशी ह्या दोघीना कायमचे गमवावे लागले आहे आणि त्याला एका खुप मोठ्या दुखाला सामोरे जावे लागत आहे ह्या घटनेवरून अनोळखी व्यक्ती वर किती विश्वास ठेवायचा आणि किती ठेवायचा नाही हे बापू आपल्यला ह्या घटनेवरून दाखवतात.
  मला असे वाटते की सर्की जरी सध्या कैदेतून पळून जाण्यास यशस्वी झाली तरी पण यात फायदा zeus आणि team चाच होणार आहे कारण मोठी आणि तिच्या पुत्राची कृपा आपल्यावर असेल तर श्रधावानाचे अपयश ही श्रधावानाच्या हिताचेच ठरते कदाचित सर्कीच्या पळून जाण्याने जी गुपीत अजून समजू शकली नाही ती पण आता समजू शकतील .
  सम्राट zeus ची गुप्तचर यंत्रणा तर नक्कीच कामाला लागली असणार आहे.सर्कीचा शोध घेऊन तिच्यावर नक्कीच बारीक नजर ठेवली जाईल आणि त्या नीच सर्कीने ज्या व्यक्ती कडून मद्य घेतले ती व्यक्ती लगेच बुंगी (माता सोटेरिया) कडे गेलेली आहे त्यामुळे सरकीचे प्रत्येक चाल सम्राट zeus पर्यंत नक्की पोचणार यात काहीच शंका नाही.

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.