Zeus fights Jahbulon – the devil

#152936

Sailee Paralkar
Participant

हरी ओम,

​​
दिनांक १ मार्च, रविवारचा अग्रलेख हा अक्षरश: श्वास रोखणारा अग्रलेख होता. सम्राट झियस(Zeus) हा किती चातुर्याने प्रत्येक हालचाल करत होता त्याला जेव्हा असे वाटते की आपला जीवन काळ संपला तेव्हा तो महादुर्गेला माझे (Mahadurga) प्राण वाचव अशी प्रार्थना न करता, बिजोयमलानाला (Bijoymalana) वाचव अशी प्रार्थना करतो. व “मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझे स्मरण करणार व जहाबुलोनशी (Jahbulon -the devil ) लढतच राहणार” असा निर्धार करतो. हेच खरे सम्राट, सच्चा वानारर्सैनिक असल्याचे लक्षण आहे. नंतर जेव्हा जहाबुलोन आणि झियस झटापटी चालू असते तेव्हा नेहमीप्रमाणे अफ्रोडाईट हर्क्युलिस सोबत तिथे पोचतेच व हर्क्युलिस आणि जहाबुलोन यांची झटापट चालू असते. बघता बघता हर्क्युलिस जहाबुलोनच्या जीभेच्या विळख्यात गुंडाळला जातो, झियस आणि हर्क्युलिसचे प्रयास त्याच्याशी लढायला अपुरे पडत असतात तरी अफ्रोडाईट शांत उभी असते, याचे झियसला आश्चर्य वाटत असते पण हर्क्युलिस तर तिच्याकडून अपेक्षा देखील करीत नाही कि ती त्याला वाचवायला येईल, तो म्हणतो “तू शांत आहेस माझे काहीच म्हणणे नाही” तेवढ्यात तेथे त्रिविक्रम प्रगट होतो व त्यां दोघांना जहाबुलोनच्या तावडीतून सोडवतो. मागील अग्रलेखातच बापुनी आपल्याला अल्केमिनी आणि पोसायडॉनच्या संवादातून सांगितले होते, “जोपर्यंत मानवी मर्यादांना झेपू शकते, तोपर्यंत त्रिविक्रमाकडून अफ्रोडाइटला सहाय्याचा संकेत मिळत नाही व म्हणूनच हिचा किंवा त्रिविक्रमचा ‘प्रत्यक्ष’ हस्तक्षेप मानवी मर्यादांच्या पलीकडेच होत असतो.” आणि “जेव्हा श्रद्धावानांची ताकद अपुरी पडू लागते, तेव्हा श्रीचंडिकाकुलातील सदस्य निश्चितपणे स्वतः सर्वकाही करू लागतात.” आणि ह्या वेळेस अगदी तसेच घडले.
यावरून उपनिषदातील मोठ्या आईने दिलेली ग्वाही आठवते, जेव्हा भक्त न थकता भक्ती करत प्रयास करतच राहतो तेव्हा चंडिकाकुल स्वतः त्यांना सहाय्य करण्यासाठी तत्पर असतात. गेल्यावेळेस ‘श्री त्रिविक्रमाने ‘ जहाबुलोनला मारायला जागच्या जागी बसूनच पाश फेकला होता, परंतु ह्या वेळेस त्याचे भक्त संकटात असल्यामुळे, त्याच्या भक्तांसाठी ‘त्याने’ तिकडे प्रकट होऊन त्याने परशु फेकला व परत एकदा बंदिवान करून टाकले.

“हे त्रिविक्रमा, तुझा जयजयकार असो”

“हे त्रिविक्रमा, तुझा जयजयकार असो”

“हे त्रिविक्रमा, तुझा जयजयकार असो”

अम्बज्ञ.