महामाता सोटेरिया (Matriarch Soteria)

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) महामाता सोटेरिया (Matriarch Soteria)

This topic contains 3 replies, has 4 voices, and was last updated by  snehalgadkari26 3 years, 1 month ago.

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)
 • Author
  Posts
 • #248828

  Sailee Paralkar
  Keymaster

  ॥ हरि ॐ ॥

  महामाता सोटेरिया (Matriarch Soteria)……दिपस्तंभ

  महामाता सोटेरियाची दिवसेंदिवस आपल्याला अधिक खोलवर ओळख अनिरुद्ध बापू (Aniruddha Bapu) अग्रलेखांमधून करून देत आहेत. व्रती व सावर्णि घराण्यांमधील सर्वात वयोवृद्ध आणि सर्वाधिक अनुभव संपन्न असलेली स्त्री…..माता सोटेरिया. आपल्या घराण्यातील प्रत्येकाच्या रक्षणासाठी ही तत्पर आहे. पण त्याबरोबरच भक्तीमार्गावरही सर्वांना अग्रणी असणारी माता सोटेरिया. हिलाच ब्रम्हर्षि अगस्त्यांनी गॉडेस ऑफ सेफ्टी (Goddess of Safety) म्हटले आहे. यावरूनच हिच्या सामर्थ्याचा अंदाज येतो. हिनेच आर्यश्रीचे रक्षण करून पुढील वंशाचेही संरक्षण केले. तर जाहबुलॉनला (Devil – Jahbulon) मानवी रूप देण्यासाठी खटाटोप करणार्‍या निमरॉड (Nimrod), आयसिस (Isis), डेव्हिडॉहाना आणि हॉरसचा ऐनवेळी येऊन घात करणार्‍या माता सोटेरियाची ताकद काय असेल, हेदेखील कळते.

  आपला नातू हर्क्युलिसचा (Hercules) बळी देऊ पाहणार्‍यांना माता सोटेरियाने जायबंदी करून त्यांच्या सगळ्या योजनांवर पाणी घातले. सगळ्यात वयोवृद्ध असूनही आपल्या वयाची पर्वा न करता लिलिथ बरोबर बुंगी बनून बिनधास्तपणे वावरत होती. बुंगीची भूमिका माता सोटेरियाने इतकी सुंदररित्या वठवली की लिलिथचे कोणतेही काम बुंगीशिवाय होत नसे. परमेश्‍वराविरोधात काम करणार्‍यांच्या गटात सामील होऊन त्यांचा विश्‍वासू बनणं, ही गोष्ट एका श्रद्धावासानाठी खरोखर कठीण वाटते. पण महादुर्गेची भक्ती करणार्‍या माता सोटेरियाने दाखवून दिले की खर्‍या भक्ताला कशाचीच भीती नसते. ही स्त्री महादुर्गा (Mahadurga) आणि त्रिविक्रमाची (God Trivikram) निस्सीम भक्त आहे. आपला नातू हर्क्युलिसला एका अवघड कामगिरीवर पाठवताना माता सोटेरिया हर्क्युलिसला एकच गोष्ट सांगते…. ’शेवटची खूण सुमेधस आणि मी सुमेधसची माता आहे.’ माता सोटेरिया या सगळ्यांसाठी दिपस्तंभ असल्याचे वाटते. प्रत्येकालाच तिचा खूप मोठा आधार वाटतो. माझ्या आप्तांना माझ्या अनुभवाची, मायेची, आधाराची, मार्गदर्शनाची आणि त्याचबरोबर ज्ञानाची आवश्यकता आहे, हे जाणून ती स्वत: कार्यरत होते.

  तिने आपल्या एका कटाक्षाने बावरला (Bawar) आपला पाळीव पशू बनवले आहे. माता सोटेरिया आता हॉरेमाखेतची (Horemakhet)कशी वाट लावते याची उत्कंठा लागली आहे. माता सोटेरियाच्या या सामार्थ्याचा पाया केवळ भक्तीच असल्याचे वारंवार दिसून येते.

  #405650

  Soteria Family Tree

  #405698

  हरि ओम दादा.
  खूप खूप अंबज्ञ. महामाता सोटेरियाची (Matriarch Soteria) वंशावळ आपण उपलब्ध करून दिल्याने तुलसीपत्र (Tulsipatra) अधिक सोप्या रीतीने समजून घेता येतील.
  महामाता सोटेरिया ही कोणाची पत्नी आहे हे जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा मनी दाटली आहे.
  बापू लवकरच हा उलगडा पण करतील.

  हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ
  सुनीतावीरा करंडे

  #441326

  snehalgadkari26
  Participant

  हरि ओम समीरदादा ! महामाता सोटेरीया (Soteria) ची वंशावळ दिल्याबद्दल खरच खूप खूप अम्बज्ञ !!

  सर्व सावर्णी घराण्याचा आधारस्तंभ असणारी महामाता सोटेरीया अशुभ आणि अपवित्रता यांच्या संपूर्ण विनाशासाठी सिद्ध असलेल्या सर्व देवयान पंथी जीवांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभी राहताना दिसते

  आणि त्याच बरोबर स्वतःही विचारपूर्वक त्रीविक्रमावर दृढ विश्वास ठेऊन पराक्रम करताना दिसते ख़रोखर महामाता सोटेरीया सर्व श्रद्धावानांसाठी एक आदर्श आहे तिची वंशावळ दिल्यामुळे परमपूज्य बापूंचे तुलसिपत्राचे लेख समजण्यास खूप सोपे झाले आहे .

  हरी ओम ! श्रीराम! अम्बज्ञ !

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.