you are judged only by your faith

#96599

Suneeta Karande
Participant

हरि ॐ
दिनांक १८-०१-२०१५ च्या अग्रलेखातून बापूंनी खूप उत्कंठावर्धक कथा सांगितली आहे.
अ‍ॅथेनाचे (Athena)धैर्य, श्रध्दा आणि सबूरी वाखाणण्यासारखी आहे.
बापूंनी दिनांक ०८-०५-२०१४ च्या प्रवचनात सांगितले होते की ” You are not judged by your performance, you are judged only by your faith” माणसांच्या जगात performance वर judge केलं जातं, पण परमेश्वराच्या दरबारात तुमचा विश्वास किती? तुमचा faith किती? ह्यावर सगळं असतं. ज्याचा विश्वास चांगला तो चांगली कामं करतोच. त्याच्या कामाची व्याप्ती किती हे महत्वाचं नाही.”
अ‍ॅथेनाचे आर्कच्युरियन्सचे (Arcturians)अवकाशजहाज हे निंबुरावरील सज्जनांच्या मदतीसाठी निघाले होते ह्यावरून तिचा चांगला विश्वास आणि चांगली काम करण्याची प्रवृत्तीच दिसते.
“मातृवात्सल्य उपनिषदात” त्रिविक्रम श्रध्दावान मित्रांना आश्वस्त करतो ” प्रिय मित्रांनो! आदिमातेवर व तिच्या श्रीकुलावर पूर्ण विश्वास ठेवून जे श्रध्दावान परिश्रम करतात आणि आलेल्या संकटांना न घाबरता प्रयास व भक्ती चालूच ठेवतात, ते श्रध्दावान यशस्वी, संपन्न आणि सुखी होणारच. कारण आदिमाता व तिचे संपूर्ण श्रीचण्डिकाकुल (Chandika kul)त्यांच्या सहाय्यासाठी तत्पर आहे. गरज आहे तुमच्या प्रयासांची आणि भक्तीची.
ही वत्सल आदिमाता केवळ तुमच्यासाठीच उभी आहे.”
आणि ” तुम्ही किती विद्वान , विद्यापारंगत व मंत्रपाठक आहात, त्याने काहीच फरक पडत नाही,
सर्वकाही एकाच गोष्टीवर ठरते, तुमचा माझ्या आदिमातेवर किती शुध्द विश्वास आहे.”
अ‍ॅथेनाच्या कथेत हे त्रिविक्रमाचे बोल सत्यात उतरलेले जाणवतात मग भले तो मानव असो वा अर्कमानव असो.
अ‍ॅथेना ही अचानक आलेल्या नादनच्या आक्रमणाने जराही विचलीत होत नाही , धैर्याने लढत राहते , आपले प्रयास चालूच ठेवते अंतिम क्षणांपर्यंत स्वत:चे बोट निष्प्राण होईपर्यंत…आणि अर्कविद्या शिकविणार्‍या माता सोटेरियास आणि माता थियास प्रणाम करते आणि निंबुरावर एकदाच पाहिलेली “महादुर्गेची” (Mahadurga)प्रतिमा तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागली. ह्यावरून “अंबज्ञता” अगदी क्षणैक असली तरी काय गजब करू शकते ह्याचे प्रत्यंतर देते.
आदिमातेचीच कृपा बनून येते ती अ‍ॅफ्रोडाईट आणि हर्क्युलिस हयांच्या रुपाने. मला वाटते बापू म्हणालेही होते की अ‍ॅफ्रोडाईट ही आल्हादिनी आहे. अ‍ॅफ्रोडाईट आणि हर्क्युलिस आर्कच्युरियन्सचे अवकाशजहाज अगदी शेवटच्या क्षणी पोहचूनही कसे वाचवितात ह्यातील चित्तथरारकता अवाक् करते. अ‍ॅफ्रोडाईटचा स्पर्श होताच अ‍ॅथेना पूर्ववत होते व अ‍ॅफ्रोडाईटच्या केवळ “उठा” ह्या एका शब्दाच्या उच्चारानेच जहाजावरील प्रत्येकजण पूर्ववत झाला…. केवळ नखाच्या स्पर्शाने हजारो वर्षे पाषाण बनून मृतवत झालेल्या अहिल्येला पुनर्जन्म देणार्‍या श्रीरामांची आल्हादिनी शक्तीच हे कार्य करू शकते अ‍ॅफ्रोडाईटच्या रूपाने!!! असे वाटते.
हर्क्युलिसच्या शरीरावर वारंवार येऊन आदळलेल्या त्या नादनच्या अस्त्रांमुळे ,त्याचे संपूर्ण शरीर अत्यंत तप्त होत चालले होते. ती तप्त जाणीव अ‍ॅफ्रोडाईटच्या शेल्याबरोबर आपोआप शांत झाली होती हे वाचतानाही परमात्म्याच्या आल्हादिनीचाच आठव येतो.
“पावित्र्य हेच प्रमाण ” हा नियम अगदी प्रत्येक क्षणी स्वत:च्या प्राणांचीही पर्वा न करता भगीरथ प्रयास करून कसा जगायचे ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हर्क्युलिस ! सम्राट झियसने हर्क्युलिससंबंधी काढलेले उद्गार ‘‘हर्क्युलिस, तू खरेच नेहमीच पावित्र्याचा रक्षक राहिला आहेस.” हे किती यथार्थ आहेस हे मनोमनी पटते जेव्हा अ‍ॅफ्रोडाईट सांगते की तुला जहाजाबाहेर पडून ब्रम्हकिरण वापरणे आवश्यक आहे तेव्हा ताबडतोब हर्क्युलिस बिनधास्तपणे बाहेर पडून अतुलनीय पराक्रम गाजवितो आणि अवघ्या एका घटिकेत नादानचे यान पूर्ण नष्ट करतो.
हर्क्युलिसचे हिमालयासम अत्युंग व्यक्तिमत्व केवळ असामान्य, अद्वितीय, अदभूत विलक्षणच आहेत एवढेच नसून एका श्रद्धावानासाठी अत्युच्च आदर्शच आहेत असेच वाटते.
बापूंनी दिनांक ०१-०८-२०१३ च्या त्रिविक्रम आणि π ही संकल्पना समजावताना सांगितले होते की π ही एक जबरदस्त शक्ती आहे. हा π भारतीय संस्कृतीत त्रिविक्रमामध्ये चिन्हांकीत केलेला आहे. शनीचा त्रास होऊ नये म्हणून या ग्रहाभोवती त्रिविक्रमाने तीन कडी घातली आहेत. फक्त उपद्रवी ग्रहालाच त्याने कडी घालून आवळून ठेवले आहे. ही परमेश्वरी रचना आम्हाला समजली पाहिजे.
आता बापूंनी दिनांक १३-०१-२०१५ मधील अग्रलेखातून शनी ह्या कृत्रिम ग्रहाची उत्पत्ती सांगितली तेव्हा प्रकर्षाने ह्या बापूंनीच आधीच कथिलेल्या गोष्टीची सुस्पष्ट उकल झाली.
खरेच बापू ज्या रहस्य्मय पध्द्तीने हा समग्र “वैश्विक इतिहास” समजावून देत आहेत त्याबद्द्ल कोटी कोटी अंबज्ञ !!!

श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे