Zeus and the Saturn planet

#90148

ketaki. Kulkarni
Participant

आजचा लेख जबरदस्त आहे..
खरच मला बापूंना काय म्हणावे समजत नाही..
त्यांची स्तुति करावी तितकी कमीच.. इतका मोठा इतिहास आणि तो ही कुठेही कुठल्याही प्रकारचे confusion न होउ देता आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना तो सहज समजेल अश्या भाषेत सांगणे किती कठीण आहे पण हा बापू हे सगळ अगदी लीलया करत आहे..
बापूंकडे नसतो तर हे सर्व आपण जाणु शकलो असतो का कधी!! अंबज्ञ बापुराया!!

आजसुद्धा काय भन्नाट गोष्टीची उकल बापूंनि करुन दिली आहे.
शनि (Saturn)ग्रहाची निर्मिति,त्याचे कार्य आणि त्याच्यावर असलेला ह्या त्रिविक्रमाचा अंकुश!

scientific base असलेला हा शनि ग्रह व त्याची साडेसाती हे clear बापूंनी समजावून दिले आहे. म्हणजे कुठेही कसले ही थोतांड न करता सत्याची जाणीव किती सहजपणे करून दिली आहे.
ह्यातून एक गोष्ट दिसून येते की श्रद्धाहीन लोक दुसर्यांसाठी खणलेल्या खड्यात स्वतःच कसे अडकतात. त्या लोकांनी शनि ग्रह हा कृत्रिम ग्रह बनवला खरा पण त्रिविक्रमाने तिथे ही त्यांचे काहीच चालु दिले नाही. प्रत्येक ठिकाणी ‘तो’ आहेच आणि असतोच ह्याची जाणीव आपल्याला करून देत असतो.
इथे खरे तर मला सम्राट झियसचे(Zeus) मनापासून कौतुक करावेसे वाटते.
सम्राट पदाला पुरेपूर शोभून दिसणारे हे व्यक्तिमत्व!
प्रत्येक गोष्टीचे ज्ञान ह्याने प्राप्त करून घेतले होते. त्याचबरोबर स्वतःची चूक लक्षात आल्यावर ताबडतोब ती सुधारायला घेतली आणि ओपेरोजाट्सच्या चुकीच्या गोष्टींची आपल्याला काही जाणच नाही असे भासवून त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवून गाफिल ठेवले व इथे वसुंधरेवर मोजक्या ७जणांना घेऊन मंदिरे बांधली. आणि त्याची साथ देत गेली ती सम्राज्ञी बिजोयमलाना…

इथे मला सम्राट झियसबद्दल एक गोष्ट जाणवते.. ती म्हणजे
“Start from wherever you are with whatever you have, and never be satisfied”ह्याचे अगदी व्यवस्थितपणे केलेले implementation..
चूक झाली आधी पण त्याचे दुःख न करत बसता ती चूक सुधारण्याचा केलेला प्रामाणिक प्रयास..
जे आहे त्यातूनच उपयोग करून मंदिरे बांधली.. आणि त्याच बरोबर नवीन गोष्ट ही शिकुन घेतली. अन्तराळरसायन.. म्हणजेच जे आहे त्यातच समाधानी न राहता नविन गोष्ट शिकुन ती आत्मसात केलि..
प्रजेची काळजी घेण्यासाठी तसेच महादुर्गेची भक्ति करण्यास उत्सुक असणाऱ्या ह्या सम्राट दांपत्यास मग ही महादुर्गा कशी बरे मदत नाही करणार?
झियसच्या आयुष्यात सुरु होणाऱ्या साढेसाती पासून वाचण्यासाठी स्वतः देवी अफ्रोडाइट त्याच्या कानात महाप्राणाचा मंत्र सांगते.
व्वा! पुढे अजुन काय काय आणि कसे कसे होईल ह्याची आता उत्सुकता लागली आहे, त्याचबरोबर सुरु होणाऱ्या त्रिविक्रम राहस्यचि आतुरतेने वाट पहात आहोत.
अंबज्ञ बापुराया
त्रिवार अंबज्ञ
हे त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे
अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी