प्रारंभ

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by  Suneetaveera Karande 3 years, 4 months ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #342482

  हरि ॐ.
  आजच्या दिनांक १९ जुलै २०१५ च्या “प्रत्यक्ष” ह्या दैनिकातील “तुलसीपत्र -११३४” ह्या अग्रलेखातून असे लक्षात आले की –
  टायफॉन व सेमिरामिस ह्या दोन भावडांच्या नाळी अर्थात त्या दोघांची माता असणार्‍या केरिडवेनच्या गर्भनाळी (Umiliical Cords) स्फटिकनलिकेत सांभाळून ठेवलेल्या होत्या, ज्या सुरुवातीला केरिडवेनचा पती असणार्‍या शुक्राचार्याने स्वत:च्याच ताब्यात ठेवल्या होत्या आणि पुढे केरिडवेन व टायफॉन शुक्राचार्यांच्या विरोधात जाताच ह्या नाळी शुक्राचार्यांनी त्यांची लाडकी कन्या निक्सच्या ताब्यात दिल्या होत्या. केरिडवेन ही त्या काळच्या संपूर्ण विश्वातील सर्वात श्रेष्ठ चेटकीण होती आणि तिचे कुविद्यासामर्थ्य ह्या तिच्या नाळींमध्ये ओतप्रोत भरलेले होते आणि ह्या नाळींच्या उपयोगाने कुविद्यासामर्थ्य सतत वाढते ठेवता येत होते. परंतु सॉलोमनने हॉरेमाखेतच्या सहाय्याने निर्माण केलेल्या भ्रमवलयामुळे (DELLUSION CIRCLE) शुक्राचार्य व निक्सला ती ‘मूळ’ स्फटिकनलिका कुठे आहे ते शोधताच येत नाही. तसेच बाबेला व हेडिसला मेडयुसाच्या वाड्यात शिरताना कुणी भ्रमिष्ट केले हे शुक्राचार्य व निक्सला ध्यान करून सुध्दा समजत नव्हते.जर मांत्रिकाने ते काम केले असते तर शुक्राचार्यांना कळू शकले असते. पण ज्या अर्थी त्यांना कळत नव्हते तेव्हा ते अनुमान करतात की ते कारस्थान विज्ञानाच्या
  सहाय्याने कुणा राजकारणी पवित्र वंशाच्या व्यक्तीने केले असावे आणि मग त्यांच्या माहितीच्या आधारे त्यांना अल्केमेनिचा पुत्र असणार्‍या
  हर्क्युलिसचा संशय येतो. तेव्हा त्याचा पत्ता लागत नाही तर तो वाराणसीत असावा व वाराणसीतील घटना ते पाहूच शकत नाही हे जाणतात.
  येथे आठवले ते बापूंनी लिहिलेल्या “मातृवात्सल्यविन्दानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद: ” ह्या ग्रंथातील साक्षात भगवान श्रीगुरु दत्तात्रेयांनी भगवान परशुरामाला उद्देशून काढलेले बोल. अध्याय २९ मध्ये श्रीकृष्ण जन्माच्या वेळचे रहस्य उलगडून दावताना श्रीगुरु म्हणतात की हे परशुराम ! तू सर्व श्रध्दावानांस उच्चरवाने गर्जून सांग की ही आदिमाता महत् योगपरमेश्वरी चण्डिका व तिची कन्या योगमाया सरस्वती “मायानिद्रेचे आवरण” फक्त श्रध्दाहीनांवर व दुराचार्‍यांवरच घालत असतात. वासुदेव व देवकीवर ह्या आवरणाचा काहीही परिणाम झालेला नव्हता हे उदाहरण पुरेसे आहे.
  म्हणजेच असे लक्षात येते की साक्षात आदिमाता महादुर्गा , तिचा पुत्र त्रिविक्रम हे पवित्र वंशीय हर्क्युलिस, तसेच सावर्णी घराण्यातील झियस, बिजॉयमलाना, अल्केमिनी, महामाता सोटेरिया ह्यांच्या पाठीशी सातत्याने उभे असतात आणि त्यांच्या श्रध्दावान असल्यामुळेच महादुर्गेचे वा त्रिविक्रमाचे सहाय्य त्यांना मिळू शकते. परंतु कुविद्या वा मांत्रिक सामर्थ्य कितीही प्रबळ असले तरी खुद्द शुक्राचार्य वा निक्स ही ह्या मायानिद्रेच्या आवरणातून किंवा भ्रमवलयापासून स्वत:ला वाचवू शकले नाही.
  आज विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या सहाय्याने मानव ह्या गर्भनाळींचा ( Stem Cells of Umbilical Cords) चा उपयोग फक्त काही मर्यादीत आजार Blood Cancer, Brain stroke/coma, Spinal cord injury, Retinitis pigmentosa, COPD, Autism, Cerebral palsy, Muscular dystrophy and so more degenerative diseases बरे करण्यापुरता वापरू शकतो. ह्याउलट त्या काळात देखिल शुक्राचार्यांकडे ह्या गर्भनाळींच्या सहाय्याने केरिडवेनचे कुविद्यासामर्थ्य सतत वाढते ठेवण्याचे कौशल्य होते हे कळते. पण कितीही झाले आणि काहीही केले तरी “पावित्र्या”ला ते मात देऊच शकत नाही. आदिमातेच्या “पावित्र्य हेच प्रमाण” म्हणून जपणार्‍या आणि प्रसंगी प्राणांचीही प्रवा न करणार्‍या सर्वच सावर्णी श्रध्दावानांचे संरक्षण होतेच , एवढेच नव्हे तर त्यांच्या गुप्त चाली, कारस्थाने ( अर्थात पावित्र्याच्या रक्षणासाठीच) ह्यांनाही सफलता मिळते आणि ते आपल्या अशक्यप्रद कार्यातही सफल होतातच.
  महान शास्त्रज्ञ Albert Einstein (1879 – 1955) चे quote आठवतात –
  A human being is a part of the whole, called by us “Universe,” a part limited in time and space. He experiences himself, his thoughts and feelings as something separated from the rest, a kind of optical delusion of his consciousness. This delusion is a kind of prison for us, restricting us to our personal desires and to affection for a few persons nearest to us. Our task must be to free ourselves from this prison by widening our circle of compassion to embrace all living creatures and the whole of nature in its beauty. Nobody is able to achieve this completely, but the striving for such achievement is in itself a part of the liberation and a foundation for inner security.
  Albert Einstein च्या मताप्रमाणे भ्रम वलय (delusion) हा एक प्रकारचा तुरुंग असतो ज्यात आपल्या वैयक्तिक आशा-आकांक्षांना मर्यादा पडते आणि ज्यावर काही नजीकच्या व्यक्तींचा प्रभाव पडू शकतो. शुक्राचार्यांच्या बाबतीत हे स्पष्टपणे जाणवते असे वाटते.

  याउलट महामाता सोटेरिया चक्क टायफॉनचा आवाज काढून त्यांना फसवू शकली वा लिंगायत गुहेत्तून गायब केले शिवलिंग परत मिळवता आले ह्या सर्व विस्म्यजनक घटनांमध्ये श्रध्दावानांना किती सहाय्य मिळते हे दिसते.
  वारंवार भारतवर्षातील प्रतिष्ठान नगरीवरचा हल्ला करायचा असो की जाहबुलॉनला जन्म द्यायचा असो ह्या श्रध्दाहीन , दुराचार्‍यांना पावित्र्याचे सामर्थ्यच वापरावे लागते ह्यावरून पावित्र्याची किती जबरद्स्त ताकद असते, सामर्थ्य असते हे सिध्द होते. अर्थात त्या नीच , नराधमांच्या हाती ना शिवलिंग लागत ना महादुर्गेश्वर लिंग लागू शकणार. आपल्या बापूंनी श्रीगुरुक्षेत्रममध्ये “महादुर्गेश्वर लिंगा”ची स्थापना किती पवित्र , शुभ स्पंदनाच्या वातावरणात केली, किती मोठ्या प्रमाणावर पार्‍याचा वापर केला हे सारे पाहता एवढी पवित्र “महादुर्गेश्वर लिंगा”ची राख ते किती घॄणास्पद , विकृत कार्यासाठी करू पाहतात. अर्थातच महादुर्गा त्यांची ही नीच कटकारस्थाने कधीच पूर्णत्वाला जाऊ देणार नाही हेच सत्य.
  आदिमातेने तिच्या नंदिनी अवतारातून तशी ग्वाही ह्या मूढांना कायम दिलीच आहे की हे मूढांनो , आतापर्यंत कधीही परमात्म्याच्या शत्रुंचा विजय झालेला नाही व ह्यापुढेही होणार नाही.
  साक्षात महादुर्गेचे वचन ते कधीच वृथा (असत्य) होऊच शकत नाही. मग भले ते शुक्राचार्य जहाबुलॉनला जन्म घालायला सर्व ताकद पणाला लावो, मारडूक आणि मेड्युसा ते स्वप्न पाहो किंवा नीच , पाताळयंत्री सर्की आणखी कितीही उड्या मारो , एवढेच काय तर आज अमेरिकेत नाही तर अख्या जगभर बफोमेटची देवळे बांधो किंवा इल्युमिनाटी चालवू त्या सर्वांचा समूळ नाश करायला, पावित्र्याला उखडू पाहणार्‍यांचे हातच उखडून टाकायला आमचा परमात्मा, त्रिविक्रम समर्थ आहे १०८% !
  “मातृवात्सल्यविन्दानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद: ” ह्या ग्रंथातील १५ व्या अध्यायात श्रीगुरु परशुरामांना सांगतात की दुराचारी समूहांमध्ये प्रत्येक जण मित्रासाठी, नातेवाईकासाठी , सहकार्‍यासाठी किंवा अगदी अधिपतीसाठीही जे काही करतो , त्यामागे त्यचा स्वत:चा स्वार्थ असतोच असतो. ह्याची प्रचिती सर्कीच्या वागण्यातून पाऊलोपाऊली येतच होती. पण निकस जी शुक्राचार्यांची आवडती कन्या आहे आणि तिच्यासाठी ते बाकी सर्वांशी वैर घेतात , तिलाही जेव्हा शुक्राचार्यांचे सामर्थ्य कमी पडत असल्याची जाणीव होते , तेव्हा ती निकस स्वत:च्या फायद्यासाठी साधनेला बसलेल्या आपल्याच पित्याला शुक्राचार्यांना बंदी करून लॉबेरिन्थमध्ये कैदी करते. एवढेच नव्हे तर आप्ल्या पुत्राला मिनॉसलाही आपण
  त्याची माता असल्याने त्याच्यापेक्षा आपले सामर्थ्य अधिक असल्याची चुणूक दाखवून तंबी देते.
  ह्या दुराचारी, श्रध्दाहीनांना फक्त आणि फक्त सत्तेची लालसा आहे , त्यापुढे ते कोणालाही जुमानत नाही हेच कटू प्रखर सत्य आढळते.
  येथे श्रीसाईसच्चरितातील ओवी आठवते ” सोडूनिया लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई (बापू बापू )
  बेडा पार होईल पाही संदेह न मनी धरावा ” आणि ” एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ”
  सर्व सावर्णी , श्रध्दावान ह्याच गोष्टींना उराशी कवटाळून वागतात , आपली सर्व चतुराई ही महादुर्गा आणि त्रिविक्रमामुळेच आहे हे ते निश्चीत जाणतात आणि म्हणूनच अनन्य शारण्यभाव , विश्वास ते आपल्या त्रिविक्रमाच्या आणि महादुर्गेच्या चरणी वाहतात. आपणही आपल्या आदिमाता चण्डिका -मोठ्या आईच्या आणि तिच्या पुत्राच्या आपल्या बापूंच्या चरणी असाच विश्वास धारण करता येण्यासाठी प्रार्थना करू या, आपले आज्ञाचक्र “त्या” एकाच्याच चरणी वाहिल्यावर आपला बेडा पार होणारच आहे. कारण ” तो” पाठीशी असताना कोणतेही Dellusion of circles आम्हाला बंधन करूच शकत नाही.

  महादुर्गा विजयते ! त्रिविक्रम विजयते !
  जय जगदंब जय दुर्गे
  हरि ॐ . श्रीराम. अंबज्ञ

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.