आदिमातेचा संकल्प व निन्कुच्या माळेचा अस्त

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) आदिमातेचा संकल्प व निन्कुच्या माळेचा अस्त

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by  Yogesh Joshi 3 years, 2 months ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #387681

  Yogesh Joshi
  Participant

  हरि ॐ
  कालच्या अग्रलेखात (तुलसीपत्र ११३९) एक गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित झाली की विश्वातील सर्व जीवांचे नियमन फक्त आणि फक्त आदिमातेच्याच अधिपत्याखाली असते भले तो जीव श्रद्धावान भक्त असो की श्रद्धाहीन दुराचारी.
  पुलिकेच्या गतस्मृति जागृत होणे आणि अचानक तिला स्वताच्या शरिरावर केले गेलेले लिखाण आठवले ह्या घटनेचे साधर्म्य बिभीषणाला रावणाच्या शरीरातील अमृत कलशाचे स्थान आठवण्याच्या घटनेशी दिसून येते. येथेही रावणाचा वध ह्या आदिमतेच्या संकल्पाच्या आड़ येणाऱ्या सर्व घटना अलगद दूर झालेल्या आपण पाहतो. बिभीषणास दिलेला असुर गुरु शुक्राचार्यांचा शाप येथे निष्प्रभ ठरतो.
  येथेसुद्धा सर्व दुराचाऱ्यांचा पाड़ाव ह्या संकल्पाच्या आड़ येणारी प्रत्येक गोष्ट सहजतेने दूर होते. आणि सर्व घटना उचित वेळी घडलेल्या दिसून येतात. दत्तगुरूंच्या नियमाबाहेर कुठलीच गोष्ट असुच शकत नाही म्हणूनच खरे श्रद्धावान त्रिविक्रमाच्या छत्रछायेत नेहमी निर्धास्त असतो. कारण दुराचारी कितीही प्रबळ असले तरी त्यांचा पाड़ाव होणारच ही खात्री… हा विश्वास. पुलिकेच्या ह्या स्मृतिनेच शत्रुस शक्तिहिन करून दुराचाऱ्यांचा नाश घड़वायचा मार्ग सापडतो.

  अजुन एक गोष्ट येथे सहजतेने घडून आलेली दिसते ती म्हणजे सम्राट झियसने नेलेला दिवा. खरेतर गुप्त मार्गाने कठीण अश्या चढ़ावावरून कोणाच्याही नकळत जायचे तर दिवा पेटवणे धोक्याचे ठरते कारण अंधारात आपले स्थान शत्रुस लगेच लक्षात येवू शकते. आणि जेथे अत्युच्य दर्जाचे तंत्रज्ञान दिमतिला असताना नाईट व्हिजन कॅमेरा व तत्सम टेक्नोलॉजी न वापरता दिवा वापरला गेला. ह्यातील मेख म्हणजे दुराचारी कितीही उच्च दर्जाच्या कुमार्गातील साधनेने सम्पन्न असला तरी त्याचा अहंकारच त्याच्या सर्वनाशासाठी कारणीभूत ठरतो. रावणाचा अहंकार की सामान्य मानव एवढा समुद्र पार करून प्रचण्ड राक्षसी सेनेचा पाड़ाव करून मला काय मारू शकेल ह्यानेच त्याचा घात झाला.

  येथे निक्ससारखे अंकाराचे स्त्रीरूप सारासार विचार न करता अंधारात दुसरा एखादा कुमांत्रिक ज्याने अतिशय महत्वाच्या २ गोष्टी चोरल्या तो असा उघड रित्या आपले अस्तित्व दाखवून पळ काढेल ह्या देखाव्याला सहजतेने भूलते. आणि आपले कुमंत्राने भारित अस्त्र तिच्या दृष्टिस जाणवलेल्या उत्नापिष्टिमवर फेकते … कुठलाही सारासार विचार न करता. अविचारीपणा हेच तर सर्व दुराचाऱ्यांच्या नाशाचे गुपित असते. ह्या घटनेत निक्स व शुक्राचार्य ह्या दोघांखेरीज त्या जहाजाला अग्निपासून धोका आहे हे अजिबात माहीत नव्हते तरीही सम्राट झियसने वापरलेला दिवा आपसुकच ह्या जहाजाच्या नाशासाठी कारणीभूत ठरतो. म्हणजेच इकडे समजून येते की आदिमातेपासून लपून राहील अशी कुठलीच गोष्ट ह्या विश्वात अस्तित्वात नाही. आणि जे सर्व घडले ते त्या चण्डीकेच्याच इच्छेनुसार …तिच्याच संकल्पाने.
  जय जगदम्ब जय दुर्गे । श्रीराम । अम्बज्ञ ।
  योगेशसिंह जोशी,रत्नागिरी.

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.