Who was killed in place of Ahomina

#92089

Yogindra Joshi
Participant

ll हरि: ॐ ll

१५-०१-२०१५

हरि ॐ मन्दारसिंह. तुम्ही ओहोमिनाच्या(Ahomina) संदर्भातील घटनाक्रम व्यवस्थितपणे मांडला आहे. ‘ओहोमिनाच्या जागी त्या दुष्ट मंडळींनी कुणाला मारले’ हा खरोखरच अजूनही अनुत्तरित असलेला प्रश्न आहे, पण तुम्ही मांडलेल्या पद्धतीने विचार केल्यास याबाबत दिशा मिळू शकेल असे वाटते. ‘थाडा’ (Thada)या गूढ व्यक्तिमत्वाभोवतीसुद्धा अजूनही धुकेच आहे.
रविवार दिनांक १५ जानेवारी २०१५ रोजीच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित झालेल्या बापुंच्या अग्रलेखात थाडाबद्द्ल अधिक माहिती मिळते. अर्थातच सध्या थाडा या पदी असलेली व्यक्ती कोण आहे, याचा उलगडा होत नाही. पण ही नक्कीच तगडी चेटकीण असावी, असे वाटते. पझुझुच्या (Pazuzu)तोंडी असलेला उल्लेख या संदर्भात पुरेसा आहे. पझुझु म्हणतो की ही थाडा जरी आमच्या दारात उभी राहत असली व आम्हाला पाहून आदर दर्शवीत असली, तरीदेखील ‘थाडा’ हे पद नेहमीच प्रत्येक लॅमॅसुला(Lamasu) व पझुझुला आदराचे स्थान असते. त्यातच ही थाडा तर खूपच ताकदवान आहे व हिची बुद्धीसुद्धा अतिशय तल्लख आहे. पुढील काळात या थाडाबद्दल व्यवस्थितपणे कळेल असे वाटते.
ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll