त्रिविक्रम (Trivikram)

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) त्रिविक्रम (Trivikram)

This topic contains 1 reply, has 1 voice, and was last updated by  Sangita Vartak 3 years, 2 months ago.

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)
 • Author
  Posts
 • #173188

  Sangita Vartak
  Participant

  हरि ॐ,
  मागे १ मार्चच्या १०८४च्या अग्रलेखात आपण पाहिलेच की, दनूच्या गुहेत झालेल्या झटापटीत झियस (Zeus) आणि हर्क्युलिसने (Hercules) आपल्या जीवाचा जराही विचार न करता शेवटच्या श्वासापर्यंत केलेले मानवी प्रयत्न कमी पडले आणि जेव्हा त्यांच्या अक्षरश: जीवावर बेतले असता लगेचच त्रिविक्रमाने झियस आणि हर्क्युलिसला त्या जाहबुलॉनच्या (Devil – Jahbulon) कचाट्यातून सोडवून आणतोच.

  त्याचप्रमाणे कालच्या अग्रलेखात तसेच घडले… हर्क्युलिस जेव्हा त्या दहा तोंड असलेल्या अतिप्रचंड व भीषण अशा आकाराच्या आणि अत्यंत भयानक दुर्गंधी असलेल्या विषारी वायूचा मारा करणार्‍या अजगराबरोबर आपल्या सर्वशक्तिनीशी लढत असतो. लढताना तो नामस्मरणही करत होता, उचित विचारही करत होता, ब्रम्हर्षि कश्यपापसून शिकलेल्या योगविद्येचा वापरही केला, माता सोटेरिआने दिलेल्या स्वस्तिकार अस्त्त्राने आपल्या जीवाचा तिळमात्रही विचार न करता त्या अजगरावर सपासप वार करू लागला. त्या अजगराने त्याच्या दहा तोंडाने दहा प्रकारच्या दुर्गंधयुक्त वायूचे झोत बाहेर टाकले. त्या विषारी वायुंमुळे हर्क्युलिसला अत्यंत दुबळेपणा येत होता तरी तो त्रिविक्रमाचा जप करत आपले प्रयन्त चालूच ठेवले आणि लगेचच त्रिविक्रमाच्या भारदार हातांनी त्याला त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर टाकले….

  या दोन्ही प्रसंगातून एक समान गोष्ट दिसून येते आणि ती मला खूप महत्वाची वाटते ती म्हणजे –
  जर मानवाने हा आपले सर्वस्व पणाला लावून चांगल्या कामासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली परंतु काही कारणांमुळे जेव्हा त्यांचे परिश्रम आणि ताकद संपते म्हणजेच परिस्थिती मानवी आवाक्याबाहेर जाते तेव्हा लगेचच त्रिविक्रम (Trivikram) प्रगटतो आणि त्यांना वाचवितो. खरचं हा त्रिविक्रम आपणा श्रद्धावानांना अत्यंत बिकट प्रसंगात सापडलेले असताना अगदी उचित वेळी येऊन अलगद बाहेर काढतो… अगदी नक्कीच…

  त्रिविक्रमा तू प्रेमळ आहे आणि मी अंबज्ञ आहे….. त्रिविक्रम हा माझ्या जीवनाचा एकमेव आणि संपुर्ण आधार आहे… जय जगदंब जय दुर्गे।… अंबज्ञ…

  #409234

  Sangita Vartak
  Participant

  Trivikram

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.